दुर्ग दुर्घट भारी
दुर्गांची माहिती, इतिहास, स्थान, सद्यपरिस्थिती, जाण्यायेण्याचा मार्ग, खाण्यापिण्याची सोय, रहाण्याची व्यवस्था, धोके, मदतीची ठिकाणे, वैशिष्ट्ये, विशेष दिवस इत्यादी.
एका एका दुर्गावर एक एक स्वतंत्र पुस्तिका. एकूण तिनशॆ पुस्तिका तयार करायच्या आहेत. तुमची मदत पाहिजेच.
दुर्गवीर
ट्रेकिंग हा वाढता छंद आहे. स्वस्त आणि मस्त. त्यामुळे ट्रेकिंगचे अनेक ग्रुप बनत असतात. काहीजण तर ट्रेकिंगचा धंदाही करतात. पण काही ट्रेकर्स काही ध्येय ठेवून चालतात. त्यातले आघाडीचे एक आहेत दुर्गवीर. हे हौसे गवसे नवसे ट्रेकर्स नाहीत. महाराष्ट्रातील दुर्ग हा एक अतिशय मौल्यवान खजिना आहे. सोने, हिरे मोती यांहूनही मौल्यवान. पण त्याची ना निगा राखली जात ना बूज ठेवली जात. किल्ले म्हणजे काही पर्यटनस्थळ नव्हे. स्वराज्यस्थापनेची ती मंदिरे आहेत. त्यांचा आब राखला पाहिजे. त्यांची निगा राखली पाहिजे. हे काम आपल्या कुवतीनुसार दुर्गवीर करतात. या दुर्गवीरांचे धीरू, म्हणजे धिरज लोके यांनी अतिशय सुंदर शब्दांत दुर्गवीरांच्या कार्याची आणि ट्रेकिंगमधल्या गंमतीजंमतीची माहिती या पुस्तकात दिली आहे. वाचलेच पाहिजे. टाईमपास म्हणून नव्हे. मनाला शक्ती यावी म्हणून. भक्ती जागृत व्हावी म्हणून. |