माहिती, आरोग्य, विज्ञान, शिक्षण वगैरे
एक भिती आहे माझ्या खोल मनात दडून
------------------------------------- कॅ न्स र १००% बरा होऊ शकतो. थोडा तुमचा वेळ द्या. जाणून घ्या तो काय आहे, कसा होतो, कसा समजतो आणि वेळेवर समजला तर कसा पटकन बराही होतो. आणि वेळेवर समजण्यासाठी काय करावे. समजल्यानंतर काय करावे. घरातील व्यक्तींनी कसे वागावे. कॅन्सरची भिती मनातून काढून टाकणारे एक झक्कास पुस्तक. आपल्या ओळखीचे कोणी कॅन्सर पेशंट असतील वा त्यांचे नातेवाईक असतील. त्यांना फ़ॉरवर्ड करा. हे पुस्तक इंग्लंड मधे स्थाईक झालेल्या कॅन्सर स्पेशालिस्टनी लिहिलेले आहे. त्यांनी एकूण १९ पुस्तके लिहिलेली आहेत. हे मराठीतील वाचकांसाठी अतिशय सोप्या भाषेतले आहे. फ़्री आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे असा आमचा प्रय्त्न आहे. कृपया त्यात मदत करा. ई साहित्यची पुस्तके मुक्त असतात. ई साहित्यने कॅन्सर जागृतीसाठी मोहीम आखली आहे त्यात सामिल व्हा. फ़ेसबुक लिंकवर क्लिक करा. https://www.facebook.com/profile.php?id=100087484425676 |
मुलींनो! तुमच्या पर्समध्ये एक बॉंब आहे!
हो. प्रत्येक मुलीकडे एक बॉंब असतो. जो तिला केव्हाही उद्ध्वस्त करील मोबाईल. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, आर्थिक व्यवहार, मनोरंजन, प्रवास, खरेदी, विक्री, नातेसंबंध, मैत्री, अध्यात्म ते सेक्स. मोबाईलने आपण काहीही करू शकतो. लवकरच मोबाईलशिवाय आपण काहीही करू शकत नाही असे दिवस येतील. येणार्या काळात आपल्या शरीरातील एखाद्या अवयवाप्रमाणे मोबाईल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होईल. अविभाज्य. संलग्न. श्वासोछ्वासाइतकाच. अ ट ळ ! या मोबाईलचा वापर करताना आपण किती काळजी घेतो. आपण अॅप डाऊनलोड करताना ज्या अटी आपण स्विकारतो त्या वाचतो? आपण जी माहिती देतो त्याचा काय वापर होईल याचा विचार करतो? आपण मोबाईलचा वापर ज्या पद्धतीने करतो त्यातून आपल्याला काय काय धोके होऊ शकतात याची कल्पना आहे? आपल्या आजुबाजूला फ़ार मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हे होत असतात याची आपल्याला माहिती आहे? आपला मोबाईल हॅक झाला तर काय काय होऊ शकते? तो कसा हॅक होऊ शकतो? आपल्या मोबाईलमधून आपले फ़ोटो चोरले जाऊ शकतात? फ़ोटोंचा काय काय उपयोग होऊ शकतो? आपल्या बॅंकेतले पैसे काढण्यासाठी चोर काय काय करू शकतात? हे पुस्तक वाचा. आपल्या ओळखीच्या प्रत्येक मुलीला द्या. #सायबरसेफ़मुलगी या आमच्या चळवळीत सामिल व्हा. |