हे ई साहित्य प्रतिष्ठानवाले आहेत तरी कोण?
Whatsapp- 9987737237
ई साहित्य प्रतिष्ठानचं हे सतरावं वर्षं खरं. पण याची मूळ सुरूवात पार २००४ साली झाली. ऑनलाईन कवितांच्या ग्रुप मधून. नंतर त्यातल्या काही काही कवी आणि लेखक यांनी एकत्र येऊन ई पुस्तकं आणि ई नियतकालिकं प्रकाशन व वितरण करण्यासाठी ई साहित्य प्रतिष्ठान २००८ साली स्थापन केलं. आधी मुख्यत्वे कवितासंग्रह. पण आता कथा कादंबरीपासून ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा आणि प्रवासवर्णनांपासून ते विनोदापर्यंत सर्व प्रकारचं साहित्य. अगदी कामसूत्रसुद्धा. बालवाङ्मयाचा विशेष विभाग. महाराष्ट्रातल्या किल्ल्यांची इत्थंभूत माहिती देणारी सिरीज. आधी केवळ कवितांपुरती असलेली दिंडी कधी कादंबरी, कथा, प्रवासवर्णन, अध्यात्म, नाटके, संगीत, इतिहास, विनोद, ऑडिओ बुक्स, व्हिडिओ बुक्स, शैक्षणिक साहित्य, असे नवनवीन प्रांत आपल्या कवेत घेत गेली ते समजलेच नाही.
गेली सोळा वर्षे अविरतपणे ही साहित्य दिंडी सुरू आहे. जवळपास दररोज एक नवीन पुस्तक प्रकाशित होते. मनोरंजन, माहिती आणि अध्यात्म तसेच विचार यांचा खजिना इथे आपल्या स्वागताला सज्ज आहे. सर्व वेद, उपनिषद, रामायण महाभारत, ज्ञानेश्वरी, सर्व मराठी संतांचे सर्व साहित्याचे गाथांचे खंड, आणि इतर बरेच काही मराठीत विनामूल्य मिळण्याचे दुसरे कोणतेही ठिकाण जर आपल्याला आढळले तर जरूर कळवा. ई साहित्यच्या खजिन्याला तोड नाही असे लोकांकडून म्हटले जाते. मराठी पुस्तक वा Marathi Book असे गुगलवर टाकले की ई साहित्यचे मुख्यपान सर्वात वर दिसते. दिवसाला हजारो लोक त्याला भेट देतात.
इतक्या वर्षांत हजारो पुस्तकांचं प्रकाशन आणि सहा लाख वाचकांचं नोंदणीकृत नेटवर्क उभं करण्यात त्यांना यश आलं आहे. यात साठहून अधिक देशांतले वाचक आहेत तसे महाराष्ट्रातल्या दुर्गम खेड्यापाड्यातले आणि भारतातल्या अन्य राज्यांतलेही आहेत. मेंढपाळ आहेत तसे सीमेवरचे सैनिकही आहेत. भारताचे विदेशातील राजदूत आहेत तसे मराठी रंगभुमी व चित्रपटातले नामवंत कलाकारही आहेत. स्मार्ट फ़ोन्सच्या वाढत्या वापराबरोबर मोबाईलवर वाचता येतील अशा ई पुस्तकांची डिमांड वाढतच आहे. आणि ती पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न ई साहित्य प्रतिष्ठान करते. नवनवीन पुस्तके प्रकाशित करून. Android apps द्वारे सुद्धा यातील काही पुस्तके उपलब्ध आहेत. वर्षाला सुमारे अर्धा कोटी पुस्तके मराठी वाचक डाऊनलोड करतात.
ई साहित्य प्रतिष्ठान हा बहुतांशी तरूण लेखक कवींचा ग्रुप. ईपुस्तक बनवण्याचे विविध प्रयोग त्यांनी केले व सतत करत असतात. विषय, मांडणी आणि सजावट यांत नवनवीन तंत्रांचा विकास केला. आणि हे सर्व साध्या सोप्या पद्धतीने सामान्य नॉन-टेकी लोकांना समजेल अशा भाषेत नोंदले जाते. लेखक आणि कवींना स्वतःची पुस्तके स्वतः बनवण्यासाठी ई साहित्य प्रतिष्ठान सर्व सहाय्य करते. ई पुस्तकं बनवण्याची शिबीरंही घेते. तेही विनामूल्य. उत्साही दर्जेदार लेखक ई साहित्य प्रतिष्ठानकडे आपले मौल्यवान पुस्तक ई वितरणासाठी सोपवतात. तेही कसलेही मूल्य न आकारता. पुढे ई साहित्य ते पुस्तक लाखों वाचकांपर्यंत पोहोचवते. तेही विनामूल्य. आणि हे वाचक या चळवळीत नवनवीन वाचकांना आणतात. रोज अक्षरशः शेकडोंच्या संख्येने. एखादे पुस्तक तर दहा लाखांच्यावर वाचकांपर्यंत जाते.
ई साहित्य हा साहित्याचा वेगळा प्रकार नाही. हे साहित्याचं माध्यम आहे. पण ई साहित्य हे खालील पाच गुणांनी आजवरच्या साहित्याहून वेगळं ठरतं.
१) निर्मिती आणि प्रसाराचा अकल्पनीय वेग : साहित्य तयार असेल तर पुस्तक एका दिवसात बनतं आणि एका दिवसात दोन लाख लोकांपर्यंत पोहोचतं.
२) निर्मिती आणि वितरणाचा नाममात्र खर्च : दोन लाख वाचकांना पुस्तक देण्यासाठी साधारण दोन हजार रुपये खर्च येतो. म्हणजे एका वाचकामागे एक पैसा. त्यामुळे जास्तीत जास्त वाचकांत वाटायला काही विशेष कष्ट पडत नाहीत.
३) वाचकांच्या प्रतिक्रियांचा प्रचंड वेग आणि ओघ : ई मेल ने वा Whatsapp द्वारे आलेल्या पुस्तकाला लगेचच विनासायास उत्तरही देता येतं. लेखकांना सूचना, स्पष्टवक्ते लोकांकडून महत्त्वाचा फ़ीडबॅक, स्तुती आणि शबासकी मिळत रहाते.
४) निर्मितीला चित्र वा ध्वनीच्या आधाराने अधिक सजवणं शक्य : छपाईचा खर्च नसल्यामुळे फ़ोटो आणि ऑडिओ यांचा मुक्त वापर करता येतो.
५) टिकाऊपण : एकदा ई साहित्य बनलं की ते नष्ट होण्याची शक्यता नाही. आज लिहीलेलं आणि पोस्ट केलेलं ई पुस्तक पाचशॆ हजार वर्षं तसंच राहण्याची शक्यता आहे. वारंवार आवृत्त्या काढाव्या लागत नाहीत.
जगभरातील वेगवेगळ्या वयोगटांतील, वेगवेगळ्या विचारांचे, आणि वेगवेगळ्या स्तरांतील वाचक आज ई साहित्यशी जोडले जात आहेत. यांत ग्रामीण आहेत तसे शहरी आणि विदेशी आहेत. उच्चशिक्षित आहेत तसे अल्पशिक्षित आहेत. धनी आहेत तसे विद्यार्थीही आहेत. [email protected] या मेल वर आपणही एक पत्र लिहून स्वतःला वाचक किंवा लेखक म्हणून नोंदवू शकता. www.esahity.com या वेबसाईटवर ई साहित्यची पुस्तकं विनामूल्य वाचू शकता. 9987737237 या क्रमांकावर Whatsapp द्वारे केवळ आपले नाव व गाव कळवले की आपल्याला पुस्तक सहजपणे मिळत रहातील.
ई साहित्य च्या मंडळींना आपल्या या कार्याचा अभिमान आहे. पण समाधान अजिबात नाही. मराठीत अशा किमान शंभर संस्थांची गरज आहे असं ते मानतात. मराठी बोलणार्यांपैकी निदान एक टक्का लोक म्हणजे बारालाख वाचक तरी आपल्या या चळवळीला जोडले जावेत अशी त्यांची इच्छा आहे. आणि गांवोगांवी, जगभरातल्या प्रत्येक देशात आपले कार्यकर्ते असावेत हे त्यांचे स्वप्न आहे. तुमची त्यांना गरज आहे. मराठीत एक वाचन संस्कृती रुजवण्यासाठी. या. सामिल व्हा.

ई साहित्य प्रतिष्ठानचा प्रवास : छायाचित्रांद्वारे