· ई साहित्य प्रतिष्ठानचे सभासदत्व विनामूल्य आहे.
· सभासदांना ई साहित्यची पुस्तके ई मेलने किंवा whatsapp द्वारे पाठविण्यात येतात.
· आपण आपल्या आप्त मित्रांचे मैत्रिणींचे ई मेल पत्ते किंवा whatsapp number पाठवल्यास त्यांनाही ई पुस्तके विनामूल्य पाठवली जातील.
· दहाहून अधिक ई मेल्स पाठवणार्यांना VIP सभासदत्व दिले जाते.

ई साहित्य प्रतिष्ठानची ebook Whatsapp Broadcast सेवा सुरू करत आहोत.
त्या अंतर्गत आपल्याला नियमित नवीन मराठी ई पुस्तक Whats app द्वारे पाठवले जाईल.
whatsapp वर विनामूल्य पुस्तकासाठी 9987737237 वर आपले नांव व शहराचे नांव whatsapp करा.

|
|
लेखकांसाठी... (सूचना, कार्यपद्धती आणि अटी)
लेखक म्हणून नोंदणी करण्यापुर्वी व साहित्य जमा करण्यापुर्वी सर्व अटी नीट वाचाव्यात व त्या मान्य असल्याचे कळवावे
सर्व लेखक व कवी महोदय व महोदया,
आदरपुर्वक नमस्कार
सर्वप्रथम आम्ही आपले ईसाहित्यमध्ये मनापासून स्वागत करतो. आपण ई साहित्य प्रतिष्ठानशी संपर्क केल्याबद्दल आपले शतशः आभार मानतो. आपले लेखन ईसाहित्यकडे [email protected] याच मेलवर प्रकाशनाला पाठवा.
तत्पुर्वी एकदा खाली दिलेली ई साहित्यची कार्यपद्धती वाचावी व ती मान्य असेल तरच पुढील व्यवहार करावे ही विनंती.
------------
ई साहित्य प्रतिष्ठान ही संस्था कवी लेखकांनी एकत्र येऊन इंटरनेटचा उपयोग करून पुस्तकं प्रसिद्ध करण्यासाठी २००८ साली स्थापन केली. हे सर्व कवी लेखक इंटरनेटवर भेटले. सर्वजण वेगवेगळ्या गांवचे आणि वयाचे आहेत. कमी प्रसिद्ध लेखकांना एका दुष्टचक्राला तोंड द्यावे लागते. ते फ़ारसे प्रसिद्ध नसतात. त्यामुळे प्रकाशक त्यांचे पुस्तक करायला (आर्थिक कारणांमुळे) घाबरतात. किंवा पैसे मागतात. आणि त्यांचे पुस्तक प्रकाशित नसल्यामुळे ते प्रसिद्ध होत नाहीत. हे ते दुष्टचक्र. शिवाय पुस्तक प्रकाशित न झाल्यामुळे लेखकांना आपल्या लेखनाचा कस कळणं कठीण जातं. ई साहित्य हा त्यावरचा एक उपाय आहे. दुसरेही एक दुष्टचक्र आहे. पुस्तकांचे खरेदीदार कमी. त्यामुळे कमी प्रति छापल्या जातात. त्यामुळे छापायला नगामागे खर्च जास्त येतो. व त्यामुळे पुस्तकांच्या किंमती जास्त ठेवाव्या लागतात. व त्यामुळे खरेदीदार कमी होतात. हे ते दुसरे दुष्टचक्र. या दोन्हीही दुष्टचक्रांचा भेद करण्यासाठी ई साहित्यने ई पुस्तकांचा प्रयोग सुरू केला आहे. यातून वाचकांची संख्या वाढवणे हे उद्दिष्ट आहे. याला किती यश मिळेल माहित नाही. आमचे पहिले उद्दिष्ट बारा लाख नोंदित वाचकांचे आहे (बारा कोटी मराठी माणसांचा फ़क्त एक टक्का)
------------
प्रकाशनाबद्दल माहिती
आर्थिक बाबी :सध्यातरी ई साहित्य प्रतिष्ठान वाचकांकडून पैसे घेत नाही. लेखकांकडूनही पैसे घेत नाही. मात्र त्यामुळे लेखकांकडून विनामूल्य साहित्याची अपेक्षा ठेवते. लेखकांना कोणतेही मानधन देत नाही. इच्छा असूनही. सध्या वाचकांची संख्या वाढवण्यासाठी हे विनामूल्य वितरण करतो. मात्र इच्छा ही आहे की मराठी लेखकांना भरघोस मानधन मिळावे आणि चांगल्या लेखकांना केवळ लिखाणावर चांगल्या दर्जाचे जीवनमान उपलब्ध व्हावे. हे स्वप्न नाही. ध्येय आहे. त्यामुळे भविष्यात ई साहित्य प्रतिष्ठान आर्थिक विचार करेलच. पण सध्यातरी आम्ही लेखकांना पैसे देत नाही. तसेच प्रकाशन करण्याचे पैसे घेत नाही. ही संस्था पूर्णपणे नॉनकमर्शिअल आहे. सर्व कार्यकर्ते सभासद स्वतःचे पैसे खर्च करून काम करतात. याच संदर्भातच अजून एक. सध्या प्रायोगिक तत्वावर काही पुस्तके विक्री करण्यास सुरुवात केली होती. ही विक्री Online असून वाचकाकडून लेखकाच्या अकाउंटमधेच पैसे ट्रान्स्फ़र होत असत. म्हणजे १००% पैसे लेखकालाच मिळत. हे केवळ प्रायोगिक होते. कृपया गैरसमज नसावा.
वितरणाबाबत : ई-साहित्य प्रकाशनाची ई-बुक्स ही छापील स्वरुपात प्रकाशित न होता थेट इलेक्ट्रौनिक स्वरुपात प्रकाशित होतात. म्हणजेच ती ओरिजिनल ई बुक्स आहेत. ती मुख्यतः PDF स्वरुपात असतात. अनेक पुस्तके epub असतात. w3c या युनोच्या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फ़े ई साहित्यला जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान मिळाले आहे. प्रकाशित झाल्यानंतर ती ई मेलद्वारे व Whatsapp द्वारे पाच लाखांहून अधिक वाचकांपर्यंत पोहचतात आणि त्यांच्या मार्फ़त पुढे त्यांचा प्रवास सुरुच राहतो; अगदी जगाच्या कानाकोपर्यातल्या मराठी रसिकाच्या ईन-बॉक्स पर्यंत. त्याशिवाय लक्षावधी वाचक ई साहित्यच्या वेबपोर्टल्सना (www.esahity.com आणि www.esahity.in) भेट देऊन आपले पुस्तक वाचतात. याशिवाय इतर अनेक मराठी वेबपोर्टल आणि APP वरून ई साहित्यची पुस्तकं लाखॊ लोकांपर्यंत जातात. ई साहित्यचे app आहेच. नवीन app ही येत आहे. शिवाय whatsapp वरूनही पुस्तकांचे वितरण होत असते. पुस्तके जास्तीत जास्त वाचकांनी वाचावी यासाठी यातली काही पुस्तके आम्ही ई मेल ने तसेच ब्ल्यु टुथ, पेन ड्राईव्ह, सिडी, मोबाईल ऍप, whatsapp आदी मार्गानेही वितरित करत असतो. तसेच वाचकच अनेकदा आमच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करून परस्पर ती पुस्तके इतरांना देत असतात. २०१९ मध्ये ईसाहित्यवरून अर्धा कोटी पुस्तकांचे डाऊनलोड झाले. २०२० मध्ये ते १ कोटीवर जाईल अशी अपेक्षा आहे.
पुस्तकाच्या व लेखनाच्या कॉपीराईटबद्दल: ई साहित्यद्वारे प्रकाशित होणार्या पुस्तकातील साहित्याचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित असून पुस्तकाचे किंवा त्यातील अंशाचे पुनर्मुद्रण वा नाट्य, चित्रपट किंवा इतर रुपांतर करण्यासाठी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे. तसे न केल्यास लेखक अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करू शकतात. यासाठी आपले पुस्तक प्रसिद्ध झाल्याच्या तारखेचा पुरावा जपून ठेवावा. ईमेलची तारीख, फ़ेसबुकची तारीख हेही पुरावे चालतात. शक्यतो लेखकांनी आपल्याला जमेल तसा, घरच्या घरी किंवा एखाद्या हॉलमध्ये, किंवा Online पुस्तक प्रकाशनाचा सोहळा करावा. व त्याचे फ़ोटो व बातमी ई साहित्यकडे आणि पत्रकारांकडे पाठवावी. बातमी छापली नाही तरी हे पत्र आणि फ़ोटो हा पुरावा बनतो. अशा प्रकारच्या कारवाईची गरज पडेल तेव्हा ई साहित्य प्रतिष्ठान आपल्याकडचा सर्व पुरावा लेखकांच्या मदतीला देईल. मात्र अशा कारवाईत ई साहित्य प्रतिष्ठान पार्टी रहाणार नाही.
पुर्वप्रकाशित पुस्तक: जर आपले पुस्तक यापुर्वी प्रकाशित झालेले असेल तर ई साहित्य वरून पुनःप्रकाशित करण्यापुर्वी पहिल्या प्रकाशकाची NOC लागेल. एकाच वेळी एक पुस्तक एकाहून अधिक प्रकाशकांकडून प्रकाशित करणे हा गुन्हा नसला तरी नैतिकतेनुसार अयोग्य असते.
ई साहित्यने बनवलेल्या ई पुस्तकावर ई साहित्यचा हक्क असतो. लेखकाला आपले पुस्तक दुसर्या प्रकाशकाकडून पुनःप्रकाशित करायचे असल्यास त्याने ई साहित्यला तसे कळवणे अपेक्षित आहे. तसेच ई साहित्यने प्रकाशित केलेले पुस्तक जसेच्या तसे इतर प्रकाशनांसाठी वापरणे अनुचित ठरेल. यातील कोणत्याही परिस्थितीत एकदा ई साहित्यवर प्रकाशित झालेले पुस्तक साइटवरून काढण्य़ाची विनंती स्विकारली जाणार नाही.
ई साहित्यच्या कार्यपद्धतीबद्दल : आपल्या साहित्याचे प्रकाशन होण्यापुर्वी www.esahity.com वर (तसेच www.esahity.in वरही ) नजर टाकावी ही विनंती. ई साहित्य प्रतिष्ठानची संपूर्ण माहिती चित्रांसह मिळेल. त्यामुळे ई साहित्यने प्रकाशित केलेली पुस्तके असंख्य ठिकाणी दिसतात. कधीकधी कोणी या पुस्तकांचा वापर स्वतःच्या आर्थिक फ़ायद्यासाठीही करतात असे आम्हाला कळले आहे. अगदी ई साहित्यने प्रकाशित केलेली पुस्तके काही लोक लेखकाला किंवा ई साहित्यला न विचारता परस्पर विकतात असेही कळले. तसेच यातील एखादे पुस्तक लेखकाचे नाव बदलून स्वतःच्या नावाने करणे अगदी सहज सोपे आहे. इंटरनेट हे दुधारी शस्त्र आहे. त्याचे जेवढे फ़ायदे तेवढेच तोटेही आहेत. याची कल्पना आपल्याला असावी.
ई साहित्यने प्रकाशित केलेल्या ई पुस्तकाचे अधिकार ई साहित्य प्रतिष्ठान स्वतःकडे ठेवते. ते अधिकार फ़क्त त्या आवृत्तीपुरते असतात. ती आवृत्ती कोणालाही कुठेही वेबसाइटवर पोस्ट करण्यापुर्वी ई साहित्यची लेखी परवानगी घ्यावी लागते. अगदी खुद्द लेखकालाही ती परवानगी घ्यावी लागते. मात्र पुस्तकातील लेखनाचे (कंटेंटचे) सर्वाधिकार लेखकाकडेच असतात. लेखनावर लेखक कवीचाच हक्क असल्यामुळे तुम्ही आपले हे लेखन पुन्हा इतर कोणातर्फ़े, इतर कोणत्याही स्वरूपात पुनःप्रकाशित करू शकता. फ़क्त त्याची पूर्वकल्पना ई साहित्यला देणे अपेक्षित आहे. तसेच जर ई साहित्य तर्फ़े बनवलेले कव्हर व लेआऊट वापरायचे झाल्यास त्याचा मोबदला कलाकाराला देणेही उचित ठरेल. पुस्तक प्रकाशित करण्यापुर्वी काही पुस्तकांचे ई साहित्यतर्फ़े proofreadinga होते. असे पुस्तक इतर प्रकाशकांकडून पुनःप्रकाशित करायचे झाल्यास त्याचा मोबदलाही देणे आवश्यक आहे. सद्या एक पुस्तक प्रकाशित करण्यासाठी सुमारे १० ते २०हजार रुपयांचा खर्च होतो जे ई साहित्य स्वतः करते. लेखकाकडून घेत नाही. मात्र असे पुस्तक इतर प्रकाशकांकडून (किंवा स्वतः) प्रकाशित करण्यापुर्वी तो खर्च ई साहित्यला परत करावा लागेल. कोणत्याही परिस्थितीत एकदा ई साहित्यवर प्रकाशित झालेले पुस्तक साइटवरून काढण्य़ाची विनंती स्विकारली जाणार नाही.
या पुर्वी प्रकाशित झालेल्या पुनःप्रकाशन किंवा पुर्वप्रकाशित छापील पुस्तकाचे ई पुस्तक करायचे असल्यास : आपले पुस्तक यापुर्वीच दुसर्या प्रकाशकाने प्रकाशित केलेले असल्यास पुस्तकाच्या सॉफ़्ट कॉपीबरोबरच आधीच्या प्रकाशकाचे ना हरकत पत्र (NOC) आवश्यक आहे. हा नियम इतर वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या पुस्तकांनाही लागू होतो. अशी सुस्पष्ट शब्दांतली लेखी NOC नसेल तर ईसाहित्य पुस्तक प्रकाशित करत नाही. लेखकांनी अशी माहिती लपवून ठेवल्यास ती त्यांच्या कायदेशीर अंगलट येऊ शकते.
ISBN : आजवर ई साहित्यच्या पुस्तकांवर ISBN नव्हता व नसतो. भविष्यकाळात तो घेण्याचा विचार सुरू आहे.
ePub : ई साहित्यची काही पुस्तके ई पब मध्ये उपलब्ध आहेत व लवकरच यांत वाढ होईल.
छापील पुस्तके : ई साहित्य प्रतिष्ठानतर्फ़े छापील पुस्तक प्रकाशन व विक्रीचा विचार सुरू आहे. यात इतर प्रकाशनांतर्फ़े छापलेली पुस्तके तसेच खुद्द लेखकाने स्वतःच छापून घेऊन प्रकाशित केलेली पुस्तके यांचाही समावेश केला जाईल.
आपण आपले पुस्तक ई साहित्य प्रतिष्ठानतर्फ़े प्रकाशित करण्याचा निर्णय घेतल्यास आम्हाला आनंदच होईल. कृपया लवकरात लवकर आपल्या पुस्तकाची सॉफ़्ट कॉपी (Word file) पाठवावी. मराठी युनिकोड (मंगल, एरिअल युनिकोड, कोकिळ, निर्मला, उत्साह इत्यादी) फ़ॉंट असावा. (फ़ेसबुक, ईमेल, Whatsapp वर चालणारे Fonts Unicode असतात) इतर फ़ॉंट असल्यास तो सोबत पाठवावा. साहित्य पाठवण्यापुर्वी त्याचे शुद्धलेखन वगैरे व्यवस्थित तपासून पाठवावे. शक्यतो व्यावसायिक प्रुफ़रिडरची मदत घ्यावी. याबाबत काही मदत लागल्यास निःसंकोच कळवा. शुद्धलेखनाच्या चुका जास्त असल्यास पुस्तक प्रकाशित होत नाही. तसेच एकदा पुस्तक तयार झाल्यावर चुका दुरुस्त होणार नाहीत.
आपले साहित्य पाठवल्यावर ते वेगवेगळ्या संपादकांकडे पाठवले जाते. प्रकाशनाची तारीख व इतर डिटेल लवकरच कळवले जातात. आठवडाभरातच कन्फ़र्मेशन दिले जाते. पुस्तक प्रकाशन ४५ ते ९० दिवसांत केले जाते. प्रकाशनासाठी येणार्या कवितासंग्रहांची संख्या जास्त असल्यामुळे वेळ जास्त (दुप्पट) लागतो. प्रकाशन होणार नसल्यास त्याचे कारण दिले जाईलच असे नाही. पुस्तक बनत जाईल तसतसे ते लेखकाच्या अप्रुव्हलसाठी पाठवले जाईल.
आपण आमच्याबरोबर काम करावं अशी आमची इच्छा, आग्रह राहील. केवळ साहित्य पाठवून नव्हे तर आमच्यातले एक बनून. आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. मात्र केवळ मोफत प्रकाशन आणि वितरण होतं या मोहापायी ई साहित्यकडे वळू नये. पूर्ण अटी वाचून व भविष्याचा पूर्ण विचार करूनच तसेच या क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घेऊनच हा पर्याय निवडावा हा सावधगिरीचा इशाराही आम्ही देऊ इच्छितो.
ई साहित्यवर प्रकाशनाचे फ़ायदे
१) ई पुस्तक भिजत नाही, जळत नाही, वाळवी नाही. ते कधीही नष्ट होत नाही
२) ई पुस्तकाच्या वितरणाचा सर्व खर्च ई साहित्य प्रतिष्ठान स्वतःच करते.
३) ई पुस्तक लाखो लोकांपर्यंत जाते. ते कायम फ़िरत रहाते. जगातील सर्व देशांत आणि भारतातील सर्व राज्यांत, महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांत ते विजेच्या वेगाने जाते.
४) ई पुस्तकाचे एडिटिंग छापिल पुस्तकाहून सोपे असते. प्रकाशनानंतरही बदल करणे शक्य होते. पण एकदा डाऊनलोड झालेले पुस्तक मात्र परत येऊ शकत नाही.
५) ई पुस्तकात तांत्रिक क्षेत्रातले बदल अंतर्भूत होत असतात. हे खूप मोठे आहेत. उद्याचे जग ई पुस्तकांचेच असेल. त्यात बोलणारी पुस्तके, मल्टिमिडिया पुस्तके, शब्दार्थ सांगणारी पुस्तके, संदर्भ सांगणारी पुस्तके असे अनेक प्रकार येतील.
ई साहित्यवर प्रकाशनाचे तोटे:
१) ई पुस्तक नष्ट होत नाही. त्यामुळे ते एकदा ई साहित्यवर गेले की कायम रहाते. काढता येत नाही. इतर पर्याय बंद होतात
२) ई पुस्तक बाणासारखे किंवा पत्रासारखे असते. एकदा सुटले की परत जमा करता येत नाही. चूक राहून गेली तर ती मागे घेता येत नाही. विशेषतः कायदेशीर चुका टाळाव्या.
३) ई-पुस्तक लेखकाचे नाव बदलून स्वतःच्या नावाने करणे अगदी सहज सोपे आहे.
४) ई पुस्तक लेखकाला व प्रकाशकाला न कळवता परस्पर विकणे सोपे असते.
अधिक माहितीसाठी www.esahity.com ला भेट द्यावी. काही प्रश्न असल्यास याच मेलवर विचारावे. शक्यतो सर्व व्यवहार मेलवर लेखी करावेत. तोंडी व्यवहार टाळावे. तरीही काही प्रश्न राहिलेच तर फ़ोन करू शकता. प्रत्यक्ष भॆटीची गरज नाही.