संगीत : शास्त्र, ऑडिओ, व्हिडिओ, पुस्तकं,
रामकृष्ण बाक्रे यांची तीन महान पुस्तकं
ई साहित्य प्रतिष्ठान सादर करीत आहे
डॉ. सरोज सहस्रबुद्धे आणि डॉ. नील सहस्रबुद्धे
या इंग्लंडस्थित गायकांनी गायलेली मराठी गाणी
त्यांच्या युट्यूब चॅनेलवर अशी अनेक गाणी ऐकता येतील
Email id – [email protected]
WhattsApp – +44-7952592212
डॉ. सरोज सहस्रबुद्धे आणि डॉ. नील सहस्रबुद्धे
या इंग्लंडस्थित गायकांनी गायलेली मराठी गाणी
त्यांच्या युट्यूब चॅनेलवर अशी अनेक गाणी ऐकता येतील
Email id – [email protected]
WhattsApp – +44-7952592212
|
|
|
|
|
|
गिटार गाईड 9867646686
|
प्रशांत दांडेकर यांनी भरवलेल्या या नेट मैफ़लीला आता अनेक चाहत्यांची मांदियाळी जमा झाली आहे. शेकडो पत्रे, डझनावारी मौलीक सूचना आणि एखाद दुसरी प्रेमळ सुनावणीही या मैफ़लीत येत असते. पंचमदा, राहुलदा, सलीलदा, लक्ष्मीकांत प्यारेलाल, शंकर जयकिशन, मदनमोहन, वसंत देसाई, नौशाद, खैय्याम, रवी, जयदेव, ओ पी नैय्यर, सी रामचंद्र असे दिग्गज संगीतकार आणि शैलेंद्र, गुलजार, शकील बादायुनी, साहीर लुधियानवी, राजेंद्र कृष्ण, मजरूह सुलतानपुरी, हसरत जयपुरी असे प्रतिभावान गीतकार या मैफ़लीत हजेरी लावून गेले.
या सर्वांचे किस्से आणि गाणी यांच्यासोबत गुंग आणि धुंद झालेल्या वाचकांसाठी आता या मालिकेचा चवथा भाग येत आहे. गळ्यामध्ये सरस्वतीचे अधिष्ठान असणारे आपले महान गायक तलत महमूद, महेंद्र कपूर, महंमद रफ़ी, मन्ना डे, हेमंत कुमार, मुकेश, किशोरकुमार यांच्या मनमोहक गाण्यांची आणि किश्शांची मैफ़ल तुम्ही चुकवूच शकत नाही. आणि हो! एक मुद्दाम सांगायला हवं. या सर्व मैफ़लींची ई बुक्स ही डबल मिडियमची आहेत. म्हणजे या पुस्तकात जी गाणी आहेत त्यांवर क्लिक केलं की ते गाणं ऐकूही येतं. अनेकांना याचा पत्ताच नव्हता . म्हणून यावेळी हे मुद्दाम सांगत आहोत. सुमन कल्याणपूर, उषा मंगेशकर, जितेंद्र अभिषेकी, अनुराधा , अनिल पौडवाल, मंगेश पाडगांवकर, सुधीर मोघे, जगदिश खेबुडकर, सुरेश भट अशा दिग्गजांनी सजवलेली प्रशांत यांची ही पाचवी मैफ़ल. त्यांची प्रत्येक मैफ़ल ही एक पंचतारांकित मेजवानीच असते. पण आजची मैफ़ल मराठमोळ्या निव्वळ दिग्गजांची होती. मराठी भाषा आणि महाराष्ट्र म्हणजे गुणीजनांची खाण. या खाणीतून निघालेल्यी एकेका रत्नाची प्रभावळ आपले अख्खे आयुष्य उजळून टाकायला पुरेशी आहे. ज्या मराठी भाषेला लिळाधर स्वामी, नरेंद्र कवी, ज्ञानोबा, तुकोबा असा जबरदस्त पाया आणि कळस लाभला, त्या मराठी खाणीतून अजून अनेक रत्ने उदयाला यायची आहेत. येत आहेत. आपल्या आजूबाजूला आहेत. त्यांची प्रभा आणि प्रतिभा आपल्यापर्यंत जोडणारे पूल, व्यासपिठं उभी रहात आहेत. ई साहित्य प्रतिष्ठान त्यातलंच एक. हे व्यासपीठ नवनवीन लेखक कवी गायक, वक्ते, नाटककार आपल्यासमोर सादर करत आहे, आणि राहील. आपल्याकडून जास्तीत जास्त प्रोत्साहन आणि दाद मिळावी एवढीच अपेक्षा आहे. |
संगीत कानसेन : भारतीय शास्त्रीय संगीत ऐकायला आवडते, पण त्यातलं नक्की काय ऐकायचं ते कळत नाही. सूर किती व कोणते? श्रुती म्हणजे काय? कोमल, तीव्र , शुद्ध स्वर म्हणजे काय? ताना, पलटे, आलाप, गमक, मुरकी हे काय असतं? ताल म्हणजे काय? द्रुत आणि विलंबित म्हणजे काय? राग म्हणजे काय? ठुमरी आणि ख्याल म्हणजे काय? सम म्हणजे काय? दुगुन, तिगुन, तिहाई म्हणजे काय? बेसूर म्हणजे काय? घराणी काय असतात? होरी, चैती, कजरी हे काय असतं? एक ना अनेक. कितीतरी प्रश्न. या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा एक प्रयत्न. सहा पुस्तकांची एक मालिका.
अधिक माहितीसाठी लिहा :
[email protected]
संगीत कानसेन भाग २ : ताना, आलाप, गमक
संगीत कानसेन भाग ३ : राग
संगीत कानसेन भाग ४ : लय, ताल, ठेका
संगीत कानसेन भाग ५ : ख्याल, धृपद, ठुमरी वगैरे
रागांच्या माहितीचा चार्ट
सिनेमा संगीत आणि राग
माधुरी जाधव यांनी गायलेली मराठी गाणी
|
|
गिटार : श्री प्रसाद किर्लोस्कर : 9867646686
गजानना श्री गणराया
गजानना श्री गणराया : महाराष्ट्राच्या
संस्कृतीत गणपतीला अनन्य साधारण महत्त्व आहे. गणपती हा वैदिक देव, आदिदेव. कोणत्याही
शुभकार्याच्या आरंभी अग्रपूजेचा मान गणपतीलाच मिळाला आहे. गणराय हा सुखदेणारा, दुःख
हरण करणारा, दुष्टांना शासन करणारा आणि भक्तांना आनंद देणारा देव आहे. म्हणून वाद्यसंगीताची
सुरुवात करताना पहिले गीत : गजानना श्री गणराया
|
मेंदीच्या पानावर
मेंदी. मेंदी म्हणताच आठवते तिच्या गर्द हिरव्या पानांनी हातांवर उमटणारी एक लालचुटुक जादू. मेंदी म्हणताच आठवते ती अजूनही हळदीच्या अंगाची असलेली एखादी अल्लड, अबोध अशी नववधू.
पं. हृदयनाथ मंगेशकरांनी संगीत दिलेले, पाश्चिमात्य संगीताचा बाज वाटावा असा गिटार या वाद्याचा वापर करून सजवलेले एक अस्सल मराठमोळे गाणे. मेंदीच्या पानांवर. गिटारच्या स्वरांवाटे ऐकू या. |
धुंद मधुमती रात रे
धुंद करणारी मादक रात्र, अवकाशात झालेला रजनीनाथाचा संचार, निसर्गातील प्रणयाला आलेली बहार. अशा धुंद वेळी नायिका कोणाला बरे साद घालत आहे? कीचकवध या चित्रपटातील एक अप्रतिम गीत. गिटारच्या स्वरांची अप्रतिम आरास.
|
सूर तेच छेडिता
सूर तेच छेडिता : न बोलताच कळले मला गूज तुझ्या मनीचे
सूर एक मी छेडिता गीत त्याचेच जाहले असे म्हणत नायक आपल्या प्रेयसीच्या मुग्ध प्रेमाचा उल्लेख करत आहे. "अपराध" या चित्रपटातील एक गोड अपराध. |
चाफ़ा बोलेना
चाफ़ा... चाफ़ा बोलेना. चाफ़ा चाले ना...
पण चाफ़ा म्हटलं की चाफ़ा डोळ्यांसमोर येतोच. आणि चाफ़ा डोळ्यांसमोर येताच त्याच्या सुगंधाने मन मोहून जाते. चाफ़ा फ़ुलून त्याचा सुगंध दरवळू लागला की देहभान विसरून जायला होतं. मन प्रसन्न होतं. चित्तवृत्ती उल्हसित होतात. त्याचप्रमाणे कवी ’बी’ यांनी लिहिलेले हे अजरामर गीत मनावर तोच परिणाम करतं. त्याचा सुगंध आजही तसाच कायम आहे. नुसते ऐहिक सुखाच्या मागे न लागता परमार्थातूनच खरा आनंद मिळतो, हे या गीतातून कवी सांगू इच्छितो. |
हा खेळ सावल्यांचा
खेळ ! मग तो मनाचा असेल किंवा प्रेमाचा. खेळ हा खेळच असतो. हा मात्र सावल्यांचा खेळ आहे. सुर्याच्या तेजाने प्रकाशमान झाल्यासारखा भासणारा चंद्र हा ग्रहणकाळात जणू चांदण्यांचा शाप भोगत असल्यासारखा लुप्त होतो. पण खरे तर हाही एक सावल्यांचाच खेळ असतो. या मनोहर कवीकल्पनेतून साकार झालेले हे गीत.
|
गारवा
चैत्र संपून वैशाखाची चाहूल लागलेली आहे. वैशाख म्हटलं की वैशाख वणवा आलाच. त्या वैशाखवणव्यात सर्व जीवप्राणी होरपळून निघत आहेत. परंतू अशा या वैशाख वणव्यातही हळूवार वार्याची एक झुळूक जाणवते. या गारव्यामुळे मन प्रसन्न, उल्हसित होतं आहे. ऐकू या मिलिंद इंगळे यांचं एक सुखद गारवा गीत. यातलं तुषार पार्टे यांचं संगीत संयोजन लक्षवेधक आहे.
|
नाच रे मोरा
सर्वत्र चांगलाच गारवा जाणवतोय. आकाशात मेघही दाटून आले आहेत. विजा टाळ्यांचा कडकडाट करताहेत. अशातच पावसालाही सुरुवात झाली आहे. अशा मुसळधार पावसात आंब्याच्या वनात आपला पिसारा फ़ुलवून नाचणारा मोर तुम्ही पाहिलाय का? आमच्या या गाण्यातली ही छकुली तिच्या या निळ्या सवंगड्याला पावसात खॆळायला, पावसातल्या इंद्रधनुष्याच्या कमानीखाली नाचायला बोलावत आहे. ऐकू या पुलंचे एक अप्रतिम बालगीत.
|
शारद सुंदर चंदेरी राती
शरद ऋतूतील चांदण्याची सुंदर रात्र...
स्वप्नातल्या झुल्यावर झुलण्याचे असे दिवस... निसर्गही ऐन भरात आलेला... अशा निसर्गदत्त मादक वातावरणात प्रियकरासाठी आपल्या सगेसोयर्यांनाही सोडून आलेली अशी ही एक प्रेयसी, जी अत्यंत बेभानपणे त्याला आपल्या प्रितीची साद घालून स्वतःजवळ बोलवत आहे. |
वार्या वरती गंध पसरला...
हिरवीगार वनराई,
आल्हाददायी शीतल मंद वारा, शांत, प्रसन्न वातावरण, खळाळून वाहणारी नदी असे निसर्गाने नटलेले गाव, एका गाण्यातून आपल्या भॆटीला आले तर? असे निसर्गरम्य गांव , ज्या गांवच्या मातीचा दरवळ तुमच्या मनातील आठवणींना उजाळा देईल. आजच्या एक जल्लोषपूर्ण गाणे. हा जल्लोष स्वरांवाटे ऐकूया. |