संपूर्ण (दहाहजारपानी) महाभारत ऑडिओ व्हिडिओ
अत्यंत आनंदाने ई साहित्य सादर करीत आहे “मराठी संपूर्ण महाभारत ऑडिओ”. सुमारे दहाहजार पानांचा, मूळ महाभारताचा संपूर्ण मराठीत अनुवाद, अशोक कोठारे यांनी केला आहे आणि मराठीमधे फक्त ई साहित्य वर उपलब्ध आहे. या ४६ खंडांच्या महाभारताचे ऑडिओ आता उपलब्ध करून देण्याचे काम चित्रा ताम्हनकर यांनी केले आहे. अत्यंत सुस्पष्ट आवाजात त्यांनी हे अभिवाचन करायला सुरुवात केली आहे. आज याचा पहिला भाग प्रकाशित होत आहे. नियमितपणे यापुढील भाग आपल्याला मिळत रहातील.
महाभारत हे गोष्टींचं पुस्तक नाही. पुर्वीच्या काळी महाभारत हेच अभ्यासाचे पुस्तक होते. शालेय क्रमिक पुस्तक म्हणा. त्यात कथा होत्या. त्या उद्बोधक होत्याच. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यात असंख्य चर्चा आहेत. प्रत्येक वेळी दोन माणसं भेटली की चर्चा करत आणि त्या चर्चा हे ज्ञानाचं साधन असे. त्या चर्चांपैकी एक म्हणजे भगवद्गीता. अशा सुमारे शंभर मोठ्या चर्चा महाभारतात आहेत.
मराठीत मूळ संपूर्ण महाभारताचा एकही अनुवाद उपलब्ध नाही. कारण एवढ्या लांबलचक चर्चांनी भरलेलं पुस्तक वाचायला आता कोणाला वेळ नाही. आणि छापायची कोणाची प्राज्ञा नाही. त्यामुळे कोणी एवढं जडजंबाल पुस्तक अनुवाद करायला घेत नाही. पण अशोक कोठारे यांनी ते करायला घेतले आणि ई साहित्य प्रतिष्ठानला ते प्रसिद्ध करायचा मान दिला.
सुमारे १०००० (दहा हजार) पानांचं पुस्तक आहे. श्री. अशोक कोठारे यांनी तीन वर्षांहून अधिक काळ खपून ते मूळ संस्कृत मधून केले आहे.
हे पुस्तक वाचणं ज्यांना विविध कारणांमुळे अवघड जातं त्यांच्यासाठी ऑडिओ सादर करीत आहोत. हा ऑडिओ सिरिज सुमारे २५० तासांची आहे. रोज एक तास ऐकली तर वर्षभरात पारायण पूर्ण होईल.

|
|
|
|
71 to 74
|
|
75 to 82 83 to 92
|
|
93 to 100 101 to 114
|
|
|
|
126 to 135 136 to 142
|
|
143 to 153 154 to 158
|
|
159 166
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|