अध्यात्म, संतसाहित्य, धार्मिक साहित्य. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध अशा सर्व धर्मांचे ग्रंथ
ज्ञानेश्वरीहून सुंदर या जगात मानवनिर्मित काहीही नाही.
ज्यांनी आजवर ज्ञानेश्वरी वाचली नसेल, ऐकली नसेल व एक तरी ओवी अनुभवली नसेल ते मराठी असूनही अभागी
नीट पूर्ण न वाचता, न ऐकता, नीट समजून न घेता मान डोलावणे योग्य नाही.
ज्ञानेश्वरी हे जगातील सर्वात सुंदर पुस्तक आहे असे म्हटले की सर्वचजण मान डोलावतात. वाचणारे. न वाचणारे. वाचून समजणारे. न समजणारे. ज्ञानेश्वरी सुंदर का आहे? माऊलींची भाषा रसाळ आहे म्हणजे काय? मुळात संत ज्ञानेश्वरांना माऊली का म्हणतात. त्यांच्या भाषेत अमृताहून गोडी आहे असे का म्हणतात? एक अगदी छोटेसे पुस्तक आहे जे श्री पंडारे यांनी आपल्या मुलां-नातवांसाठी लिहिले. ते ई साहित्यने प्रकाशित केले. वाचून पहा. ज्यांनी आजवर पूर्ण अर्थ न समजता ज्ञानेश्वरी वाचली त्यांना अवर्णनीय आनंद मिळेल. ज्ञानेश्वरांच्या भाषेइतकीच ई साहित्यची पुस्तकं मिळवण्याची पद्धत सोपी आहे. फ़क्त एक क्लिक करा. ना अट. ना झंझट. सहज, सुंदर, सोपं. विनामूल्य. ज्ञानेश्वरीसारखं. |
एका भव्य प्रकल्पाला शुभारंभ करत आहोत.
२४००० श्लोकांचे मराठी काव्यानुवाद प्रथमच मराठीत होत आहे.
मूळ रामायण वाचण्याची जिज्ञासा असणारे पण पुरेसे संस्कृत न जाणणारे याचा लाभ घेतील.
२४००० श्लोकांचे मराठी काव्यानुवाद प्रथमच मराठीत होत आहे.
मूळ रामायण वाचण्याची जिज्ञासा असणारे पण पुरेसे संस्कृत न जाणणारे याचा लाभ घेतील.
एक पुस्तक माणसाचे आयुष्य बदलूनच टाकते.
होय.
एक पुस्तक एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याला संपूर्ण वेगळे वळण लावू शकते.
अर्थात ही गोष्ट प्रत्येक पुस्तकाला लागू पडतेच असे नाही. पण आयुष्यात असे एक पुस्तक, असा एक विचार , अशी एक वेळ येते की जेव्हा माणूस आपल्या आयुष्याला संपूर्ण वेगळे वळण लावतो.
भगवद्गीता हे असे एक पुस्तक आहे ज्याने अनेकांचे आयुष्य बदलले. सहज सुलभ मराठीत अशी भगवद्गीता उपलब्ध आहे. वाचायला फ़ार तर एक किंवा दोन तास लागतील. विचार करायला एक दोन दिवस जातील. आणि आयुष्याला एक जबरदस्त घुमाव मिळेल.
उघडा. क्लिक करा. वाचा. विचार करा.
एक पुस्तक एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याला संपूर्ण वेगळे वळण लावू शकते.
अर्थात ही गोष्ट प्रत्येक पुस्तकाला लागू पडतेच असे नाही. पण आयुष्यात असे एक पुस्तक, असा एक विचार , अशी एक वेळ येते की जेव्हा माणूस आपल्या आयुष्याला संपूर्ण वेगळे वळण लावतो.
भगवद्गीता हे असे एक पुस्तक आहे ज्याने अनेकांचे आयुष्य बदलले. सहज सुलभ मराठीत अशी भगवद्गीता उपलब्ध आहे. वाचायला फ़ार तर एक किंवा दोन तास लागतील. विचार करायला एक दोन दिवस जातील. आणि आयुष्याला एक जबरदस्त घुमाव मिळेल.
उघडा. क्लिक करा. वाचा. विचार करा.
निकिता पाटील या विद्यार्थिनीने अत्यंत मेहनतीने व चिकाटीने चारही वेदांचा मुळातून अभ्यास करून मराठी वाचकांसाठी त्याचे सार लिहिले आहे. प्रत्येक वेदातील प्रत्येक सूक्ताची मराठीत ओळख करून दिलेली आहे. अध्यात्माच्या जिज्ञासूंसाठी हा फ़ार महत्वाचा दस्तावेज आहे.
खंड ४५
या खंडात वाचा- महाभारत युद्धानंतर नारद मुनी आणि नारायण यांच्यातील संवाद. पिंडदानाचे महत्व. सृष्टीची निर्मिती. पंचमहाभूतांची निर्मिती. निवृत्ती आणि प्रवृत्ती ऊर्जा. अस्मिता म्हणजे काय. पंचर्त्र संहिता, अरण्यक आणि सांक्य प्रणाली यांतील साम्य व भेद. माणसाने वेदांनुसार वागावे की धर्मशास्त्रानुसार की परंपरेनुसार? राजा पद्मनाभाची गोष्ट. छंद आणि व्यसन यातील भेद. महाभारत हे पुस्तक कुठल्याही पानापासून वाचायला सुरुवात करावी. त्यात चमत्कतीपूर्ण घटना आहेत आणि त्या थक्क करून सोडतात. पण महाभारत हे गोष्टींचं पुस्तक नाही. पुर्वीच्या काळी महाभारत हेच अभ्यासाचे पुस्तक होते. शालेय क्रमिक पुस्तक म्हणा. त्यात कथा होत्या. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यात असंख्य चर्चा आहेत. प्रत्येक वेळी दोन माणसं भेटली की चर्चा करत आणि त्या चर्चा हे ज्ञानाचं साधन असे. त्या चर्चांपैकी एक म्हणजे भगवद्गीता. मराठीत मूळ संपूर्ण महाभारताचा एकही अनुवाद उपलब्ध नाही. कारण एवढ्या लांबलचक चर्चांनी भरलेलं पुस्तक वाचायला आता कोणाला वेळ नाही. आणि छापायची कोणाची प्राज्ञा नाही. त्यामुळे कोणी एवढं जडजंबाल पुस्तक अनुवाद करायला घेत नाही. पण अशोक कोठारे यांनी ते करायला घेतले आणि ई साहित्य प्रतिष्ठानला ते प्रसिद्ध करायचा मान दिला. सुमारे १०००० (अक्षरी दहा हजार) पानांचं पुस्तक आहे. श्री. अशोक कोठारे यांनी तीन वर्षांहून अधिक काळ खपून ते मूळ संस्कृत मधून केले आहे. या चर्चा फ़ारच उद्बोधक आहेत. एखादी तरी वाचावी आणि अभ्यासावी. यातल्या एका चर्चेची आपल्याला माहिती असतेच ती म्हणजे भगवदगीता. अशा सुमारे शंभरेक चर्चा यात आहेत. महाभारत ही केवळ मनोरंजक कथा नाही. तो एक वैचारिक संघर्षाचा इतिहास आहे. काय बरोबर काय चूक यांच्या मुळाशी जाऊन घेतलेला शोध आहे. पुर्वीच्या काळी शिक्षणाचा पाया रामायण व महाभारत यांतील मूल्यांचा अभ्यास होता. कारण यातून मुलांचे मुल्यशिक्षण होते. |
भवानी माता मंदिर स्तोत्र
महाभारत एक सुंदर रंजक कथा आहेच. पण ती केवळ कथा नाही. त्यातील निम्म्याहून अधिक भाग हा विविध चर्चा आणि उपदेशांनी व्यापलेला आहे. या चर्चा मुळातून वाचणे आवश्यक आहे. केवळ वाचणे नाही तर अभ्यासणे आवश्यक आहे. यातून मिळणारे ज्ञान व्यापक आहे. आणि ते एकांगी नाही. प्रत्येक विषयाची साधक बाधक चर्चा, सर्वांगांनी महाभारतात केली आहे. आपल्याला नेहमीच्या जीवनात पडणारे प्रश्न असो वा राजकीय, सामाजिक, नैतिक, आर्थिक स्वरुपाचे असो किंवा अध्यात्माचे असो, त्यांची सांगोपांग चर्चा महाभारतात आहे.
खंड ४१ हा शांतीपर्वातील मोक्षपर्वाचा भाग आहे. त्यात भीष्म आणि युधिष्ठीर यांच्या चर्चेतूनच जनक आणि पंचशिख यांच्यातील संवाद आणि व्यासमुनी आणि शुकमुनी यांच्यातील धर्मचर्चेचाही वेध घेतला आहे. शरीर, जीव, आत्मा यांच्या मुळाशी ही चर्चा जाते. कदाचित सर्वांना आवडणार किंवा झेपणार नाही. पण ही चर्चा फ़ारच उद्बोधक आहे. वाचावी आणि अभ्यासावी. अध्यात्म (esahity.com) |
परिक्रमा कधीही संपत नाही. ती वर्तुळाकार आहे, तिथे सुरुवातही नाही आणि शेवटही नाही. आपण आपल्या तर्कबुद्धीने कुठल्यातरी एका बिंदूला सुरुवात समजून तिथवर पुन्हा येऊन पोचण्याच्या प्रक्रियेला परिक्रमा असे संबोधतो. मात्र अनादि अनंत कालचक्रा प्रमाणे असलेली, निश्चित उगम बिंदू तसेच समुद्र देवते मध्ये विलीन होण्याचे कुठलेही निश्चित चिन्ह मागे न ठेवणारी नर्मदा मैया आणि तिची परिक्रमा देखील अनादी आणि अनंत आहे. प्रश्न आहे तो माझ्या सुरू होण्याचा आणि संपण्याचा. हे दोन्ही बिंदू माझ्या हातात नाही. मात्र या दोन मधला प्रवास सुकर व्हावा म्हणून मैया मात्र माझ्या पाठीशी आजीवन आहे… तशीच ती तुमच्याही पाठीशी आजीवन आहेच.
|
महाभारताचे सर्व खंड वाचणे हे सर्वसामान्य वाचकाचे काम नाही. महाभारत ही कथा असली तरी त्या कथेच्या माध्यमातून महर्षी व्यासांनी तत्त्वज्ञान, राजकारण, अर्थशास्त्र, अध्यात्म आदि सर्वच शास्त्रांचा उहापोह केलेला आहे. यातील प्रत्येक पात्र हे एक स्वयंप्रज्ञ शिक्षकच आहे. आणि त्यामुळे महाभारत हा एक गहन अभ्यास बनतो. ज्याने महाभारत अभ्यासले तो सर्वसामान्य रहात नाही.
महाभारताचा खंड ४० हा मोक्षधर्मपर्व म्हणून ओळखला जातो. शरपंजरी पडलेल्या पितामह भिष्मांना अखेरचा प्रणाम करायला गेलेल्या युधिष्ठीराला पितामह मोक्ष म्हणजे काय ते समजावतात. हे समजावताना ते त्याला सुमारे ३० कथांतून ३८ प्रकारचा उपदेश करतात. ही प्रत्येक कथा एक स्वतंत्र धडाच आहे. यातून पितामहांच्या ज्ञानाचे दर्शन घडते, युधिष्ठिराच्या ज्ञानपिपासेची ओळख होते आणि व्यासमुनींच्या कथामार्गे उपदेश पोहोचवण्याच्या कलेची झलक मिळते. यातील मनकीच्या कथा स्वतंत्रपणे वाचूनही अभ्यासक उच्च कोटीचे ज्ञान मिळवू शकतो. त्याचबरोबर धर्म, अर्थ आणि काम यांच्याहून मोक्ष का व कसा श्रेष्ठ आहे हेही जाणू शकतो. अर्थात महाभारताचे सर्व खंड वाचणे हे सर्वसामान्य वाचकाचे काम नाही कारण हे खंड वाचणारा किंवा वाचणारी सर्वसामान्य रहात नाही. |
महाभारताच्या ९शांतीपर्व १) ३७ व्या खंडात वाचा: पितामह भिष्मांनी चारही वर्णांची कार्ये स्पष्ट केली. ब्राह्मण, क्षत्रीय, वैश्य व शूद्र यांनी काय करावे व काय करू नये ते सांगितले, तसेच करू नये ते केल्यास त्यांना काय शिक्षा द्यावी तेही सांगितले. राजधर्म कसा असतो ते सांगून जर राजाने त्याची कर्तव्ये पाळली नाहीत तर काय होते तेही सांगितले. आहे. या खंडात योद्ध्यांच्या चिलखतापासून ते वृक्ष संवर्धनापर्यंत राज्य कसे चालवावे याचा उत्तम पाठ दिलेला आहे.
महाभारत ही केवळ मनोरंजक कथा नाही. तो एक वैचारिक संघर्षाचा इतिहास आहे. काय बरोबर काय चूक यांच्या मुळाशी जाऊन घेतलेला शोध आहे. पुर्वीच्या काळी शिक्षणाचा पाया रामायण व महाभारत यांतील मूल्यांचा अभ्यास होता. कारण यातून मुलांचे मुल्यशिक्षण होते. महाभारत मुलांनी व तरुणांनी वाचावे. मुळापासून वाचावे. त्यातील विचारांचा, वाद आणि संवादांचा अभ्यास करावा, केवळ वरवरची कथा वाचून मौज करू नये तर त्यामागचे गुह्य समजून घ्यावे. मराठीमध्ये इतके मुळापासूनचे दशसहस्त्रपानी महाभारत फ़क्त श्री अशोक कोठारे यांनी अनुवादित व केवळ ई साहित्य प्रतिष्ठानने प्रकाशित केले आहे. |
श्रद्धेचे विज्ञान
श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा आणि अंधश्रद्धा वेगळी असते का? श्रद्धेचा आपल्या जीवनात काही उपयोग असतो का? संस्कृतीच्या विकासात काही श्रद्धा उपयोगी ठरल्या आहेत का? नेहमीच्या जगण्यात.. श्रद्धा उपयोगी किंवा निरुपयोगी असतात का? श्रद्धा उपद्रवी किंवा निरूपद्रवी असतात का? श्रद्धांचा संबंध विवेकाशी असतो का? विवेकाने श्रद्धा बदलता येतात का? श्रद्धांच्या मागे काय विज्ञान आहे? हे सगळे श्रद्धेचे विज्ञान वाचल्यावरच कळेल! |
ई साहित्य च्या या साइटवर हजारो पुस्तकं आहेत. सर्वच चांगली आहेत पण आपण सर्वच वाचू शकणार नाही हे खरेच. पण इथली तीन पुस्तकं अशी आहेत जी तुम्हाला मराठीत इतर कुठेही मिळणार नाहीत. श्री. अशोक कोठारे अनुवादित १६००० पानी महाभारत. श्री विजय पांढरे यांनी नव्या मराठीत आणलेली १०००० ओव्यांची ज्ञानेश्वरी आणि श्री साहेबराव जवंजाळ यांनी लिहीलेले श्रीमद्भगवद्गीतेवरील ३००० पानी भाष्य. भगवद्गीता: परिवर्तनाच्या व्यवस्थापनाचे तत्त्वज्ञान.
गीता सर्वांनाच वंदनीय आहे. काही लोक अजिबात न वाचता तिला वंदनीय म्हणतात. काही वाचायचा प्रयत्न करतात व सोडून देतात. काही तिचा अर्थ न समजता ती वाचतात, तिचे पठण करतात. काही तिचा अध्यात्मिक अर्थ समजून घेऊन वाचतात. श्रीमद्शंकराचार्यांनी त्यातला ज्ञानयोग जाणला व जाणकारांत पसरवला. संत ज्ञानेश्वरांनी त्यातला भक्तीयोग अंगी बाणवला आणि सामान्यजनांत प्रसार केला. लोकमान्य टिळकांनी त्यातल्या कर्मयोगाचे तत्कालीन महत्त्व जाणले आणि गीतारहस्याद्वारे तो लोकांप्रती पोहोचवला. स्वामी विवेकानंदांनी तिचे वैश्विक महत्त्व जाणून ती आंतरराष्ट्रीय स्तरावर नेली. हे सर्व गेल्या शतकांतील त्या त्या काळांशी सुसंगत होते. श्री. साहेबराव जवंजाळ यांनी आजच्या तरुणांना ही गीता किती मार्गदर्शक आहे याचे सार्थ दर्शन त्यांच्या पुस्तकातून घडवले आहे. एका अर्थी त्यांनी आपल्याआधीच्या या चार महानुभावांचे कार्य पुढे नेले आहे. भगवद्गीता सार्वकालीन आहे, वैश्विक आहे आणि चिरतरूण आहे. ते बदलाच्या व्यवस्थापनाचे तत्त्वज्ञान आहे. Today’s youth has to face the challenge of CHANGE and Bhagavadgeeta is the right Philosophy for MANAGING the CHANGE in right direction. या संदर्भात साहेबरावांनी जगभरातील अनेक महान तत्त्ववेत्त्यांचे व विचारवंताचे विचार संदर्भासाठी नेमके मांडले आहेत. भगवद्गीतेचे अनेक पैलू व त्यांची आजच्या व येणार्या काळाशी सुसंगती त्यांनी मांडली आहे. हे पुस्तक अध्यात्माहूण अधिक व्यवस्थापनशाश्त्राचे आहे. हे पुस्तक प्रत्येक तरुणाने वाचावे असा आमचा आग्रह राहील. नुसते वाचू नये तर ते आत्मसात होईतो वाचावे. अभ्यासावे. बस. तुमचे, आमचे व समाजाचे सर्व प्रश्न सोडवण्याची कुवत असलेली ही तीन पुस्तके आहेत असे समजा. |
महाभारताच्या शांतीपर्व१ या ३६ व्या खंडात वाचा.
ब्रह्मास्त्र ज्ञानासाठी भार्गवमुनींकडे गेलेल्या कर्णाला मुनींनी शाप दिला का? कर्णाची मांडी पोखरणारा भुंगा खरा कोण होता? नारदमुनी कर्णाची संपूर्ण गोष्ट युधिष्ठिराला का सांगतात व शेवटी काय म्हणतात? युधिष्ठीर समस्त स्त्रीवर्गाला काय शाप देतो? का? युद्धानंतर युधिष्ठीर अर्जुनासमोर शोक का करतो? त्याला अर्जुन काय उत्तर देतो? भिम युधिष्ठिराला बेजबाबदार मुर्ख अशी दूषणे का देतो? गृहस्थाश्रम हा सर्वश्रेष्ठ आहे असे नकुल का म्हणतो? सहदेवाचे विचार काय असतात? पाच भाऊ व द्रौपदी यांच्या वादांतून “राजधर्म” काय असतो ते या भागात विषद केले आहे. या सर्वाचा समारोप श्रीकृष्ण आपल्या विचारांनी करतो. त्यासाठी तो श्रींजयाचा मुलगा सोन्याचा कसा झाला? सोन्याची विष्ठा टाकणार्या मुलाची गोष्ट, प्रायश्चित्त म्हणजे काय? उत्तम खाद्य कोणते? व्यसनास्क्त ब्राह्मणाला कसे वागवावे? हस्तिनापुरात पांडवांचे स्वागत कसे झाले? कोणता वाडा कोणाला मिळतो? भिष्मांचा मृत्यू कसा होतो? मृत्यूसमयी भिष्म युधिष्टीराला राजधर्म कसा सांगतात? माणुसकी आणि चांगुलपणा यात काय भेद आहे? महाभारत ही केवळ मनोरंजक कथा नाही. तो एक वैचारिक संघर्षाचा इतिहास आहे. काय बरोबर काय चूक यांच्या मुळाशी जाऊन घेतलेला शोध आहे. पुर्वीच्या काळी शिक्षणाचा पाया रामायण व महाभारत यांतील मूल्यांचा अभ्यास होता. कारण यातून मुलांचे मुल्यशिक्षण होते. महाभारत मुलांनी व तरुणांनी वाचावे. मुळापासून वाचावे. त्यातील विचारांचा, वाद आणि संवादांचा अभ्यास करावा, केवळ वरवरची कथा वाचून मौज करू नये तर त्यामागचे गुह्य समजून घ्यावे. मराठीमध्ये इतके मुळापासूनचे दशसहस्त्रपानी महाभारत फ़क्त श्री अशोक कोठारे यांनी अनुवादित व केवळ ई साहित्य प्रतिष्ठानने प्रकाशित केले आहे. |
महाभारत ही केवळ मनोरंजक कथा नाही. तो एक वैचारिक संघर्षाचा इतिहास आहे. काय बरोबर काय चूक यांच्या मुळाशी जाऊन घेतलेला शोध आहे. पुर्वीच्या काळी शिक्षणाचा पाया रामायण व महाभारत यांतील मूल्यांचा अभ्यास होता. कारण यातून मुलांचे मुल्यशिक्षण होते.
महाभारत मुलांनी व तरुणांनी वाचावे. मुळापासून वाचावे. त्यातील विचारांचा, वाद आणि संवादांचा अभ्यास करावा, केवळ वरवरची कथा वाचून मौज करू नये तर त्यामागचे गुह्य समजून घ्यावे. मराठीमध्ये इतके मुळापासूनचे दशसहस्त्रपानी महाभारत फ़क्त श्री अशोक कोठारे यांनी अनुवादित व केवळ ई साहित्य प्रतिष्ठानने प्रकाशित केले आहे. ----------------- महाभारताच्या ३५ व्या खंडात वाचा दुर्योधनाच्या मृत्युसमयी अश्वत्थामा, कृपाचाय व कृतवर्मन यांची मनःस्थिती, त्यातून अश्वत्थामा पांडवांच्या सर्व पुत्रांना झोपेतच (सुप्तीत) मारण्याची योजना मांडतो. त्यावर इतर दोघांचे विचार व चर्चा. अखेर अश्वत्थामा एकटाच कसा निघतो व परत का येतो? त्याच्याकडे ब्रह्मास्त्र असूनही ते वापरता का येत नाही? त्याने श्रीकृष्णाकडे सुदर्शन का मागितले , श्रीकृष्णाने ते दिल्यावर काय झाले? अखेर पांडवांच्या सर्व पुत्रांचा मृत्यू झाला का? त्यानंतरही पांडवांच्या सुनेला गर्भ राहून परिक्षिताचा जन्म कसा झाला? काय होता तो गर्भ? भीमाने द्रौपदीच्या सांगण्यावरून अश्वत्थाम्याला काय शिक्षा केली? ती मृत्यूहूनही भयंकर का होती? युद्धानंतर, विदुर आणि धृतराष्ट्रामधे काय चर्चा झाली? विदुराने धृतराष्ट्राला कसे समजावले? धृतराष्ट्र अखेर युद्धभुमीवर का व कसा गेला? त्याला भेटायला युधिष्ठिर आणि श्रीकृष्ण का आले? ते कसे भेटले? त्यांचे काय बोलणे झाले? या पर्वाची अखेर "स्त्रीविलापपर्वा" ने होते. पांडव आणि गांधारी यांची भेट. द्रौपदी आणि कुंती यांचा संवाद. दोघींनाही जिंकल्याचा आनंद नसतो तर आपला वंश संपल्याचे दुख त्याहून मोठे असते. महाभारतातून खुप काही शिकायचे असते. ती केवळ कथा नाही. |
महाभारताच्या ३४ व्या खंडात वाचा - दुर्योधनाच्या मृत्यूसमयी त्याने श्रीकृष्णाला काय दूषणे दिली व त्यावर श्रीकृष्णाचे प्रत्युत्तर काय होते?
पण पांडवांना शरमिंदे का व्हावे लागले? कृष्णाने गांधारीची भेट का घेतली? व त्याआधी त्याला कसली भिती वाटत होती? भेटीत काय घडले? मृत्यूपुर्वी अश्वत्थामा आणि इतर दोघे दुर्योधनाला कसे भेटतात? स्वतःच्या मृत्यूबद्दल त्यांना झालेले दुःख पाहून त्या अवस्थेतही दुर्योधन त्यांचे सांत्वन कसे करतो? महाभारत ही कथा नाही. तो एक वैचारिक संघर्षाचा इतिहास आहे. काय बरोबर काय चूक यांच्या मुळाशी जाऊन घेतलेला शोध आहे. पुर्वीच्या काळी शिक्षणाचा पाया रामायण व महाभारत यांतील मूल्यांचा अभ्यास होता. कारण यातून मुलांचे मुल्यशिक्षण होते. महाभारत मुलांनी व तरुणांनी वाचावे. मुळापासून वाचावे. त्यातील विचारांचा, वाद आणि संवादांचा अभ्यास करावा, केवळ वरवरची कथा वाचून मौज करू नये तर त्यामागचे गुह्य समजून घ्यावे. मराठीमध्ये इतके मुळापासूनचे दशसहस्त्रपानी महाभारत फ़क्त श्री अशोक कोठारे यांनी अनुवादित व केवळ ई साहित्य प्रतिष्ठानने प्रकाशित केले आहे. |
श्री ज्ञानेश्वरी ही बाराव्या शतकात संत श्री ज्ञानेश्वरांनी सामान्य जनांना गीता कळावी म्हणून रचली. त्यातील रसाळ सुंदर ओव्या या त्याकाळच्या प्रचलित मराठी भाषेत आहेत. अनेकदा त्यांचा संपूर्ण अर्थ आताच्या सामान्य जनांना आकळत नाही. म्हणून श्री विजय पांढरे यांनी श्रीज्ञानेश्वरीतील ओव्या त्यातील सौंदर्यपूर्ण रचनेला धक्का न लावता आताच्या प्रचलित मराठी भाषेत आनल्या.
प्रस्तुत आहेत या ओव्या आणि मूळ ज्ञानेश्वरी.
आपण आनंद घ्या.
प्रस्तुत आहेत या ओव्या आणि मूळ ज्ञानेश्वरी.
आपण आनंद घ्या.
महाभारत : जवळपास सर्वच लोक महाभारत म्हणजे गंमत म्हणून वाचायच्या कथा गोष्टी असे समजतात. काही थोडे लोक त्यातून राजकारण, नीतीशास्त्र, मनुष्यस्वभाव यांचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त अशा हितोपदेश किंवा इसापनिती सारख्या गोष्टी म्हणून ते वाचतात. पण खरं सांगायचं तर मूळ महाभारत याहून अगदी वेगळं आहे. त्याचा खरा गाभा आहे तो या गोष्टींच्या दरम्यान पेरलेल्या चर्चा. दोन वेगवेगळ्या विचारांचे द्वंद्व आणि मंथन. असे शेकडो चर्चा संवाद या पुस्तकात आहेत. सहसा लेखक या चर्चा टाळून बाकी पुस्तक लिहीतात. पण या चर्चा हाच खरा या महाग्रंथाचा आत्मा आहे. आणि असा हा महाग्रंथ आता प्रथमच मराठीत येत आहे.
हा ग्रंथ वाचणं हे येरागबाळ्याचे काम नोहे. पण एकाद्या येरागबाळ्याने हे वाचलेच तो तो येरागबाळा रहाणार नाही याची ग्यारंटी.
हा ग्रंथ वाचणं हे येरागबाळ्याचे काम नोहे. पण एकाद्या येरागबाळ्याने हे वाचलेच तो तो येरागबाळा रहाणार नाही याची ग्यारंटी.
महाभारत : जवळपास सर्वच लोक महाभारत म्हणजे गंमत म्हणून वाचायच्या कथा गोष्टी असे समजतात. काही थोडे लोक त्यातून राजकारण, नीतीशास्त्र, मनुष्यस्वभाव यांचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त अशा हितोपदेश किंवा इसापनिती सारख्या गोष्टी म्हणून ते वाचतात. पण खरं सांगायचं तर मूळ महाभारत याहून अगदी वेगळं आहे. त्याचा खरा गाभा आहे तो या गोष्टींच्या दरम्यान पेरलेल्या चर्चा. दोन वेगवेगळ्या विचारांचे द्वंद्व आणि मंथन. असे शेकडो चर्चा संवाद या पुस्तकात आहेत. सहसा लेखक या चर्चा टाळून बाकी पुस्तक लिहीतात. पण या चर्चा हाच खरा या महाग्रंथाचा आत्मा आहे. आणि असा हा महाग्रंथ आता प्रथमच मराठीत येत आहे.
हा ग्रंथ वाचणं हे येरागबाळ्याचे काम नोहे. पण एकाद्या येरागबाळ्याने हे वाचलेच तो तो येरागबाळा रहाणार नाही याची ग्यारंटी.
हा ग्रंथ वाचणं हे येरागबाळ्याचे काम नोहे. पण एकाद्या येरागबाळ्याने हे वाचलेच तो तो येरागबाळा रहाणार नाही याची ग्यारंटी.