ई-ये मराठीचिये नगरी
जो जे वाचील तो ते लाहो
जो जे वाचील तो ते लाहो
पुस्तकाच्या कव्हरवर फक्त एक क्लिक आणि पुस्तक उघडेल.
मूळ संस्कृत वाल्मिकी रामायण आणि त्या्चा शब्दशः काव्यमय श्लोकबद्ध मराठी अनुवाद
ई साहित्य प्रतिष्ठान
एक प्रसन्न अनुभव
सातत्यपुर्ण सोळावे वर्षं
हा प्रवास एक आनंदयात्रा आहे.
आपणही या आनंदयात्रेत सहभागी व्हा. एका प्रसन्न अनुभवाचे साक्षीदार व्हा.
हा प्रवास एक आनंदयात्रा आहे.
आपणही या आनंदयात्रेत सहभागी व्हा. एका प्रसन्न अनुभवाचे साक्षीदार व्हा.
हजारो दर्जेदार मराठी ईपुस्तके!
फक्त ’एकच’ क्लिक ..... आणि ईपुस्तक हजर
No अट NO झंझट ना AGREEment. याहून सहज सोपे नाहीच कुठं.
(पुस्तक वाचण्यासाठी पुस्तकाच्या कव्हरवर एक क्लिक करा- एक मिनिट थांबा- बस्स)
फक्त ’एकच’ क्लिक ..... आणि ईपुस्तक हजर
No अट NO झंझट ना AGREEment. याहून सहज सोपे नाहीच कुठं.
(पुस्तक वाचण्यासाठी पुस्तकाच्या कव्हरवर एक क्लिक करा- एक मिनिट थांबा- बस्स)
तुमच्या आवडीची पन्नास पुस्तके डाऊनलोड करून मोबाईलवर ठेवा. आरामात वाचा. लोकांनाही फॉरवर्डा. चकटफ़ू.
तुमचे नाव आणि गाव Whatsapp करा 9987737237 हा नंबर सेव्ह करा ई साहित्य नावाने. नियमित ईपुस्तके मिळवत रहा.
पुस्तक ऐकायचे असेल तर कानगोष्टी (ऑडिओ बुक्स) आहेतच. एकच क्लिक. ना पैसे, ना जाहिराती.
आता ऐकण्यासोबतच पुस्तके पहाण्याचीही सोय. अंजनईय. एक नवा अनुभव.
मराठीमधे ऑडिओबुक्स (Marathi audiobook) हा प्रकार आता नवीन राहिला नाही. अनेक लहानमोठे खेळाडू या खेळात आता उतरले आहेत. पण ई साहित्यने २०११ सालीच याची सुरुवात केली आणि तीही ज्ञानेश्वरीने. आजही मराठीत विनामूल्य आणि जाहिरातींची कटकट नसलेले दर्जेदार कानगोष्टी ऐकण्याचे सर्वाधिक लोकप्रिय ठिकाण म्हणजे ई साहित्यच आहे.
|
अंजन. आयुर्वेदात दिव्यदृष्टी देणार्या अंजनाचा उल्लेख आहे. अगदी अरेबियन नाइट्स ते जपानी परिकथा, पदोपदी आपल्याला हे अंजन भेटते, ज्याने दृष्टीला दिव्यत्व, तेज प्राप्त होते. पण दृष्टीकोनाला दिव्यत्व यायचे असेल तर ज्ञान हेच अंजन. ज्ञान मिळवायचे तर पुस्तक हे साधन. नव्या युगात ई पुस्तके आणि ऑडिओपुस्तकांच्या जोडीला आता येत आहे अंजनईय पुस्तके.
ई साहित्यच्या अंजनईय पुस्तकांच्या विभागाला भेट द्या आणि या नवीन उदयाला येणार्या पुस्तकप्रकाराबद्दल जाणून घ्या. |
१०००० पानी मूळ महाभारत मौल्यवान आहे, वाचकांना आवडते. मराठीमधे इतके विस्तृत महाभारत नाही. पण एवढे मोठे पुस्तक वाचणे सोपे नाही. डोळ्यांना त्रास होऊ शकतो. म्हणून चित्राजी ताम्हनकर यांनी त्याचे ऑडिओ करून प्रसारित केले आहेत.
आपण ते ऐकण्यासाठी वरील आयकॉनला क्लिक करा. सुमारे पाचशे ऑडिओ अर्ध्या अर्ध्या तासाचे आहेत. |
ज्यांनी आजवर ज्ञानेश्वरी वाचली नसेल, ऐकली नसेल व एक तरी ओवी अनुभवली नसेल ते मराठी असूनही अभागी
|
महाभारताइतकं भव्य कथानक जगात यापूर्वी कोणी लिहिलेलं नाही. जगात. एक अद्वितीय महाकाव्य आहे ते. पण १०००० पानं वाचणं काही सर्वांनाच जमत नाही. म्हणून त्याचे ऑडिओ व्हिडिओ सादर आहेत.
|
ज्ञानेश्वरीहून सुंदर जगात मानवनिर्मित काहीही नाही.
|
महाभारताहून भव्य मानवनिर्मित जगात काही नाही
|
रोज भेट देत रहा
रोज भेटी स्विकारत रहा
रोज भेटी स्विकारत रहा
दररोज एक नवे कोरे दर्जेदार पुस्तक प्रकाशित होते.
whatsapp वर विनामूल्य पुस्तकासाठी 9987737237 वर आपले नांव व गाव whatsapp करा.
ई साहित्य प्रतिष्ठान - सातत्यपुर्ण सोळावे वर्ष .
हजारो नवीन पुस्तकं प्रकाशित. विनामूल्य वितरित.
सुमारे पाच कोटी पुस्तके डाऊनलोड.
चारशे लेखक. सहा लाख नोंदित वाचक.
हजारो नवीन पुस्तकं प्रकाशित. विनामूल्य वितरित.
सुमारे पाच कोटी पुस्तके डाऊनलोड.
चारशे लेखक. सहा लाख नोंदित वाचक.
उत्तम पुस्तकांचा खजिना
सर्व वाचनीय- सर्व विनामूल्य
Technically Best Marathi ebooks
सर्व वाचनीय- सर्व विनामूल्य
Technically Best Marathi ebooks
रोज भेट देत रहा
रोज भेटी स्विकारत रहा
रोज भेटी स्विकारत रहा
लिखनेसे डर नहीं लगता साहब
प्रकाशन करनेसे लगता है
---
असे ज्या लेखकांना वाटते
अशा लेखकांसाठी अनेक प्रकाशन योजना
एकही पैसा खर्च न करता
घराबाहेर न पडता
कोणालाही मस्का न लावता
अधिक माहितीसाठी लिहा: [email protected]
प्रकाशन करनेसे लगता है
---
असे ज्या लेखकांना वाटते
अशा लेखकांसाठी अनेक प्रकाशन योजना
एकही पैसा खर्च न करता
घराबाहेर न पडता
कोणालाही मस्का न लावता
अधिक माहितीसाठी लिहा: [email protected]
फक्त कव्हरवर क्लिक करा. उघडा. वाचा.
नवी नवी कोरी कोरी भारी भारी पुस्तके
नवी नवी कोरी कोरी भारी भारी पुस्तके
सादर आहेत तीन माहितीपूर्ण पुस्तके. माणसांना होणार्या वेगवेगळ्या आजारांची थोडक्यात माहिती देणारी ही पुस्तकं लिहिली आहेत डॉ. सरोज आणि डॉ नील सहस्रबुद्धे या माता पुत्रांनी. हे दोघेही लंडनच्या हॉस्पिटल्समधे कार्यरत आहेत आणि कॅन्सरचे विशेषज्ञ आहेत. या पुस्तकात जवळपास प्रत्येक मानवी आजाराबद्दल माहिती दिली आहे.
शरीराला त्रस्त आणि ग्रस्त करणाऱ्या भिन्न भिन्न प्रकारच्या लक्षणांबद्दल, आजारांबद्दल, तसंच रोग संभवण्याच्या अनेकविध कारणांबद्दलची सविस्तर चर्चा या पुस्तकात समाविष्ट आहे. ”देहाची तिजोरी” या आमच्या तीन भागांच्या पुस्तकांमध्ये वाचकांना परिचित झालेली शरीररचना आणि शरीरक्रियांबद्दलची विस्तृत माहिती या पुस्तकाची पार्श्वभूमी म्हणून गृहीत धरली आहेच. त्यामुळे विविध शरीरविकार आणि व्याधींची फक्त कारणं, लक्षणं, रोगवर्गीकरण आणि काही महत्त्वाच्या रोगांबद्दलची प्राथमिक स्वरूपाची माहिती, एवढ्या तपशीलांवरच हे पुस्तक (भाग १,२,३) मर्यादित ठेवलं आहे. (रोगांसाठी आवश्यक ठरणाऱ्या तपासणीपद्धती आणि उपचारपद्धतींचा विचार, आगामी दोन पुस्तकांसाठी योजला आहे.) आवश्यक तेथे आकृत्यांचा आणि तक्त्यांचा वापर मात्र बर्याच प्रमाणावर केला आहे. कारण त्यामुळे केवळ एका दृष्टिक्षेपात, थोडक्या जागेत अधिक माहिती, उपलब्ध होऊ शकते. |
1942 सालातली ही एक जबरदस्त गूढ कादंबरी आहे. लेखक आहेत अर्ल स्टॅन्ले गार्डनर आणि अनुवाद केला आहे डॉ. वृषाली जोशी यांनी.
हेलनवर एका अनोळखी व्यक्तीचा खून केल्याबद्दल पोलिसांना संशय आहे. अचानक तिला तिच्या काही वर्षांपूर्वी मरण पावलेल्या काकांचा फ़ोन येतो. आणि ते तिला पेरी मेसन या वकीलाला भेटायचे सुचवतात. ते काका मरण पावलेले नसावेत यावर तिच्या आत्याचा विश्वास असतो. त्यातच त्या आत्याकडचे एक मांजर वीषबाधेतून बचावतं. पेरी मेसन यांना या तीनही घटनांतून एक सूत्र सापडतं आणि पोलिसांच्या विरुद्ध बाजूने तपास करून केवळ पुराव्यांच्या आधारे ते सगळे गूढ उकलतात. अशी खतरनाक कथा आहे. वाचायला घेतल्यावर खाली ठेवताच येणार नाही. |
काळाच्या कसोटीवर टिकलेली, आजवरच्या सर्वात प्रसिद्ध प्रणय कादंबरींपैकी एक: 'जेन आयर' या कादंबरीवर आधारित इंग्रजी भाषेतील सोळाहून अधिक चित्रपट बनले आहेत.
जेन आयर: एक आत्मकथा ही शार्लट ब्रांटी या ब्रिटिश लेखिकेने 'करर बेल' या टोपणनावाने सन. 1847 साली लिहिलेली इंग्रजी भाषेतील एक उत्कृष्ट कादंबरी: जी बालपणापासून तारूण्यात पदार्पण करेपर्यंत नायिकेच्या मानसिक आणि नैतिक वाढीवर लक्ष केंद्रित करते. एक वरवर साधी सरळ मुलगी, जीवनाच्या संघर्षातून लढत असताना अनेक अडथळ्यांची शर्यत जिद्दीने लढते आणि शेवटी कशी विजयी होते हे पाहणे अतिशय उत्कंठावर्धक आहे. बालपणी मामाच्या ममतेव्यतरिक्त इतर कुणाकडून प्रेमाचा शब्दाला वंचित झालेले निष्प्रेम बालपण, अनाथाश्रमातील एकंदरीत भीषण परिस्थिती, स्वतंत्रपणे स्वतः सिध्द करण्यासाठी तुलनेत थोडेफार आर्थिक स्वावलंबी झाल्यानंतर स्वतःच्या प्रयत्नाने मिळवलेली एका छोट्या मुलीची खाजगी शिक्षीकेची नोकरी आणि त्यानंतरचा नव्याने जुळून येऊ लागलेल्या नात्यातील महाभयंकर गुंता तथापि, जेन तिच्या दृढनिश्चयाने, तीक्ष्ण बुद्धी आणि धैर्याने या अडथळ्यांवर कशी मात करते हे पाहताना क्षणोक्षणी आपली गृहीतके चुकीची ठरतांना जाणवत राहते. व्हिक्टोरिया राणीच्या सुवर्णाक्षरांनी लिहल्या गेलेल्या कारकिर्दीत देखील ब्रिटनमधील बेरोजगारी, पितृसत्ताक पद्धतीचा समाजातील पगडा आणि प्रचलीत धार्मिक रुढी परंपरेचे, एका व्यक्तीने, तेही स्त्रीने केलेले परखड परिक्षण, विचारलेले प्रश्न निश्चितच आजदेखील ते धाडसाचे असून, कौतुकास पात्र आहे. याच कारणास्तव ही कादंबरी, काळाच्या बरीच पुढे असल्याचे मानली जाते. |
आम्ही डिजिटल पुस्तकं बनवतो आणि वितरित करतो. एक डिजिटल पुस्तक निर्मात्याने स्वतःच्याच उत्पादनावर टीका करणारे पुस्तक बनवून प्रसारित करणे याला तुम्ही काय म्हणाल? आम्ही याला सामाजिक जबाबदारी म्हणतो. मिलिंद बेंबळकर यांनी या पुस्तकात साधार आणि सखोल माहितीद्वारे हे सिद्ध केले आहे की या शतकातील सर्वात भयानक धोका, सर्वात मोठे संकट, डिजिटल स्क्रीन व्यसनच आहे. कृपया सावध व्हा.
डिजिटल स्क्रीनचे व्यसन : कारणे, दुष्परिणाम आणि उपाय (मोबाइल फोन, टॅब्लेट, इंटरनेट, व्हिडिओ गेम, समाज माध्यमा चे व्यसन) १) पार्श्वभूमी २) डिजिटल स्क्रीन आणि मेंदूचा परस्पर संबंध ३) डिजिटल स्क्रीनचा वापर आणि आपले मानसिक आरोग्य ४) डिजिटल स्क्रीनचा वापर आणि समाज माध्यमे ५) समाज माध्यमांवर होणारी गुंडगिरी आणि वाढत्या आत्महत्या ६) असुरक्षित मुली आणि त्यांचे होणारे शोषण ७) समाज माध्यमांवरील गुंडगिरी आणि भारतातील कायदे ८) डिजिटल स्क्रीनचा वापर आणि त्यामुळे होणारे मनोविकार - (भाग१) ९) डिजिटल स्क्रीनचा वापर आणि त्यामुळे होणारे मनोविकार - (भाग२) १०) डिजिटल स्क्रीनचा वापर आणि त्यामुळे होणारे शारीरिक आजार ११) इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे होणारी आजारपणे १२) डिजिटल स्क्रीनचा वापर आणि मुलांमध्ये होणारे वर्तनात्मक बदल १३) डिजिटल / व्हिडिओ गेम आणि आक्रमकता १४) डिजिटल स्क्रीनवर खेळला जाणारा जुगार १५) डिजिटल स्क्रीन आणि शिक्षणाची बाजारपेठ १६) डिजिटल स्क्रीनवरील वाचनाचे दुष्परिणाम १७) डिजिटल स्क्रीनचे व्यसन : लक्षणे आणि उपाय १८) डिजिटल स्क्रीनचे व्यसन : गरज समाज जागृतीची |
संगीत या विषयाला व संगीतकारांना वाहिलेली चार उत्कृष्ट पुस्तकं.
आज आम्ही वाचकांसाठी एक वेगळे शिवचरित्र घेऊन आलो आहोत. मराठीमधे अनेक शिवचरित्रे आहेत आणि त्याचबरोबर नवनवीन संशोधनातून नवी माहितीही उपलब्ध होत असते. त्यामुळे महेश गुप्ते यांनी पंचवीस वर्षांच्या अभ्यासातून लिहिलेले हे शिवचरित्र आधीच्या शिवचरित्रांहून वेगळे आहे. यात केवळ महाराजांच्या आयुष्यातील घटनांची क्रमवारी नाही तर अनेक वेगवेगळे विषय घेऊन महाराजांची थोरवी अधोरेखित केली आहे. महाराजांची अर्थव्यवस्था, न्यायव्यवस्था, आरमार, महसूलव्यवस्था, गडकिल्ले, पर्यावरण धोरण, धार्मिक धोरण, शेतीव्यवस्था, युद्धनिती इत्यादी अनेक बाबींवर या पुस्तकात स्वतंत्र उहापोह आहे. त्यामुळे हे पुस्तक आजवरच्या शिवचरित्रांहून वेगळे आहे. यातील काही माहिती ही आजवरच्या समजांहून वेगळी आहे. ती अनेकांच्या पचनी पडण्यास अवघड ठरू शकते. परंतू लेखकाने आजवरच्या सर्व उपलब्ध पुराव्यांनिशी हे लिहिलेले आहे व कोणत्याही प्रकारच्या बाजू घेण्याचे टाळले आहे.
पुस्तक वाचून आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास लेखक श्री महेश गुप्ते उत्सुक आहेत. (Whatsapp no. 7738852531) ज्यांना या पुस्तकाची छापील प्रत हवी असेल त्यांनी या क्रमांकावर संपर्क साधावा ही विनंती. (साठा असेपर्यंतच उपलब्ध) |
एक चित्त थरारक कादंबरी. अगदी ताजी आजच्या काळातली.
शक्तीसेन नाईक, कोल्हापूर पोलिस डिपार्टमेंटच्या अँटी टेररीजम युनिटचा प्रभारी. कोल्हापूर मध्ये युरेनियमची डिलिंग होत असल्याची त्याला टीप मिळते आणि तो त्याबाबत कारवाई करतो, परंतु होते उलटेच, शक्तीसेनए पकडलेली व्यक्ती ते युरेनियमचे डिलिंग अवैध नव्हती हे सिद्ध करतेच त्या उपर शक्तीने केलेल्या कारवाईत त्याचा युरेनियम विक्रेता शक्तीच्या हातून मेल्याचा व त्या डिलिंग मध्ये इन्वॉल्व्ह ते युरेनियम शक्तीने चोरल्याचा व डिलिंग मधुर सामील एका व्यक्तीचा खून केल्याचा आरोप लागतो. शक्तीला सस्पेंड केलं जातं. आता शक्तीसेन समोर युरेनियम शोधून काढून भारतीय जनतेवर घुटमळणारा भयंकर धोका निरस्त करायचा आहे, त्याला युरेनियम बाबतचं सत्य देखील शोधून काढायचं आहे, एक खूप मोठं षडयंत्र शक्तीचीच नाही, तर अखिल भारतीय जनतेची वाट पाहत होते, पण काय शक्ती हे सर्व रोखू शकेल का? आणि तेव्हा, जेव्हा एन. आय. ए. आणि खुद्द भारत सरकार त्याच्या विरोधात उभे आहे... इतकेच नाही, तर बाहेरील देशांचे काही छद्मी हेर देखील इथे उपजलेले असतात... शक्तीसेनला त्यांनाही तोंड द्यायचे आहे! हे सर्व भयंकर राजकीय षडयंत्र मार्गी लावत असता अखेरीस शक्तीसेन कसा संविधान, नागरिकशास्त्र व भारतीय नागरिकांची कर्तव्ये आपल्याला समजावून सांगतो हे पाहणे रोचक आहे... |
ही कादंबरी वेश्यांवर नाही. वेश्याव्यवसायात सापडलेल्या मुलींवर आहे. कसलाही आक्रस्ताळेपणा नाही. भडकपणा नाही. पण तरीही भिडणारं वास्तव अस्वस्थही करतं आणि त्यातला चांगुलपणा आशाही दाखवतो.
----- 'मुन्नी' ही Aruna अरुणा सबानेंची कादंबरी. खरे तर ही लिखित स्वरुपात असल्याने कादंबरी, अन्यथा ही तर त्यांची मानसकन्याच ! वेश्या व्यवसायाच्या दलदलीत रुतलेल्या मुन्नीला त्यातून बाहेर काढलं जातं आणि एक नवं आयुष्य तिच्या वाट्याला येतं, नव्या नावासह ! याकामी तिला मदत होते एका समाजसेविकेची. मुन्नीच्या कथेचा अवकाश असा दोन ओळीत सामावता येईल मात्र मुन्नीच्या आयुष्याचा अन्वयार्थ लावायला पाने कमी पडावीत. मुळात ज्या दुनियेला पांढरपेशी सभ्य जगाने अघोषित रित्या बहिष्कृत केलेलं आहे त्या जगात काय घडलं नि काय घडलं नाही याच्याशी बहुतांशांना काहीच घेणंदेणं नसतंच ! आणि असावं तरी कशासाठी, कारण आजघडीला कोणत्याही सामान्य माणसाचं आयुष्य समस्येशिवायचं साधं सुकर राहिलेलं नाही. दुःख, व्याधी, असमाधान, न संपणाऱ्या गरजा आणि अभावग्रस्ताचं जिणं यामुळे हरेक जीव त्रस्त झालाय. मग त्यात या घाणीत अडकलेल्या बायकांची दुखणी अशांच्या खिजगणतीत कशी असतील ? मात्र सगळीच माणसं अशी पोटार्थी व्यावसायिक नसतात, काहींना त्यांच्या संवेदना सदैव टोकरत असतात. त्यांच्यासाठी उभं जग हे जणू बंदिशाळाच ठरते, मग एकेका जीवांची दुःखे त्यांना सलत राहतात, त्यातून साकारतात मुन्नीसारखी धारदार शब्दचित्रे !- समीर गायकवाड |
फ़ार फ़ार जुनी गोष्ट आहे. एक घनदाट जंगल होते.त्या जंगलात एक सिंह राज्य करत होता. त्याला सर्वजण घाबरत आणि त्याचेच सर्वजण ऐकत. एके दिवशी एक कोल्हा त्याच्याकडे आला आणि म्हणाला...
लहानपणी आपण सर्वांनीच अशा गोष्टी ऐकल्या असतील. वाचल्याही असतील. या गोष्टींतले प्राणी बोलत. गुंतागुंतीचा विचार करत. एकमेकांना उपदेश करत. एकमेकांवर कुरघोडी करत. यातला कोल्हा लबाड असे. गाढव बिनडोक असे. ससा चतुर असे. हत्ती शांत डोक्याने विचार करी. ईसापनिती, जंगल जंगल बात चली है पता चला है म्हणत गोष्टी सांगणारं जंगलबुक, हितोपदेश, पंचतंत्र अशा पुस्तकांतून अशा खूप गोष्टी वाचल्याही असतील. गंमत जंमत करत शिकवण देणाऱ्या आणि संस्कार करणाऱ्या या गोष्टी तुम्हाला आठवत असतील वा नसतील कदाचित. पण त्या गोष्टींनी तुमच्या मनावर केलेले खोलवरचे संस्कार मात्र तुमच्या मनातून आजही पुसले गेले नसणार. आणि हीच तर या गोष्टींची खासियत. पुर्वीच्या काळी या आणि अशाच गोष्टींतून मुलं शहाणपण आणि मूल्यं शिकत. त्याचा वापर आयुष्यभर करत. वेगवेगळ्या क्षेत्रांत उच्च शिक्षण घेतलं तरी मूल्यशिक्षण आणि शहाणपणाची शिदोरी मात्र बालपणी याचगोष्टींतून मिळालेली असे. हल्ली जो तो उठतो तो एम बी ए करतो. तीसेक वर्षांपुर्वी MBA हा शब्दही फ़ारसा कुणाला माहित नव्हता. मॅनेजर बनण्यासाठी काही विशेष वेगळं शिकावं लागतं हेही माहित नव्हतं लोकांना. मुळातली बुद्धीमत्ता आणि अनुभव यांच्या जोरावर लोक मॅनेजर बनत. पण ते काम करत कसं? की जुने सगळे लोक मठ्ठ होते? त्यांना ते शहाणपण कुठून मिळे? |
जागतिक साहित्यात अत्यंत मानाची A Tale of Two Cities ही कादंबरी. चार्ल्स डिकन्स यांनी लिहिलेली व १८५९ साली प्रकाशित झालेली. ही कादंबरी आजही जगातील सर्वाधिक खपाच्या पहिल्या शंभर पुस्तकांत ६३ क्रमांकावर आहे.
या कादंबरीचा घटनाक्रम आहे फ़्रेंच राज्यक्रांतीच्या काळातला. जुलमी फ़्रेंच राजवटीत बॅस्टीलचा तुरुंग हा त्या जुलुमांची सर्वोच्च खूण म्हणून मानला जातो. या तुरुंगात १८ वर्षं राहिलेले डॉक्टर मॅनेट क्रांतीच्या काळात सुटतात आणि आजवर न भेटलेल्या आपल्या एकुलत्या मुलीच्या भेटीसाठी लंडनकडे निघतात. बाजूला क्रांतीच्या ज्वाळा भडकलेल्या. क्रांतीच्या पार्श्वभूमीवरची एक भावपूर्ण कादंबरी म्हणून हिचा उल्लेख होतो. डॉ. वृषाली जोशी यांनी मराठीत अनुवादित केलेली ही कादंबरी ई साहित्यवर वाचा. |
विज्ञान कादंबरीतील जागतिक क्रमवारीतील सर्वोच्च नाव म्हणजे लेखक- आयझॅक असिमोव्ह. त्यांनी लिहिलेल्या फ़ाउंडेशन सिरीजची ही पहिली कादंबरी.
ही कादंबरी-“फाउंडेशनची पूर्वपीठिका” 12,020 G.E मध्ये सेट केली आहे. (GE-गॅलेक्टिक एरा), सम्राट क्लियोन I च्या उतरत्या कारकिर्दीत. हे साम्राज्य २५० कोटी ग्रहांवर आहे. कादंबरीची सुरुवात सेल्डनने गणिताच्या अधिवेशनात एका पेपरच्या सादरीकरणाने केली होती ज्यामध्ये मनोविज्ञानामुळे भविष्याचा अंदाज लावणे सैद्धांतिकदृष्ट्या कसे शक्य होते हे तो मांडतो. गॅलेक्टिक साम्राज्याच्या सम्राटाला याची माहिती मिळते आणि तो सेल्डनचा राजकीय फायद्यासाठी वापर करू इच्छितो. समोरासमोर मुलाखतीत, सेल्डनने भर दिला की सायकोहिस्ट्री ही अशी गोष्ट आहे ज्याचा त्याने विकास करण्यास सुरुवातही केली नाही किंवा ते कसे करायचे याची स्पष्ट कल्पना देखील नाही, परंतु क्लीऑनला पूर्ण खात्री नाही की हॅरीचा साम्राज्यासाठी काहीही उपयोग नाही. त्यानंतर सेल्डन रिपोर्टर चेटर ह्युमिनला भेटतो, ज्याने त्याला खात्री दिली की क्लीऑनचा पहिला मंत्री, इटो डेमर्झेल, त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणून सेल्डनने पळून जाणे आणि मनोविज्ञानाला व्यावहारिक बनवण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. ह्युमिनने त्याला स्ट्रेलिंग युनिव्हर्सिटीमध्ये नेले, जे एम्पायरमधील अव्वल क्रमांकांपैकी एक आहे आणि हुमिनने डॉर्स वेनाबिलीशी त्याची ओळख करून दिली. सेल्डनचा असा सिद्धांत आहे की सायकोइतिहासाच्या पहिल्या विकासासाठी संपूर्ण साम्राज्यापेक्षा लहान, तरीही महत्त्वपूर्ण नमुना आवश्यक आहे, शक्यतो फक्त मूळ जग जिथे मानवाची उत्पत्ती झाली आहे...जे आता गमावले आहे, जुन्या ऐतिहासिक नोंदींसह. ते मूळ जग म्हणजे पृथ्वी. पण अशी खरी पृथ्वी नावाचा ग्रह खरोखरच अस्तित्वात आहे का? हाच त्यांना प्रश्न पडला आहे. सहा खंडांच्या या महाकादंबरीतील ्ही पहिली सहाशे पानी कादंबरी सादर होत आहे. |
एक से एक खतरनाक डिटेक्टिव्ह स्टोरीज.
अमेरिकेत गाजलेल्या.
यातील काहींवर चित्रपटही बनले आहेत. अगदी हिंदीतही.
अमेरिकेत गाजलेल्या.
यातील काहींवर चित्रपटही बनले आहेत. अगदी हिंदीतही.
एक जबरदस्त वेगवान पोलिटिकल थ्रिलर- इब्लिस
'इब्लिस' मास्क चेहऱ्यावर धारण करून अन्यायाचं राज्य संपवायला तो निघाला होता. म्हणून अंडरवर्ल्डमध्ये त्याचं नांव 'इब्लिस' पडलं होतं. इब्लिस!!! पिवळट पांढरे दात विचकारा, काळी आऊटलाईन असलेला, डोक्यावर दोन अनुकुचीदार रक्तवर्णी शिंगे असणारा, नाकापासून हनुवटीपर्यंत तोंड झाकोळून टाकणारा 'डीमन' मास्क तो सतत परिधान करून असायचा; असतो... त्याच्या या मास्क वरून त्याला सर्वमान्य प्रचलित नांव 'इब्लिस' असंच पडलं होतं. हे नांव उच्चारणही बरेचजण टाळत असतं. हिंमत असणारेच त्याला या नांवाने उद्धृत करत असत. त्याच्या प्रिय 'कोल्ट कमांडर्' या पिस्टलने तो दुष्ट निखदनाचे काम करी म्हणून त्याला त्याची सोबतीण हेली, ही कमांडर् देखील म्हणत असे. परंतु 'कमांडर्' पेक्षा 'इब्लिस' हेच नांव त्याला अधिक प्रिय! या इब्लिसचा अर्थ प्रचलित मराठीतील 'उपद्व्यापी' असा नाही. अरबी भाषेनुरूप 'तो, जो हमेशा दुःखात असतो' असा 'इब्लिस!' यालाही दुःख कुठे चुकलं होतं?! दुःख जणू याची सावली होतं. अरबीत आणखी एक अर्थ आहे; तो म्हणजे 'सैतानांचा नेता!' पारसी/तुर्की/ग्रीक भाषा संस्कृतींमध्येही याचा अर्थ 'सैतान' असाच दिलाय. तो स्वतःला तसाच पाहत होता. सैतानासारखा! 'इब्लिस' हा, कुणासाठी 'कमांडर्' होता, कुणासाठी इब्लिस होता, कुणासाठी तो 'विरुढक' होता, तर कोण त्याला 'हेडीस' म्हणून गेलं होतं... परंतु... परंतु ही कथा 'इब्लिस'ची नाहीच. तर ही कथा आहे 'इब्लिस'चा आमूलाग्र बदल होऊन पुन्हा 'रवी' होण्याची! इब्लिसचा हिंसेकडून अहिंसेकडे येण्याचा प्रवास म्हणजे ही कथा... |
तसं पहाता सामान्य आणि असामान्य असं काही नसतं. पण सहसा अप्रसिद्ध व्यक्तींना सामान्य म्हटलं जातं. म्हणून ती असामान्य नसतातच असं नाही. ही जी दोन पुस्तकं आज पाठवत आहोत ती या असामान्य पण अप्रसिद्ध व्यक्तींची आहेत. पहिले आहे श्री राम केळकर या दर्यावर्दीचे. बोटीवर आयुष्य घालवलेले श्री राम केळकर पन्नास देशांत फ़िरले, अनेक जीवघेणी संकटे, कितीतरी आनंदाचे क्षण, अनेक विचित्र अनुभव यांनी त्यांचे जीवन असामान्य कसे बनले हे त्यांच्याच शब्दांत त्यांनी लिहिले आहे. पुस्तकाचे नाव आहे, *साद सागराची*.
दुसरे पुस्तक आहे सौ. जयश्री पटवर्धन यानी लिहिलेले- *असामान्य*. गांवोगांवी पसरलेल्या अनेक रत्नांची त्यांच्या असामान्य कार्याची ओळख त्यांनी करून दिली आहे. त्यात पुस्तकांचे हॉटेल च्वालवणार्या जोंधळे आजी, अनाथ व गरीब मुलांचे होस्टेल चालवणारे, कर्नल मोघे, इतरांच्या दोन टक्के किंमतीत इन्क्युबेटर बनवणारे अरुण करकरे, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांत मेडल्स मिळवणारा गतीमंद ओंकार, भिकार्यांचे डॉक्टर अभिजीत सोनावणे अशा एक से एक असामान्य लोकांची ओळख या पुस्तकात होईल.
ही दोन्हीही पुस्तके Must Read आहेत. वाचून आपले अभिप्राय लेखकांना कळवावेत ही विनंती. पुस्तके विनामूल्य आहेत. पण आपला अभिप्राय अमूल्य असेल.
दुसरे पुस्तक आहे सौ. जयश्री पटवर्धन यानी लिहिलेले- *असामान्य*. गांवोगांवी पसरलेल्या अनेक रत्नांची त्यांच्या असामान्य कार्याची ओळख त्यांनी करून दिली आहे. त्यात पुस्तकांचे हॉटेल च्वालवणार्या जोंधळे आजी, अनाथ व गरीब मुलांचे होस्टेल चालवणारे, कर्नल मोघे, इतरांच्या दोन टक्के किंमतीत इन्क्युबेटर बनवणारे अरुण करकरे, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांत मेडल्स मिळवणारा गतीमंद ओंकार, भिकार्यांचे डॉक्टर अभिजीत सोनावणे अशा एक से एक असामान्य लोकांची ओळख या पुस्तकात होईल.
ही दोन्हीही पुस्तके Must Read आहेत. वाचून आपले अभिप्राय लेखकांना कळवावेत ही विनंती. पुस्तके विनामूल्य आहेत. पण आपला अभिप्राय अमूल्य असेल.
नारी तेरे कई रूप अवतार हुए हैं
हर रूपकी महीमा अपरम्पार हुई हैं - कवि मनसीरत प्रसंगानुरूप आणि वातावरणानुरूप रूप बदलणार्या या सविता शेट्टी यांच्या कथा वाचल्या.या स्त्रीचे चित्रण करणार्या सविता शेट्टी यांच्या कथा वाचल्यावर हेच मनात आले. तसे स्त्रीचित्रण करणार्या कथा मराठीत खूप आहेत. कौटुंबिक स्त्री ते बंडखोर स्त्री अश्या अनेक रुपांतली स्त्री मराठी कथांत असते. पण सविताजींच्या कथांत समान्य स्त्रीची विविध रूपे पहायला मिळतात. म्हणून या कथा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ई साहित्यची पुस्तके विनामूल्य तर असतातच पण विनाअट मिळतात. काहीच् झंझट नाही. फ़क्त एक क्लिक आणि पुस्तक ओपन.घ्या. |
देहाला तिजोरीची उपमा जगदिश खेबुडकर यांनी दिली. किती नेमकी आणि अर्थपूर्ण कल्पना आहे. या देहाच्या तिजोरीतला एक एक हिरा, माणिक, मोती म्हणजे पेशी, अस्थी, अवयव, इंद्रिय. त्यांची किंमत ते बिघडल्यावरच कळते. किंवा कमी झाल्यावर. पण जगाच्या उचापती करणारे आपण, आपल्या या तिजोरीचा हिशेब कधी करतच नाही. आपल्याला पत्ताही नसतो की कुठलं इंद्रिय काय काम करतंय आणि कसं करतंय, नेमकं कुठे असतंय. अतिशय महत्वाची ही जाण, ापण ठेवलीच पाहिजे. एवढी सगळी इंद्रिय, हे शरीर आपल्याला फ़ुकट मिळालंय म्हणून त्याची किंमत नसते. डॉक्टरांनी पहिल्या वर्षी anatomy शिकावी लागते. आपल्या प्रत्येक अवयवाचा इंद्रियाचा बारकाईने अभ्यास करावा लागतो. पण सामानय माणसासाठी आम्ही एक तीन खंडांचं सखोल पण तरीही सहज सोपं पुस्तक सादर करत आहोत.
मूळच्या पुण्याच्या पण गेली अनेक वर्षे लंडनमधे कॅन्सर स्पेशालिस्ट म्हणून कार्यरत असणारे श्री नील आणि सौ सरोज सहस्रबुद्धे या माय लेकांच्या टीमने हे एक जबरदस्त पुस्तक लिहिलेले आहे. पुस्तकाचे नाव आहे "देहाची तिजोरी" प्रत्येकाने वाचावं असं हे पुस्तक आहे. ई साहित्यचं प्रत्येक पुस्तक विनामूल्य, विनाअट असतं. सहज एका क्लिकने डाऊनलोड करता येतं. पण म्हणून त्याची किंमत कमी होत नाही. एक एक पुस्तक अमूल्य आहे. ई साहित्य अलिबाबाची गुहा आहे. |
शिवचरित्र हा महाराष्ट्रामध्ये तरी अत्यंत भावनेचा विषय आहे, अभ्यासाचा तसा कमीच आहे. पंढरीचा विठूराया व छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची दोन आराध्य दैवते. शिवाजी महाराजांचे नाव निघालं की मराठी माणसाला (जे महाराष्ट्रात राहतात ते सर्व मराठी, प्रदेशवाचक, जातीवाचक न्हवे) भरून येते. सहाजिकच शिवाजीराजांवर नि:पक्षपातीपणे, निरपेक्षपणे, अलिप्तपणे लिहिणे व बोलणे शंभर टक्के शक्य नाही. कितीही प्रयत्न केला तरी अशा लेखनात भक्ती, आदर, प्रेम हे भाव थोडेफार का होईना येतातच. हे सर्व दोष कमी करण्याचा प्रयत्न करून हे शिवआख्यान मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज ही व्यक्तिरेखा फार मोठी आहे, तिचे शेकडो पैलू आहेत. कुठल्याही अभिनिवेशाशिवाय शिवचरित्र मांडणे व समजावून घेणे हे एक फार मोठे कालातीत आव्हान आहे. त्यामध्येहि युगपुरुष, महापुरुष, शिवाचा अवतार अशा दैवी संज्ञा बाजूला ठेऊन फक्त एक आपल्या सर्वा सारखाच एक मनुष्य म्हणून महाराज समजून घेणे खूप आवश्यक आहे.
जे जे काही जुने परंपरावादी आहे त्यातील चुकीच्या गोष्टीमध्ये बदल करून ,त्या बंद करून, जे चांगले आहे त्यात भर घालूनच सर्वांची उन्नती आहे हे महाराजांनी आपल्याला ३५० वर्षांपूर्वीच सांगितले आहे. राज्याभिषेकाचे राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक पैलू एकत्रिक मांडण्याचा प्रयत्न केला आहे. |
महाभारतातील संजय कोणाला माहित नाही असे नाही.
तरीही दुर्दैवाने त्याच्याबद्दल कोणालाच काही माहिती नसते हे ही खरे. त्याला दिव्य दृष्टी होती आणि धृतराष्ट्राला युद्धाची चक्षुर्वैसत्यं माहिती तोच सांगत होता. तत्कालिन कॉमेंटेटर म्हणा. पण तो कोण, कुठला, त्याचा जन्म कोणाच्या घरी झाला? तो कुरुंकडे आला कसा? त्याने युद्धापूर्वी काय काय केले? त्याला दिव्य दृष्टी कोणी व का दिली? त्याचा अंत कसा झाला? |
नीट पूर्ण न वाचता, न ऐकता, नीट समजून न घेता मान डोलावणे योग्य नाही.
ज्ञानेश्वरी हे जगातील सर्वात सुंदर पुस्तक आहे असे म्हटले की सर्वचजण मान डोलावतात. वाचणारे. न वाचणारे. वाचून समजणारे. न समजणारे. ज्ञानेश्वरी सुंदर का आहे? माऊलींची भाषा रसाळ आहे म्हणजे काय? मुळात संत ज्ञानेश्वरांना माऊली का म्हणतात. त्यांच्या भाषेत अमृताहून गोडी आहे असे का म्हणतात? एक अगदी छोटेसे पुस्तक आहे जे श्री. सुरेश पंदारे यांनी आपल्या मुलां-नातवांसाठी लिहिले. ते ई साहित्यने प्रकाशित केले. वाचून पहा. ज्यांनी आजवर पूर्ण अर्थ न समजता ज्ञानेश्वरी वाचली त्यांना अवर्णनीय आनंद मिळेल. ज्ञानेश्वरांच्या भाषेइतकीच ई साहित्यची पुस्तकं मिळवण्याची पद्धत सोपी आहे. फ़क्त एक क्लिक करा. ना अट. ना झंझट. सहज, सुंदर, सोपं. विनामूल्य. ज्ञानेश्वरीसारखं. |
1913 साली जगातील सर्वोच्च समजला जाणारा साहित्यिक मान गीतांजली या भारतीय कवितेला व गुरुदेव रविंद्रनाथ टागोर या कवीला देण्यात आला. अनेक कवींना हा प्रश्न पडतो की असे काय असेल त्या कवितेत की ज्यामुळे हा मान या कवितासंग्रहाच्या वाट्याला आला.?
१९१३ साली जेव्हा जगावर पहिल्या महायुद्धाचे ढग जमा होत होते, आणि संपूर्ण जग एका अस्थिरतेतून, भयावह परिस्थितीतून जात होते तेव्हा गीतांजली या कवितासंग्रहाने संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. भारतीय तत्वज्ञानाचे सार असणार्या या कविता, ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या काव्याची आठवण करून देतात. माणसाने माणसाशी कसे वागावे याचे उदाहरण देतात. सहज सोप्या शब्दांतल्या या कविता वाचल्याच पाहिजेत. कदाचित भारतीय साहित्य नेहमी वाचणार्यांना यात फ़ार वेगळे काही वाटणार नाही, कारण हे तर आपलेच नेहमीचे विचार आहेत. आहे तरी काय गीतांजली. एकदा वाचून पाहूया. |
अॅड यशवंत कदम हे मराठीतील एक नावाजलेले सुप्रसिद्ध लेखक आहेत. ई साहित्यवरील त्यांचे हे पहिले पुस्तक असले तरी यापुर्वी त्यांची वीसहून अधिक छापील पुस्तके प्रकाशित झाली आहेत आणि त्यातील अनेकांची पहिली आवृत्ती संपली आहे.
गरुडझेप हा कथासंग्रह १४ कथांचा आहे. त्यातील बहुतेक सर्व कथा या वास्तव अनुभवांच्या कथा आहेत. यशवंतजी स्वतः वकील असल्यामुळे त्यांची भाषाशैली कथा रंगवून मनात ठसवणारी आहे. या कथा गुंतागुंतीच्या नाहीत. सर्वसाधारणपणे मनोरंजनासह उद्बोधक कथा आवडणार्या वाचकांना या सरळमार्गी कथा आवडतील. |
२००८ साली आषाढाच्या पहिल्या दिवशी, म्हणजे महाकवी कालिदास दिनाच्या सुमुहूर्तावर, ई साहित्य प्रतिष्ठानची औपचारिक रित्या स्थापना झाली. गेली १५ वर्षे सातत्याने जवळपास दररोज ई साहित्यवर एक नवीन पुस्तक प्रकाशित होत असते. आज सहालाख नोंदणीकृत वाचक असणारी, महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात, भारताच्या प्रत्येक राज्यात आणि जगाच्या पाठीवर चाळीसहून अधिक देशांत वाचक असलेली ही संस्था आहे.
ई साहित्यच्या या यशाचे श्रेय ई साहित्यचे दर्जेदार लेखक, कवी, चित्रकार, कलाकार, कार्यकर्ते, तंत्रज्ञानी आणि देणगीदार यांच्याकडेच जाते. या सर्वांचे अभिनंदन आणि आभार!
ई साहित्यच्या या यशाचे श्रेय ई साहित्यचे दर्जेदार लेखक, कवी, चित्रकार, कलाकार, कार्यकर्ते, तंत्रज्ञानी आणि देणगीदार यांच्याकडेच जाते. या सर्वांचे अभिनंदन आणि आभार!
संपूर्ण वाल्मिकी रामायणाचे मराठीमधे श्लोकानुवाद करण्याचा संकल्प श्री. श्याम कुलकर्णी यांनी सोडला आहे. या पुस्तकात मूळ संस्कृत रामायण आणि त्याचा त्याच छंदामधे श्लोकमय मराठी अनुवाद आहे.
या महान ग्रंथाचा तिसरा भाग आज प्रकाशित होत आहे.
मूळ ग्रंथ जितका प्रासादिक आहे तितकेच सुंदर याचे मराठी श्लोकही आहेत. समजायला सोपे आणि सुंदर. मूळ ग्रंथाचा फ़ील येईल इतपत सुंदर.
या आधीचे भाग आणि पुढे येणारे सर्व भाग ई साहित्यवर FREE उपलब्ध असतील.
या महान ग्रंथाचा तिसरा भाग आज प्रकाशित होत आहे.
मूळ ग्रंथ जितका प्रासादिक आहे तितकेच सुंदर याचे मराठी श्लोकही आहेत. समजायला सोपे आणि सुंदर. मूळ ग्रंथाचा फ़ील येईल इतपत सुंदर.
या आधीचे भाग आणि पुढे येणारे सर्व भाग ई साहित्यवर FREE उपलब्ध असतील.
सेक्स्टॉर्शन बद्दलची एक स्फ़ोटक कादंबरी.
|
किडनी ट्रांन्सप्लांटसंबंधीचे अनुभव आणि मौल्यवान माहिती या अगदी छोट्याशा पुस्तकात मिळेल.
|
|
डॉ. बंकटलाल जाजू हे इंजिनियरिंगचे प्राध्यापक. १९६६ पासून ते विविध इंजिनियरिंग कॉलेजांत प्राध्यापक व प्राचार्य होते. त्या काळचे ते IIT Doctorate. पण त्यांचा स्वभाव निगर्वी, मिळून मिसळून रहाण्याचा आणि सर्वांकडून जे जे मिळेल ते ते शिकण्याचा. इंजिनियरिंग आणि संगीतच नव्हे तर व्यवहारज्ञानही. यातून त्यांना मनुष्य स्वभावाचे व त्यातील गुंतागुंतीच्या व्यवहारांचे जे दर्शन घडले ते त्यांनी आपल्या समर्थ लेखणीतून अक्षरी आणले आणि अनेक नियतकालिकांतून प्रसिद्ध केले. त्याचे हे अमूल्य पुस्तक ई साहित्यच्या वाचकांसाठी ते विनामूल्य देत आहेत. त्यांची या वयातली स्मरणशक्ती अगदी तल्लख आहे हे पुस्तक वाचताना जाणवतेच. त्यामुळे वेगवेगळ्या काळातील जग ते आपल्या डोळ्यांसमोर थेट उभे करतात.
डॉ. जाजू यांचे बरेच आयुष्य होस्टेलमधे गेले. कधी विद्यार्थी तर कधी वॉर्डन म्हणून. त्याच्या गमतीजमती या पुस्तकात आहेत. १९६३ असो वा २०२३. ज्या काही गोष्टी अजिबात बदलल्या नाहीत त्यातली एक म्हणजे होस्टेल. तुम्ही जर कधी होस्टेलला राहिले असाल तर १९६३ चे होस्टेलही तुम्हाला आपलेच वाटेल. |
आनंद-
लेखिका- मधू शिरगांवकर कादंबरी एका चित्रकाराच्या जिवनातील चढ-उतारांची ही कथा आहे. निसर्गचित्रांची कला उपजत अंगी असलेल्या पण नशिबाचे फ़ासे बाकी सर्व बाबतीत उलटे पडलेल्या आनंदची ही कथा. पाच साडेपाचशे पानांची ही कादंबरी बघून आधी भिती वाटेल. म्हणून आधी फ़क्त दहा पानंच वाचा. अनुभव असा की एकदा सुरुवात केलेला माणूस ही कादंबरी पूर्ण केल्याशिवाय खाली ठेवत नाही. म्हणून याचा फ़ॉंटही मोबाईलवर सहज वाचता येईल इतपत ठेवला आहे. खरं तर ही आहे एका चित्रकाराची कथा. पण वाचता वाचता ती नकळतच तुमचीही होऊन जाते. एक क्लिक करून पहा तर खरं! |
पुरंदरच्या तहात स्वराज्यातले फक्त १२ किल्ले हाती ठेवून महाराज आग्र्याला रवाना झाले. पण हे बारा किल्ले असे होते की त्यांच्या आधाराने महाराजांनी आपले सर्व किल्ले दामदुपटीने जिंकून घेतले. त्यातला एक तळगड. फ़ारसा प्रसिद्ध नसला आणि आज याला कोणी डागडुजी करणारा नसला तरी त्याचे ऐतिहासिक महत्व आणि भौगोलिक बलस्थान अजिबात कमी नाही.
एक भिती आहे माझ्या खोल मनात दडून
------------------------------------- कॅ न्स र १००% बरा होऊ शकतो. थोडा तुमचा वेळ द्या. जाणून घ्या तो काय आहे, कसा होतो, कसा समजतो आणि वेळेवर समजला तर कसा पटकन बराही होतो. आणि वेळेवर समजण्यासाठी काय करावे. समजल्यानंतर काय करावे. घरातील व्यक्तींनी कसे वागावे. कॅन्सरची भिती मनातून काढून टाकणारे एक झक्कास पुस्तक. आपल्या ओळखीचे कोणी कॅन्सर पेशंट असतील वा त्यांचे नातेवाईक असतील. त्यांना फ़ॉरवर्ड करा. हे पुस्तक इंग्लंड मधे स्थाईक झालेल्या कॅन्सर स्पेशालिस्टनी लिहिलेले आहे. त्यांनी एकूण १९ पुस्तके लिहिलेली आहेत. हे मराठीतील वाचकांसाठी अतिशय सोप्या भाषेतले आहे. फ़्री आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे असा आमचा प्रय्त्न आहे. कृपया त्यात मदत करा. ई साहित्यची पुस्तके मुक्त असतात. ई साहित्यने कॅन्सर जागृतीसाठी मोहीम आखली आहे त्यात सामिल व्हा. फ़ेसबुक लिंकवर क्लिक करा. |
एका विद्यार्थिनीने नववी इयत्तेत असताना लिहीलेलं हे संस्कृत काव्य.निकिता राजेश पाटील ही विद्यार्थिनी. कुटुंबात लेखनाचा वा साहित्याचा वारसा असा नाही. पण अगदी शालेय वयातच तिला लेखनाची ऊर्मी शांत बसू देईना. वयाच्या तेराव्या वर्षापर्यंत तिने पूर्ण पुस्तक होईल इतके लिहिले. नंतर मराठी साहित्याचा रितसर अभ्यास करून आता ती साहित्याच्या वेगवेगळ्या रसांच्या निर्मितीचा अनुभव घेत आहे. तिने लिहिलेल्या यापुर्वीच्या अकरा पुस्तकांचे कौतुक जाणकार वाचकांनी केले आहे. तिने लिहिलेल्या चारही वेदांच्या ऋचांवर आधारित चार मराठी पुस्तकांचे वाचकांकडून विशेष स्वागत होत आहे. द्रौपदी या महाभारतातील व्यक्तिरेखेचा तिने अत्यंत सखोल अभ्यास केला असून त्यावर एक त्रिखंडात्मक कादंबरी लिहिली आहे.
"विरहिणी" हे सुमारे ४०० पानांचे संस्कृत काव्य द्रौपदीच्या वनवास व विजनवासातील विरहकालावर आधारित आहे. जाण्कारांची मते जाणून घ्यायला निकिता उत्सुक आहे.
"विरहिणी" हे सुमारे ४०० पानांचे संस्कृत काव्य द्रौपदीच्या वनवास व विजनवासातील विरहकालावर आधारित आहे. जाण्कारांची मते जाणून घ्यायला निकिता उत्सुक आहे.
एका भव्य प्रकल्पाला शुभारंभ करत आहोत.
२४००० श्लोकांचे मराठी काव्यानुवाद प्रथमच मराठीत होत आहे.
मूळ रामायण वाचण्याची जिज्ञासा असणारे पण पुरेसे संस्कृत न जाणणारे याचा लाभ घेतील.
२४००० श्लोकांचे मराठी काव्यानुवाद प्रथमच मराठीत होत आहे.
मूळ रामायण वाचण्याची जिज्ञासा असणारे पण पुरेसे संस्कृत न जाणणारे याचा लाभ घेतील.
मी वेश्यावस्तीत माझ्या मित्रमंडळासोबत फिरायला गेलो. आम्ही बोलतबोलत चाललो होतो. तोच एका वेश्येनं आमच्यापैकी आम्हा दोघांचे हात पकडले. तसं पकडताच बाकी सर्व पळाले. त्यानंतर ज्याचा हात धरला होता त्या वेश्येनं. तोही हात झटकून पळाला. राहिलो मी. मी पळालो नाही. कारण मला वाटलं की आपण काही गुन्हा केलेला नाही. ही काय करणार. शेवटी त्या मुलीनं अर्थात वारांगनेनं मला आत नेलं. कुलूप लावला व म्हटलं, "पैसे काढ." त्यावर मी म्हटलं, "कशाचे पैसे?" त्यावर ती म्हणाली, "इथं कशाला आलाय." मी म्हटलं, "फिरण्यासाठी." त्यावर ...
|
एका जगप्रसिद्ध चित्रपटाची ही पटकथा मराठीमधे अनुवादित.
दुसर्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरचा हा संगीतमय चित्रपट खूप गाजला. त्यावर आधारित अने हिंदी सिनेमेही आले. त्यातला जितेंद्र, जया, प्राण यांचा गुलजार निर्मित ’परिचय’ तर सर्वांनाच परिचित आहे. या मूळ सिनेमाची ही पटकथाही वाचनीय आहे. |
भारतावर अलेक्झांडर राजाचे आक्रमण सुमारे अडिचहजार वर्षांपुर्वी झाले. भारतियांना अलेक्झांडर म्हणता येत नसे म्हणून ते त्याला सिकंदर म्हणत. त्याला अडवले राजा पुरुषोत्तमाने. ग्रीकांना पुरुषोत्तम म्हणता येत नसे म्हणून तो राजा पोरस या नावाने प्रसिद्ध झाला. आताच्या पाकिस्तानमधला चिनाब आणि झेलम नद्यांच्या मधला सुपीक पंजाब म्हणजे पोरसराजाचे राज्य. तक्षशीला आहे तेही तिथेच. भारतियांना या पराक्रमी राजा पुरुषोत्तमाची माहिती मिळावी म्हणून हा पुस्तक प्रपंच.
|
चक्रमपूरच्या राजा चक्रमादित्याचे हे दरबार वृत्त आम्ही अत्यंत कष्टाने आतली माहिती मिळवून आपल्या मनोरंजनासाठी प्रसिद्ध करत आहोत.
हे नाटक वाचल्यावाचल्याच आपल्याला कळेल की यातील सर्व विनोद हे काल्पनिक आहेत आणि ते केवळ आपल्या मनोरंजना साठी आहेत. वाचकांपैकी एखाद्या कुरापती डोक्यात हे वास्तव आहे असे आलेच तर तो निव्वळ योगायोग समजावा. पुन्हा एकदा सांगतो की यातील चक्रम राजा केवळ कल्पना आहे आणि असे राजे कोणाच्या फ़ुटक्या नशीबाने त्यांना लाभलेच तर त्यांनी लेखकावर भलतेसलते आरोप करू नये. |
एक पुस्तक माणसाचे संपूर्ण आयुष्य बदलवू शकते.
होय.
एक पुस्तक एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याला संपूर्ण वेगळे वळण लावू शकते.
अर्थात ही गोष्ट प्रत्येक पुस्तकाला लागू पडतेच असे नाही. पण आयुष्यात असे एक पुस्तक, असा एक विचार , अशी एक वेळ येते की जेव्हा माणूस आपल्या आयुष्याला संपूर्ण वेगळे वळण लावतो.
भगवद्गीता हे असे एक पुस्तक आहे ज्याने अनेकांचे आयुष्य बदलले. सहज सुलभ मराठीत अशी भगवद्गीता उपलब्ध आहे. वाचायला फ़ार तर एक किंवा दोन तास लागतील. विचार करायला एक दोन दिवस जातील. आणि आयुष्याला एक जबरदस्त घुमाव मिळेल.
उघडा. क्लिक करा. वाचा. विचार करा.
एक पुस्तक एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याला संपूर्ण वेगळे वळण लावू शकते.
अर्थात ही गोष्ट प्रत्येक पुस्तकाला लागू पडतेच असे नाही. पण आयुष्यात असे एक पुस्तक, असा एक विचार , अशी एक वेळ येते की जेव्हा माणूस आपल्या आयुष्याला संपूर्ण वेगळे वळण लावतो.
भगवद्गीता हे असे एक पुस्तक आहे ज्याने अनेकांचे आयुष्य बदलले. सहज सुलभ मराठीत अशी भगवद्गीता उपलब्ध आहे. वाचायला फ़ार तर एक किंवा दोन तास लागतील. विचार करायला एक दोन दिवस जातील. आणि आयुष्याला एक जबरदस्त घुमाव मिळेल.
उघडा. क्लिक करा. वाचा. विचार करा.
एक अगदी वेगळ्या प्रकारची रहस्यकथा
हि कथा आहे अर्जुन या १४ वर्षीय हुशार मुलाची, जो अनाथ आहे. त्या अनाथाला साथ मिळते एका कुत्र्याची, त्याचा नाव तो राजा म्हणून ठेवतो. त्याच्या आयुष्यात राधा येते. तिला मोठी बहीण म्हणून तो आयुष्यात जागा देतो. अचानक तिच्या बहिणीची हत्या होते. तिची हत्या कोणी केली? का केली? या प्रशांचे उत्तर तो शोधू लागतो. या प्रवासात त्याला कित्येक धक्के बसतात. यातून त्याच्यातून गुप्तहेर बाहेर येतो.
---- ई साहित्यची पुस्तके मुक्त असतात. एकदम फ़्री |
भावबंध पंचक हे!- ३
द्रौपदीवरील त्रिखंडात्मक कादंबरीचा तृतिय खंड द्रौपदी हे महाभारतातील एक जगावेगळे व्यक्तीमत्व. जगाच्या कोणत्याही साहित्यात अशी व्यक्ती, अशी स्त्री नाही. रूपगर्विता, पाचांची पत्नी, एका स्त्रीच्या वाट्याला येणारे, एका मातेच्या वाट्याला येणारे सर्व प्रकारचे भोग तिने भोगले. राजविलास, वनवास, अज्ञातवास, सर्व सर्व.
द्रौपदीच्या पूर्ण आयुष्याचा वेध घेणारी ही त्रिखंडात्मक कादंबरी एका विद्यार्थिनीने लिहीलेली आहे. तुमची प्रतिक्रिया बहुमोल असेल. ई साहित्यची पुस्तके मुक्त असतात. एकदम फ़्री
|
1857
१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचे महत्त्व अजूनही आपल्याला फ़ारसे जाणवलेले नाही.
त्यापुर्वी जे प्रदेश युरोपियन लोकांनी ताब्यात घेतले तिथल्या लोकांचे जवळपास संपूर्ण शिरकाण करून त्यांनी गोर्यांची केवळ राजकीय सत्ताच नव्हे तर सर्व ्प्रकारचे व्यवहार आपल्या ताब्यात घेतले. उदाहरण म्हणजे अमेरिका ऑस्ट्रेलिया वगैरे. या देशांत एके काळि गोरे नव्हते हे आपल्याला अता खरेही वाटत नाही.
तेच त्यांनी भारतात केले असते. पण मधेच १८५७ घडले .
ते का घडले. कसे घडले. एक ज्वालाग्राही नाटक वाचाच.
ई साहित्यवरची सर्व पुस्तके मुक्त असतात.
त्यापुर्वी जे प्रदेश युरोपियन लोकांनी ताब्यात घेतले तिथल्या लोकांचे जवळपास संपूर्ण शिरकाण करून त्यांनी गोर्यांची केवळ राजकीय सत्ताच नव्हे तर सर्व ्प्रकारचे व्यवहार आपल्या ताब्यात घेतले. उदाहरण म्हणजे अमेरिका ऑस्ट्रेलिया वगैरे. या देशांत एके काळि गोरे नव्हते हे आपल्याला अता खरेही वाटत नाही.
तेच त्यांनी भारतात केले असते. पण मधेच १८५७ घडले .
ते का घडले. कसे घडले. एक ज्वालाग्राही नाटक वाचाच.
ई साहित्यवरची सर्व पुस्तके मुक्त असतात.
कितीही सांगितलं तरी खोटंच वाटेल.
पण सांगणं भाग आहे. नाटक सिनेमा पाहून क्राईम होतात की क्राईम घडलेले पाहून नाटक सिनेमा लिहिले जातात हा तसा सनातन प्रश्न आहे. या पुस्तकातील सर्व एकपात्री प्रयोग मे २०२२ पुर्वी लिहिलेले आहेत. त्यांचा आणि जूनमधील राजकीय घटनांचा काहीही संबंध नाही. उलट हे पुस्तक थोडं आधी प्रकाशित झालं असतं तर लोकांनी म्हटलं असतं की या नाटकामुळेच लोकांना हे सर्व सुचलं. असो. फ़ेक्स्पिअर बोलून गेलाय की राजकारण हा एक रंगमंच आहे. हम सब इस नाटक की कठपुतलियां है. कौन किस समय कहां जायेगी ये तो सिर्फ़ ’उपरवालाही’ जानेगा. एक धमाल पुस्तक. वाचलेच पाहिजे असे. |
पक्षी जीवनावर दोन झक्कास पुस्तकं
एक रानावनातलं, तर एक माणसाळलेलं
एक रानावनातलं, तर एक माणसाळलेलं
अदृश्य खजिन्याची गोष्ट
फ़ार फ़ार जुनी गोष्ट आहे. एक घनदाट जंगल होते.त्या जंगलात एक सिंह राज्य करत होता. त्याला सर्वजण घाबरत आणि त्याचेच सर्वजण ऐकत. एके दिवशी एक कोल्हा त्याच्याकडे आला आणि म्हणाला... लहानपणी आपण सर्वांनीच अशा गोष्टी ऐकल्या असतील. वाचल्याही असतील. या गोष्टींतले प्राणी बोलत. गुंतागुंतीचा विचार करत. एकमेकांना उपदेश करत. एकमेकांवर कुरघोडी करत. यातला कोल्हा लबाड असे. गाढव बिनडोक असे. ससा चतुर असे. हत्ती शांत डोक्याने विचार करी. ईसापनिती, जंगलबुक, हितोपदेश, पंचतंत्र अशा पुस्तकांतून अशा खूप गोष्टी वाचल्याही असतील. गंमत जंमत करत शिकवण देणाऱ्या आणि संस्कार करणाऱ्या या गोष्टी तुम्हाला आठवत असतील वा नसतील कदाचित. पण त्या गोष्टींनी तुमच्या मनावर केलेले खोलवरचे संस्कार मात्र तुमच्या मनातून आजही पुसले गेले नसणार. आणि हीच तर या गोष्टींची खासियत. पुर्वीच्या काळी या आणि अशाच गोष्टींतून मुलं शहाणपण आणि मूल्यं शिकत. त्याचा वापर आयुष्यभर करत. वेगवेगळ्या क्षेत्रांत उच्च शिक्षण घेतलं तरी मूल्यशिक्षण आणि शहाणपणाची शिदोरी मात्र बालपणी याच गोष्टींतून मिळालेली असे. खूप बारकाईने आणि गंभीरपणे विचार केला की हे लक्षात येतं की हा एक फ़ार मोठा खजिना आहे. |
व्यासमुनी मोठ्या आदरपूर्वक परमेश्थिस सांगतात,
"मी हे काव्य माझ्या कल्पनेतून रचले आहे ज्यात वेदाचे ज्ञान आणि इतर आवश्यक ज्ञान जे उपनिषदांत व इतरत्र पसरलेल्या अवस्थेत आहे ते ह्यात गोष्टीरुपांने पुराणकथांच्या स्वरुपात असें दिले आहे किं, आज, काल व उद्या अशा सर्व समयी उपयोगी येईल. जीवनातील नाश, भय, आजार, असणे व नसणे, विविध विचारप्रवाह, जीवनाचे अनेक प्रकार, चारही वर्णांची कर्तव्ये, वैराग्य, संन्यास, प्रपंच इत्यादि गोष्टी तसेंच, चार युगाची माहिती, ऋग्, साम, यजु हे वेद आणि आत्म्याचे अध्यात्म व जीवाचे अध्यात्म असें विविध विषय विविध कथांतून सांगितले आहेत. न्याय शास्त्र, शरीरशास्त्र, रोगांचे शास्त्र, इतर जिवांबद्दलची दयाबुद्धि ह्यांचासुद्धा परामर्श घेतला आहे". तसेंच यात्रेची ठिकाणे, इतर तीर्थक्षेत्रे, पवित्र नद्या, पर्वत, समुद्र, महत्वाची वने, नगरे, राष्ट्रे, भाषा, कल्प, लोकांच्या विविध चालीरीती, असे जे, जे विषय माणसास ज्ञात होणे जरुरीचे आहे ते सर्व त्यात घेतलेले आहेत.” |
नर्मदा परिक्रमा -भाग ३
परिक्रमा कधीही संपत नाही. ती वर्तुळाकार आहे, तिथे सुरुवातही नाही आणि शेवटही नाही. आपण आपल्या तर्कबुद्धीने कुठल्यातरी एका बिंदूला सुरुवात समजून तिथवर पुन्हा येऊन पोचण्याच्या प्रक्रियेला परिक्रमा असे संबोधतो. मात्र अनादि अनंत कालचक्रा प्रमाणे असलेली, निश्चित उगम बिंदू तसेच समुद्र देवते मध्ये विलीन होण्याचे कुठलेही निश्चित चिन्ह मागे न ठेवणारी नर्मदा मैया आणि तिची परिक्रमा देखील अनादी आणि अनंत आहे. प्रश्न आहे तो माझ्या सुरू होण्याचा आणि संपण्याचा. हे दोन्ही बिंदू माझ्या हातात नाही. मात्र या दोन मधला प्रवास सुकर व्हावा म्हणून मैया मात्र माझ्या पाठीशी आजीवन आहे… तशीच ती तुमच्याही पाठीशी आजीवन आहेच.
नर्मदे हर, जिंदगी भर…
|
अशी काही पुस्तके असतात
जी तुमच्या आयुष्याची दिशा आणि दशा बदलून टाकतात. एक प्रचंड मौल्यवान पुस्तक. विनामूल्य आणि अमूल्य. हुशार कुणाला म्हणावे? जो परीक्षेत जास्त मार्क घेतो त्याला?
किंवा जो प्रत्येक क्षणी जागरुकतेने वागतो त्याला? 'होशियार' या फारसी शब्दाचा अर्थ 'जागरुक व्यक्ती', असा आहे. आता वरील प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळाले असेलच. जागरुक असलेली माणसेच आयुष्यात काही तरी भव्य काम करून जातात. तुम्हालाही खरोखर हुशार' आणि खडबडून जागे व्हायचे असेल तर पंकज कोटलवार यांचे 'सत्ता आणि शक्ती' हे अद्भुत पुस्तक सूर्याइतकाच लख्ख प्रकाश तुमच्यासाठी घेऊन आले आहे. सत्ता आणि शक्तीने जगाचे वाटोळे केलेले आपण अनेकदा पाहिले. कारण या दोन्ही गोष्टी अनेकदा दुष्टांच्या हाती येतात. दुष्टांच्या हातीच का येतात? तर त्यासाठी आवश्यक रहस्ये दुष्ट लोक लवकर माहीत करून घेतात. या काळात सज्जन लोक काय करतात? फक्त तक्रारी, टीका आणि आळस. नेमका यावरच लेखकाने प्रखर हल्ला चढवला आहे. प्रत्येक चांगल्या माणसाने या पुस्तकातील रहस्ये माहीत करून घ्यावीत आणि सत्ता व शक्तीचे लगाम हाती घ्यावेत. तरच जगाचे भले होण्याची शक्यता आहे. सबकुछ सीखा तुमने
अब सीखो होशियारी |
’शंभर वर्षे पुढे’ ही ६५० पानांची एक गंभीर विषयावरची मजेदार कादंबरी आहे.
---- एका चलाख चोराने आजच्या सर्वसत्ताधीशांकडून जगातली सर्वात किंमती गोष्ट चोरली. आणि ते मागावर लागल्यावर त्यांना चुकवता चुकवता, तो शंभर वर्षे पुढच्या काळात पोहोचला खरा! पण ती सगळ्यात किंमती गोष्ट त्याच्याकडून हिरावून घेण्यासाठी, त्या काळातले सर्वसत्ताधीश देखील त्याच्या मागे लागले. चोर किती पळणार? कुठे पळणार? कशी राखणार ती सर्वात किंमतीची गोष्ट? ती सर्वात मौल्यवान गोष्ट होती- त्याचं स्वातंत्र्य… ---- एक वेगवान कथा. एक नाविन्यपुर्ण थीम. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट या कादंबरीतली, ती म्हणजे ’जगातली सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती?’ या प्रश्नाचा वेध. जगातील सर्व सत्ताधीश, कालचे, आजचे आणि उद्याचे विरुद्ध त्या त्या काळातील जनता. प्रत्येक काळातील प्रश्न वेगळे, संघर्षांचे स्वरूप वेगळे, औजारे आणि हत्यारे वेगवेगळी. पण अंतःस्थ प्रेरणा एकच. स्वातंत्र्य. सामाजिक, राजकीय जाणिवा जागृत असणार्या वाचकांसाठी एक महाकादंबरी पेश करत आहोत. शंभर वर्षे पुढे- लेखक: संयम बागायतकर. फ़क्त ई साहित्य प्रतिष्ठानवर उपलब्ध. |
ई साहित्यच्या "कानगोष्टी" नक्की ऐका.
कानगोष्टी ऐकण्यासाठी इथे क्लिक करा
एक सुंदर कानगोष्ट
मन तळ्यात मळ्यात लेखिका: अदिती कापडी अभिवाचक: निलिमा कर्णे वास यावा फ़ुलाचा, पण फ़ूल दिसू नये;
कानी यावेत सूर, पण कुठून कळू नये; असं आपण आश्चर्याच्या वाटेवर आत आत स्वतःचा शोध घेत निघावं --मंगेश पाडगांवकर (गिरकी) मुलींचं एक वय असतं. जणू सुरवंटाचं पाखरू होतं आहे असं. काय होतंत्य काही समजतच नाही. मन एक सांगतं. बुद्धी अडवते. पण मन परत परत काही बोलतच रहातं. आणि बुद्धी त्याला समजावत रहाते. एकदा तळ्यात उतरून मनसोक्त डुंबावं वाटतं. तर दुसरं मन मळ्यात घेऊन जायला बघतं. एका मुलीच्या या धडधडत्या हृदयाचं चित्तवेधक शब्दांकन केलं आहे यात. लेखिका आहेत अदिती कापडी आणि ध्वनी आहे निलिमा कर्णे यांचा. ऐका आणि आपल्या प्रतिक्रिया दोघींनाही कळवा. |
ई साहित्य म्हणजे भिंती, दारं नसलेलं वाचनालय... कुणीही यावं काहीही न्यावं...
---वाचकांनी कितीही पुस्तकं नेली तरी या अक्षय्यपात्रातून काहीच कमी होत नाही.-- आहे की नाही गंमत!
या मित्रांनो! घेऊन जा! लुटा! लुटा! लुटून न्या!
ही सर्व पुस्तकं फ़ुकट नाहीत
यामागे अनेकांचे कष्ट व पैसे आहेत.
पण तरीही आम्ही ते वाचकांना विनामूल्य घेऊ देतो.
कारण ई पुस्तक एकदा बनलं की एकजण वाचो वा एक लाख.
आमचं काहीच कमी होत नाही.
उलट आनंद वाढतो.
मजा येते.
पण
तुम्ही ते फुकट का घ्यावं?
तुम्हालाही काही देता येईल.
असे काही द्या ज्याने ई साहित्यच्या लेखकांना, टीमला आणि तुम्हाला आनंद मिळेल
आणि तुमचं काहीच कमी होणार नाही.
तुम्ही तुमचे आशिर्वाद आणि शुभेच्छा द्या
लेखकांना फोन करून दाद द्या
आपल्या मित्रांचे मेल पत्ते ईसाहित्यला द्या
मित्रांना आमच्याबद्दल मेल आणि Whatsapp करा
ई साहित्यचे फ़ेसबुक पेज, इन्स्टाग्राम, टेलिग्राम यांवर स्वतः जा व इतरांना आमंत्रित करा. सोशल मिडियावर ई साहित्यचा प्रचार करा.
सर्वात बहुमोल अशा तुमच्या सूचना द्या
दाद म्हणजे स्तुतीच असावी असे नाही. प्रांजळ मत, सूचना, टीका, विरोधी मत यांचे स्वागत आहे. प्रामाणिक मत ज्याने लेखकाला व ईसाहित्य टीमला प्रगती करण्यासाठी दिशा ठरवण्यास मदत होईल. मराठीत अधिक कसदार लेखन व्हावे व त्यातून वाचक अधिकाधिक प्रगल्भ व्हावा. अखेर संपूर्ण समाज एका नव्या प्रबुद्ध उंचीवर जात रहावा.
ही सर्व पुस्तकं फ़ुकट नाहीत
यामागे अनेकांचे कष्ट व पैसे आहेत.
पण तरीही आम्ही ते वाचकांना विनामूल्य घेऊ देतो.
कारण ई पुस्तक एकदा बनलं की एकजण वाचो वा एक लाख.
आमचं काहीच कमी होत नाही.
उलट आनंद वाढतो.
मजा येते.
पण
तुम्ही ते फुकट का घ्यावं?
तुम्हालाही काही देता येईल.
असे काही द्या ज्याने ई साहित्यच्या लेखकांना, टीमला आणि तुम्हाला आनंद मिळेल
आणि तुमचं काहीच कमी होणार नाही.
तुम्ही तुमचे आशिर्वाद आणि शुभेच्छा द्या
लेखकांना फोन करून दाद द्या
आपल्या मित्रांचे मेल पत्ते ईसाहित्यला द्या
मित्रांना आमच्याबद्दल मेल आणि Whatsapp करा
ई साहित्यचे फ़ेसबुक पेज, इन्स्टाग्राम, टेलिग्राम यांवर स्वतः जा व इतरांना आमंत्रित करा. सोशल मिडियावर ई साहित्यचा प्रचार करा.
सर्वात बहुमोल अशा तुमच्या सूचना द्या
दाद म्हणजे स्तुतीच असावी असे नाही. प्रांजळ मत, सूचना, टीका, विरोधी मत यांचे स्वागत आहे. प्रामाणिक मत ज्याने लेखकाला व ईसाहित्य टीमला प्रगती करण्यासाठी दिशा ठरवण्यास मदत होईल. मराठीत अधिक कसदार लेखन व्हावे व त्यातून वाचक अधिकाधिक प्रगल्भ व्हावा. अखेर संपूर्ण समाज एका नव्या प्रबुद्ध उंचीवर जात रहावा.
॥ Marathi Books ॥
मित्रा..!!
आपण आपला वेळ वाचनात घालवावा. इतरांनाही वाचनाचा आग्रह करावा. पुस्तकामुळे आपले व्यक्तीमत्त्व चमकत जाते. आपल्या विचारांचा आवाका वाढत जातो. आपण श्रीमंत होत जातो. जसे दूध, तूप, बदाम, पिस्ते खाऊन व व्यायाम करून आपले शरीर हळू हळू सुदृढ होत जाते तसेच पुस्तके वाचत वाचत आपले मन व बुद्धी सुदृढ होत जाते. विचार विशाल होतात. दृष्टी स्वच्छ होते. हे एका दिवसात, एका वर्षात होत नाही. ते सतत व्हावे लागते.
आम्ही बदाम पिस्ते तर मोफ़त वाटू शकत नाही. आम्ही चौदा वर्षे मोफ़त ई पुस्तके दिली आणि यापुढेही काही प्रमाणात देणार आहोत. आणि व्यायाम तर तुम्हीच करायचा. वाचनाचा.
या वेबसाईटवर कुठेही बिनधास्त क्लिका. मोकळ्या मनाने फ़ेरफ़टका मारा. अगदी एखाद्या मंदिरात फ़िरता तसे. किंवा बागेत. स्वतःच्या घरात.
Free Marathi books उत्तम दर्जेदार पुस्तकं. व्हायरस नाही. सुखाचा खजिना .
ई पुस्तकांशी मैत्री करा आणि मित्रांशी ई-पुस्तकांची ओळख करून द्या. वाचलेल्या पुस्तकांच्या लेखकांना अभिप्राय कळवा. आनंद. फ़क्त घेऊ नका. द्या.
मनुष्य-जन्म, आई-वडील, प्राण-वायू, देशाचे नागरिकत्व आणि ईसाहित्य प्रतिष्ठानची बहुतांश ई-पुस्तके विनामूल्य मिळतात. पण म्हणून त्यांना कमी लेखाल तर ती मोठी चूक ठरेल. इथे तुम्हाला अत्यंत दर्जेदार पुस्तके मिळतील.
या मराठी पुस्तकांचे कायदेशीर अधिकार ई साहित्य प्रतिष्ठानकडे आहेत.
सर्व काळ सर्व पुस्तके Free देणे शक्य नाही. ई साहित्यवरही काही पुस्तकं विक्रीसाठी ठेवणे सुरू करत आहोत. आपण ही पुस्तकेही विकत घेऊन वाचावी ही विनंती. तसेच ई साहित्यच्या “देणगी” विभागाला भेट द्या. आपल्या देणगीची या चळवळीला गरज आहे.
पुस्तके वाचत असताना : संगीताचा आस्वादही घेऊ शकता : एकदा संगीत सेक्शनला भेट द्या : मराठी गाणी ऐका.
मूळ प्राकृत ज्ञानेश्वरी आणि नेहमीच्या वापरातल्या मराठीतली भावार्थ ज्ञानेश्वरी, दोन्हींचे खुप सुंदर ऑडिओ आहेत. एकदा ऐका. कान तृप्त तृप्त होतील.
ई साहित्य प्रतिष्ठान : एक प्रसन्न अनुभव
आपण आपला वेळ वाचनात घालवावा. इतरांनाही वाचनाचा आग्रह करावा. पुस्तकामुळे आपले व्यक्तीमत्त्व चमकत जाते. आपल्या विचारांचा आवाका वाढत जातो. आपण श्रीमंत होत जातो. जसे दूध, तूप, बदाम, पिस्ते खाऊन व व्यायाम करून आपले शरीर हळू हळू सुदृढ होत जाते तसेच पुस्तके वाचत वाचत आपले मन व बुद्धी सुदृढ होत जाते. विचार विशाल होतात. दृष्टी स्वच्छ होते. हे एका दिवसात, एका वर्षात होत नाही. ते सतत व्हावे लागते.
आम्ही बदाम पिस्ते तर मोफ़त वाटू शकत नाही. आम्ही चौदा वर्षे मोफ़त ई पुस्तके दिली आणि यापुढेही काही प्रमाणात देणार आहोत. आणि व्यायाम तर तुम्हीच करायचा. वाचनाचा.
या वेबसाईटवर कुठेही बिनधास्त क्लिका. मोकळ्या मनाने फ़ेरफ़टका मारा. अगदी एखाद्या मंदिरात फ़िरता तसे. किंवा बागेत. स्वतःच्या घरात.
Free Marathi books उत्तम दर्जेदार पुस्तकं. व्हायरस नाही. सुखाचा खजिना .
ई पुस्तकांशी मैत्री करा आणि मित्रांशी ई-पुस्तकांची ओळख करून द्या. वाचलेल्या पुस्तकांच्या लेखकांना अभिप्राय कळवा. आनंद. फ़क्त घेऊ नका. द्या.
मनुष्य-जन्म, आई-वडील, प्राण-वायू, देशाचे नागरिकत्व आणि ईसाहित्य प्रतिष्ठानची बहुतांश ई-पुस्तके विनामूल्य मिळतात. पण म्हणून त्यांना कमी लेखाल तर ती मोठी चूक ठरेल. इथे तुम्हाला अत्यंत दर्जेदार पुस्तके मिळतील.
या मराठी पुस्तकांचे कायदेशीर अधिकार ई साहित्य प्रतिष्ठानकडे आहेत.
सर्व काळ सर्व पुस्तके Free देणे शक्य नाही. ई साहित्यवरही काही पुस्तकं विक्रीसाठी ठेवणे सुरू करत आहोत. आपण ही पुस्तकेही विकत घेऊन वाचावी ही विनंती. तसेच ई साहित्यच्या “देणगी” विभागाला भेट द्या. आपल्या देणगीची या चळवळीला गरज आहे.
पुस्तके वाचत असताना : संगीताचा आस्वादही घेऊ शकता : एकदा संगीत सेक्शनला भेट द्या : मराठी गाणी ऐका.
मूळ प्राकृत ज्ञानेश्वरी आणि नेहमीच्या वापरातल्या मराठीतली भावार्थ ज्ञानेश्वरी, दोन्हींचे खुप सुंदर ऑडिओ आहेत. एकदा ऐका. कान तृप्त तृप्त होतील.
ई साहित्य प्रतिष्ठान : एक प्रसन्न अनुभव
ई साहित्य प्रतिष्ठान वाचकांकडून पुस्तकाचे पैसे घेत नाही. लेखकांकडून प्रकाशनाचा खर्च मागत नाही.
मग ई साहित्य प्रतिष्ठान चालते कसे?
हे वाचाल तर कळेल
मग ई साहित्य प्रतिष्ठान चालते कसे?
हे वाचाल तर कळेल
खजिनाच हा...
ई पब- ३ नव्या युगाचा मंत्र
श्यामची आई आणि पंचतंत्र आता ईपब ३ स्वरूपात
ई पब हे PDF सारखेच पण वाचकांच्या सोयीचे रीडर असते. त्यात आपल्या सोयीनुसार रंग, प्रकाश व अक्षरांची साइझ कमीजास्त करता येते.
ई साहित्यवर ई पब ३ हा सर्वात अद्ययावत प्रकार वापरला जातो.
हे वाचण्यासाठी किंडल असल्यास वापरा किंवा आपल्या मोबाईलवर वा कंप्युटरवर epub reader app- download - install-open करा.
हे epub.03 अद्ययावत वर्शन आहे. त्यासाठी मोबाईलवर LITHIUM नावाचा रीडर चांगले रिझल्ट देतो. Laptop PC साठी READIUM हे गुगल app चांगले आहे. ही दोन्ही app विनामूल्य आहेत.
ई साहित्यवर ई पब ३ हा सर्वात अद्ययावत प्रकार वापरला जातो.
हे वाचण्यासाठी किंडल असल्यास वापरा किंवा आपल्या मोबाईलवर वा कंप्युटरवर epub reader app- download - install-open करा.
हे epub.03 अद्ययावत वर्शन आहे. त्यासाठी मोबाईलवर LITHIUM नावाचा रीडर चांगले रिझल्ट देतो. Laptop PC साठी READIUM हे गुगल app चांगले आहे. ही दोन्ही app विनामूल्य आहेत.
पुस्तकाच्या कव्हरवर फ़क्त एक क्लिक आणि पुस्तक हजर
गेल्या ५ वर्षांत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांच्या याद्या व लिंक्स
ई साहित्यच्या सर्व पुस्तकांची यादी
आम्हाला काहीच वर्ज्य नाही
सतत उत्तमाचा ध्यास हेच आमचे ब्रीद
सतत उत्तमाचा ध्यास हेच आमचे ब्रीद
व्यक्तिमत्वविकास साधण्यासाठी इथे क्लिक करा
बालसाहित्य
सह्याद्रीचा सिंह गर्जतो! शिव शंभू राजा! दरीदरीतून नाद गुंजला!
महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र माझा
दुर्गभ्रमण
दुर्गभ्रमण : ई साहित्य प्रतिष्ठानने २८० किल्ल्यांची इत्थंभूत माहिती देणार्या स्वतंत्र २८० पुस्तिका निर्माण करायचा संकल्प केला आहे. आजवर सुमारे ६० दुर्गांच्या पुस्तिका तयार झाल्या असून इतर दुर्गांच्या माहिती संकलनाचे काम सुरू आहे. आपण जर दुर्ग भ्रमण करत असाल व आपण आपल्याजवळची माहिती व फ़ोटो देऊ इच्छित असाल तर संपर्क साधा.
दुर्गभ्रमण : ई साहित्य प्रतिष्ठानने २८० किल्ल्यांची इत्थंभूत माहिती देणार्या स्वतंत्र २८० पुस्तिका निर्माण करायचा संकल्प केला आहे. आजवर सुमारे ६० दुर्गांच्या पुस्तिका तयार झाल्या असून इतर दुर्गांच्या माहिती संकलनाचे काम सुरू आहे. आपण जर दुर्ग भ्रमण करत असाल व आपण आपल्याजवळची माहिती व फ़ोटो देऊ इच्छित असाल तर संपर्क साधा.
व्यक्तिमत्वविकास, मनोविकास ,मनोधैर्यात्मक (Motivational) पुस्तके
मराठी तरुणांना उद्योगी जगतात मार्गदर्शक ठरतील, प्रगतीसाठी दिशा दाखवणारी पुस्तके.
मराठी तरुणांना उद्योगी जगतात मार्गदर्शक ठरतील, प्रगतीसाठी दिशा दाखवणारी पुस्तके.
ई साहित्यचे दोन अद्ययावत विभाग
ई पब आणि कानगोष्टी
कोणत्याही धंदेवाईक साइटहून उत्कृष्ट दर्जा
ई पब आणि कानगोष्टी
कोणत्याही धंदेवाईक साइटहून उत्कृष्ट दर्जा
हजारो मराठी पुस्तके विषयवार >>
खालच्या चित्रांवर क्लिका. खजिन्याची दालनं उघडा
खालच्या चित्रांवर क्लिका. खजिन्याची दालनं उघडा
गझल
|
त्रिवेणी , चारोळी
|
बालनेटाक्षरी
|
ई श्टाप
|
व्हिडिओ
|
पुस्तकांची यादी व थोडक्यात ओळख
पुस्तक शोधायचे कसे?
वरची यादी उघडा आणि सेव्ह करून ठेवा.
त्यातल्या हव्या त्या पुस्तकाचे नांव copy करा
मग कोणत्याही पेजच्या सर्वात वर Search आहे तिथे Paste करा आणि Enter करा. पुस्तक हजर!
Open केलेले पुस्तक जर नंतर वाचायचे असेल तर त्यावर Right click करून Save as करून आपल्या PC / mobile वर घ्या.
पुस्तक शोधायचे कसे?
वरची यादी उघडा आणि सेव्ह करून ठेवा.
त्यातल्या हव्या त्या पुस्तकाचे नांव copy करा
मग कोणत्याही पेजच्या सर्वात वर Search आहे तिथे Paste करा आणि Enter करा. पुस्तक हजर!
Open केलेले पुस्तक जर नंतर वाचायचे असेल तर त्यावर Right click करून Save as करून आपल्या PC / mobile वर घ्या.