बालसाहित्य
वाचनाची आवड नसेल तर फुकट मिळालेलं पुस्तकही कोणी वाचत नाही. अगदी घरी नेऊन हातात दिलं तरी नाही वाचत. आणि वाचनाची आवड लागली की माणूस काहीही कष्ट आणि कितीही खर्च करून पुस्तक मिळवतोच. अनेकांना तर वाचनाचे व्यसनच असते. ते लागते बालपणीच. शाळेत असतानाच. असे ज्ञानाचे व्यसन प्रत्येकाला लागावे.
ही प्रेरणा घेऊन अनेक शाळांमधे मुलांच्या शालाबाह्य अवांतर वाचनाला प्रोत्साहन दिले जाते. अनेकदा हे उपक्रम यशस्वी होतात. अनेक मुलांचे आयुष्य बदलून टाकतात. त्यातलाच एक उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यातल्या, एका ग्रामीण शाळेत चालतो. त्याची माहिती सोबत देत आहोत. उद्देश हा की असे उपक्रम शाळांशाळांतून व्हावेत. ते यशस्वी व्हावेत.
“वाचन आनंद“ या उपक्रमांत जर कोणाला स्वयंसेवक या नात्याने सहभागी व्हायचे असेल तर त्यासाठी 9987737237 या क्रमांकावर Whatsapp द्वारे संपर्क करावा ही विनंती.

|
तुमच्या घरात किंवा आजूबाजूला मुलं आहेत का?
तुम्ही पालक, आजी आजोबा, किंवा शिक्षक आहात का? तुम्हाला मुलांशी गप्पा मारायला आवडतात? तरच पुढे वाचा… आम्ही ईसाहित्य आता महाराष्ट्रातल्या मुलांच्या लेखनाला प्रसिद्धी देण्यासाठी व्यासपीठ बनत आहोत. मुलांच्या डोक्यात काय काय कसल्या कल्पना, आयडियांचं थैमान सुरू असतं याची कल्पना त्यांच्याशी गप्पा मारणार्यांना येते. मुलं सर्वांशीच आपल्या मनातलं बोलत नाहीत. पण जे भाग्यवान मुलांशी गप्पा मारू शकतात त्यांना कल्पना असेल. जगातल्या सर्वात सुंदर परिकथा मुलांच्या डोक्यात असतात. जगातली सर्वात सुंदर गावं मुलांच्या डोक्यात वसतात. जगातले सर्वात स्वादिष्ट खाद्यपदार्थही मुलांच्या कल्पनेतच शिजत असतात. जगातली सर्वात वेगवान विमानं मुलांच्या डोक्यात उडत असतात. चला तर आपल्या आजुबाजूच्या मुलांनी लिहिलेलं, स्वतःच्या मनाने लिहिलेलं लेखन, संकलित करून ते प्रसिद्ध करुया. कोणास ठाऊक, उद्याचे पुलं, अत्रे, अण्णाभाऊ, खांडेकर, गुलजार यांतच असतील. “माझी रोजनिशी” नावाचा एक भव्य प्रकल्प महाराष्ट्रात सुरू आहे. त्यांच्याकडून आलेलं हे पहिलं पुस्तक वाचा. |