काव्यविभाग
एका विद्यार्थिनीने नववी इयत्तेत असताना लिहीलेलं हे संस्कृत काव्य.निकिता राजेश पाटील ही विद्यार्थिनी. कुटुंबात लेखनाचा वा साहित्याचा वारसा असा नाही. पण अगदी शालेय वयातच तिला लेखनाची ऊर्मी शांत बसू देईना. वयाच्या तेराव्या वर्षापर्यंत तिने पूर्ण पुस्तक होईल इतके लिहिले. नंतर मराठी साहित्याचा रितसर अभ्यास करून आता ती साहित्याच्या वेगवेगळ्या रसांच्या निर्मितीचा अनुभव घेत आहे. तिने लिहिलेल्या यापुर्वीच्या अकरा पुस्तकांचे कौतुक जाणकार वाचकांनी केले आहे. तिने लिहिलेल्या चारही वेदांच्या ऋचांवर आधारित चार मराठी पुस्तकांचे वाचकांकडून विशेष स्वागत होत आहे. द्रौपदी या महाभारतातील व्यक्तिरेखेचा तिने अत्यंत सखोल अभ्यास केला असून त्यावर एक त्रिखंडात्मक कादंबरी लिहिली आहे.
"विरहिणी" हे सुमारे ४०० पानांचे संस्कृत काव्य द्रौपदीच्या वनवास व विजनवासातील विरहकालावर आधारित आहे. जाण्कारांची मते जाणून घ्यायला निकिता उत्सुक आहे.
"विरहिणी" हे सुमारे ४०० पानांचे संस्कृत काव्य द्रौपदीच्या वनवास व विजनवासातील विरहकालावर आधारित आहे. जाण्कारांची मते जाणून घ्यायला निकिता उत्सुक आहे.
सुमारे ५०० पृष्ठांचा हा ग्रंथ म्हणजे दभि कुलकर्णी यांनी अनेक वर्षे आपल्या आवडीच्या भावकाव्य या विषयावर लिहीलेल्या टिपणांचा संग्रह आहे. या ग्रंथावर काम सुमारे ३ वर्षे सुरू होते.
द.भि.कुलकर्णी यांचे कविता, कवी आणि सिद्धांत अशा तीन विभागातील लेख म्हणजे कवी आणि त्यांच्या काव्याचा- आस्वाद, आविष्कार, अनुभुती आणि विचार, यांचे शब्दरूप आहेत. आशय आणि अभिव्यक्ती या दोन्ही अंगांनी काव्याचा विचार करतांना दभि सहजपणे कवी आणि वाचक या दोघांच्या भूमिकेतून काव्यविचार मांडतात. वाचक जेव्हा काव्यास्वाद घेत असतो, तेव्हा त्याच्या वैयक्तिक स्मृतींची पानं तो चाळत असतो, ही पानं चाळता चाळता वाचक कवीच्या भाववृत्तीत समरस होतो, गुरफटत जातो. कवितेच्या या आकलन प्रक्रियेत दभिंची सौंदर्यदृष्टीची जोड मिळताच कवीच्या अनुभूतीचा प्रत्यय वाचक घेतो आणि तो क्षण म्हणजे काव्यास्वादाचा निर्मळ आनंदच होय |
बालपणीचे ते रम्य दिवस कोणाला जर परत बोलवायचे असले तर हे पुस्तक उघडा. १९४० ते २०१० या काळातील मराठी शालेय पुस्तकांतल्या कविता इथे आहेत.
अनामवीरा इथे जाहला,आई म्हणोनी कोणी आईस हाक मारी, उठा उठा चिऊताई, ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घॆऊन, आनंदी आनंद गडे, कितीतरी दिवसांत नाही चांदण्यात गेलो, खबरदार जर टाच मारुनी, घाल घाल पिंगा वार्या, चाफ़ा बोलेना, जन पळभर म्हणतील हाय हाय, झुक झुक झुक झुक अगीन गाडी, जिंकू किंवा मरू, टप टप पडती अंगावरती, एक तुतारी द्या मज आणूनी, देवा तुझे किती सुंदर आकाश , निळ्या जळावर कमान काळी, ने मजसी ने परत मातृभूमीला, माऊलीच्या दुधापरी आले मृगाचे तुषार, नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, देणार्याने देत जावे घेणार्याने घेत जावे, पृथ्वीचे प्रेमगीत, आधी होते मी दिवटी, या नभाने या भुईला दान द्यावे, गे मायभू तुझे मी फ़ेडीन पांग सारे, आई एक नाव असतं, मंगल देशा पवित्र देशा, एका कोळीयाने एकदा आपुले...... अशा कविता वाचताना आजही अंगावर रोमांच उभे रहातात. हे संकलित पुस्तक वाचताना तुम्ही कालयंत्रात हरवून गायब झालात तर कोणालाच नवल वाटणार नाही. आपल्या जगण्यात आपल्यावर झालेल्या संस्कारांचा मोठा वाटा असतो. आई आणि वडील यांच्यानंतर आपल्यावर संस्कार करणारे तिसरे म्हणजे आपले गुरुजन. मराठी कवितांनीआणि त्यांच्या द्वारे आपल्या गुरुजनांनी आपल्याला संस्कारांची जी टिफ़िन बॉक्स दिली त्याच्या जीवावर तर आपण आयुष्य काढले. अधून मधून एकदा तरी हा टिफ़िन बॉक्स उघडून चाखायला हवा. हे पुस्तक वाचताना तुमच्या डोळ्यांसमोर जी मित्रमंडळी येतील त्यांना संपर्क करून या पुस्तकाबद्दल सांगा जरूर. सह्याद्रीचा सिंह गर्जतो! शिव शंभू राजा! दरीदरीतून नाद गूंजला! |