ललित लेख, भावबंध, स्तंभ इत्यादी
बागेमधे फ़ेरफ़टका मारताना छान छान फुले दिसतात, झाडे दिसतात, तसेच कचरा, वाळलेल्या पानांचे ढीग, काड्या, आणि इतरही घाण दिसते. आपण काय पहायचे आणि नोंदायचे ते आपल्यावर असते. जयश्री पटवर्धनांना व डॉ. सरोज सहस्रबुद्धे यांना आयुष्यात सर्व प्रकारची माणसे भेटलीच असणार. पण त्यांचे लेखन वाचून मात्र त्यांना भेटलेल्या निस्वार्थी, कर्मयोगी माणसांचे जितके कौतुक वाटते तितकेच त्यांच्याबद्दल आवर्जून नोंद करणार्या सरोजजी आणि जयश्रीताईंचेही. उत्कृष्ट पुस्तकं आहेत. नक्की वाचा.