Marathi Novels
एकाहून एक सरस मराठी कादंबर्या.
एकदा हातात घेतली की पूर्ण केल्याशिवाय थांबूच शकत नाही.
साने गुरूजी लिखित श्यामची आई आता ईपब स्वरूपात
हे वाचण्यासाठी किंडल वापरा किंवा आपल्या मोबाईलवर epub reader download install करा. हे epub.03 अद्ययावत वर्शन आहे. त्यासाठी LITHIUM नावाचा रीडर चांगले रिझल्ट देतो.
ज्यांना शक्य नसेल त्यांच्यासाठी PDF आहेच.
हे वाचण्यासाठी किंडल वापरा किंवा आपल्या मोबाईलवर epub reader download install करा. हे epub.03 अद्ययावत वर्शन आहे. त्यासाठी LITHIUM नावाचा रीडर चांगले रिझल्ट देतो.
ज्यांना शक्य नसेल त्यांच्यासाठी PDF आहेच.
एक जबरदस्त वेगवान पोलिटिकल थ्रिलर- इब्लिस
'इब्लिस' मास्क चेहऱ्यावर धारण करून अन्यायाचं राज्य संपवायला तो निघाला होता. म्हणून अंडरवर्ल्डमध्ये त्याचं नांव 'इब्लिस' पडलं होतं. इब्लिस!!! पिवळट पांढरे दात विचकारा, काळी आऊटलाईन असलेला, डोक्यावर दोन अनुकुचीदार रक्तवर्णी शिंगे असणारा, नाकापासून हनुवटीपर्यंत तोंड झाकोळून टाकणारा 'डीमन' मास्क तो सतत परिधान करून असायचा; असतो... त्याच्या या मास्क वरून त्याला सर्वमान्य प्रचलित नांव 'इब्लिस' असंच पडलं होतं. हे नांव उच्चारणही बरेचजण टाळत असतं. हिंमत असणारेच त्याला या नांवाने उद्धृत करत असत. त्याच्या प्रिय 'कोल्ट कमांडर्' या पिस्टलने तो दुष्ट निखदनाचे काम करी म्हणून त्याला त्याची सोबतीण हेली, ही कमांडर् देखील म्हणत असे. परंतु 'कमांडर्' पेक्षा 'इब्लिस' हेच नांव त्याला अधिक प्रिय! या इब्लिसचा अर्थ प्रचलित मराठीतील 'उपद्व्यापी' असा नाही. अरबी भाषेनुरूप 'तो, जो हमेशा दुःखात असतो' असा 'इब्लिस!' यालाही दुःख कुठे चुकलं होतं?! दुःख जणू याची सावली होतं. अरबीत आणखी एक अर्थ आहे; तो म्हणजे 'सैतानांचा नेता!' पारसी/तुर्की/ग्रीक भाषा संस्कृतींमध्येही याचा अर्थ 'सैतान' असाच दिलाय. तो स्वतःला तसाच पाहत होता. सैतानासारखा! 'इब्लिस' हा, कुणासाठी 'कमांडर्' होता, कुणासाठी इब्लिस होता, कुणासाठी तो 'विरुढक' होता, तर कोण त्याला 'हेडीस' म्हणून गेलं होतं... परंतु... परंतु ही कथा 'इब्लिस'ची नाहीच. तर ही कथा आहे 'इब्लिस'चा आमूलाग्र बदल होऊन पुन्हा 'रवी' होण्याची! इब्लिसचा हिंसेकडून अहिंसेकडे येण्याचा प्रवास म्हणजे ही कथा... |
सुप्रिया जोशी नेहमीच वेगळ्या वाटेवरचे लिहितात.
त्यांचे पहिले पुस्तक जगातल्या सहसा लोक जिथे जात नाहीत अशा आफ़्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील विचित्र जागांबद्दल प्रवासवर्णन होते. दुसरी कादंबरी ही मराठीत सहसा न लिहिल्या जाणार्या समलैंगिकतेच्या विषयावर होती. त्यांची ही तिसरी कादंबरी तशीच वेगळी गूढ कादंबरी आहे. मनोविकारांच्या आजवर न लिहिलेल्या विषयावरची ही कादंबरी वेगळे काही शोधणार्या वाचकांसाठी आहे. |
भारतावर अलेक्झांडर राजाचे आक्रमण सुमारे अडिचहजार वर्षांपुर्वी झाले. भारतियांना अलेक्झांडर म्हणता येत नसे म्हणून ते त्याला सिकंदर म्हणत. त्याला अडवले राजा पुरुषोत्तमाने. ग्रीकांना पुरुषोत्तम म्हणता येत नसे म्हणून तो राजा पोरस या नावाने प्रसिद्ध झाला. आताच्या पाकिस्तानमधला चिनाब आणि झेलम नद्यांच्या मधला सुपीक पंजाब म्हणजे पोरसराजाचे राज्य. तक्षशीला विद्यापीठ आहे तेही तिथेच. भारतियांना या पराक्रमी राजा पुरुषोत्तमाची माहिती मिळावी म्हणून हा पुस्तक प्रपंच.
|
गुरु द्रोणाचार्यनं गुरुदक्षीणा म्हणून अंगठा मागतांना पक्षपात केला. परंतू ती कृती काही अंशी चूक असली तरी नाण्याच्या दोन बाजूनुसार सखोल विचार केल्यास बरोबरही वाटते. त्याचं कारण म्हणजे पोट. पोटासाठी माणूस चोरीही करतो. असो. तो आपला मुद्दा नाही. मुळात कादंबरीतून मी त्याच गोष्टीची उकल केली. मी लिहिलं की यात द्रोणाचार्य दोषी नाही. दोष होता अर्जूनाचा.
|
द्रौपदीवरील त्रिखंडात्मक कादंबरीचा तृतिय खंड
द्रौपदी हे महाभारतातील एक जगावेगळे व्यक्तीमत्व. जगाच्या कोणत्याही साहित्यात अशी व्यक्ती, अशी स्त्री नाही. रूपगर्विता, पाचांची पत्नी, एका स्त्रीच्या वाट्याला येणारे, एका मातेच्या वाट्याला येणारे सर्व प्रकारचे भोग तिने भोगले. राजविलास, वनवास, अज्ञातवास, सर्व सर्व.
द्रौपदीच्या पूर्ण आयुष्याचा वेध घेणारी ही त्रिखंडात्मक कादंबरी एका विद्यार्थिनीने लिहीलेली आहे. तुमची प्रतिक्रिया बहुमोल असेल. |
अडखळत अडखळत प्रेमाची पाऊले टाकली मी त्याची ही स्टोरी. आता ती इतरांनी एखाद्या पोथीचे श्रवण करावे तशी ऐकावी का? अर्थातच. कारण आपल्या शिक्षणपद्धतीत हे असले 'जीवनावश्यक' विषय कुणी शिकवतच नाहीत. तेव्हा माझ्यासारख्या स्वमेहनतीवर पुढे आलेल्याने इतरांना पुढे जाण्यास असे दिशादर्शन केलेच तर पाहिजे की नाही? म्हणजे पथदर्शन म्हणा.. मार्गदर्शन म्हणा किंवा काही म्हणा!
कुठल्यातरी हिंदी सिनेमात एकदा पाहिले, म्हणजे ऐकले होते.. दुसऱ्या कुणाच्या लग्नात अजून कुणाची लग्नं जमत असतात म्हणे! .. म्हणजे तिकडे बोहल्यावर पद्धतशीर लग्न सुरू असते.. नवरानवरी बोहोल्यावर हाती माळा घेऊन सलज्ज वगैरे उभे असतात. भटजीबुवा पुढच्या आयुष्यातील तारांबळ कळावी म्हणून चंद्रबलं आणि ताराबलं वगैरे घसा फोडून गात असतात.. नि इकडे कुणी होतकरू आयुष्यातले ते एकमेव ध्येय असल्यासारखा आपली लाइन जमवण्याच्या मागे लागलेला असतो. त्यात किती चूक की किती बरोबर हे नाही करायचे, पण एक आपले जनरल ऑब्झर्वेशन माझे. एक मस्त गुलाबी स्मार्ट प्रेमकथा |
’शंभर वर्षे पुढे’ ही ६५० पानांची एक गंभीर विषयावरची मजेदार कादंबरी आहे.
---- एका चलाख चोराने आजच्या सर्वसत्ताधीशांकडून जगातली सर्वात किंमती गोष्ट चोरली. आणि ते मागावर लागल्यावर त्यांना चुकवता चुकवता, तो शंभर वर्षे पुढच्या काळात पोहोचला खरा! पण ती सगळ्यात किंमती गोष्ट त्याच्याकडून हिरावून घेण्यासाठी, त्या काळातले सर्वसत्ताधीश देखील त्याच्या मागे लागले. चोर किती पळणार? कुठे पळणार? कशी राखणार ती सर्वात किंमतीची गोष्ट? ती सर्वात मौल्यवान गोष्ट होती- त्याचं स्वातंत्र्य… ---- एक वेगवान कथा. एक नाविन्यपुर्ण थीम. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट या कादंबरीतली, ती म्हणजे ’जगातली सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती?’ या प्रश्नाचा वेध. जगातील सर्व सत्तधीश, कालचे, आजचे आणि उद्याचे विरुद्ध त्या त्या काळातील जनता. प्रत्येक काळातील प्रश्न वेगळे, संघर्षांचे स्वरूप वेगळे, औजारे आणि हत्यारे वेगवेगळी. पण अंतःस्थ प्रेरणा एकच. स्वातंत्र्य. सामाजिक, राजकीय जाणिवा जागृत असणार्या वाचकांसाठी एक महाकादंबरी पेश करत आहोत. शंभर वर्षे पुढे- लेखक: संयम बागायतकर. फ़क्त ई साहित्य प्रतिष्ठानवर उपलब्ध. |
चर्मयोगी : संत हरळ्या यांच्या जीवनावरील कादंबरी : लेखक- अंकुश शिंगाडे
ज्या लिंगायत संतावर ही कादंबरी लिहिण्यात आली. त्या संताचे नाव आहे संत हरळ्या. ते चांभार जातीचे होते. महात्मा बसवेश्वर हे कर्नाटकातील कल्याण नगरात चालुक्य ब्रिज्वल राज्यात प्रधानमंत्री पदी कार्यरत होते. त्यांनी एकदेवोपासना(शिवतत्व)रम हाच कैलास, दासोह(दानधर्म), सदाचार, अस्पृश्यता निवारण आणि स्वातंत्र्य समता बंधूता तत्वावर अनुभव मंटप ही अधिष्ठीत धार्मीक संसद स्थापून त्यात महिलांना प्रथम आरक्षण देवून, त्यांना शिक्षीत करुन त्यांच्याकडून लोकभाषेत वचनवाङ्मयाची निर्मीती करुन बाराव्या शतकात संपूर्ण मानव समाजाला एका झेंड्याखाली आणले. त्यामुळे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अनेक व्यवसाय करणारा मानव समाज बसवाच्या कल्याण नगरीत एकत्र झाला. त्यातील संत हरळ्या हे एक होय. चर्मयोगी ही कादंबरी शहीद संत हरळ्याच्या जीवनावर रेखाटलेली आहे.
संत हरळ्या हा चांभार समाजातील पहिला संत आहे. पण त्यांच्याबद्दलची माहीती बहुतांश समाजाला नसल्याने मी संत हरळ्यावर चर्मयोगी कादंबरी लिहून त्यांचा इतिहास चांभारसमाजच नाही तर जगापुढे आणण्याचा अल्पश: प्रयत्न केलेला आहे. इ.स. एकहजार च्या दशकात म्हणजे संत ज्ञानेश्वरापूर्वी आणि म्हाईभटापुर्वीही तसेच संत रविदासापुर्वीही संत हरळ्या हा चांभार समाजातील पहिला संत होवून गेला. ज्याने समाजातील जातीभेद, अस्पृश्यता मोडण्यासाठी स्वतःच्या मुलालाच दावणीवर लावले. नव्हे तर त्याचा विवाह एका ब्राह्मण मंत्र्याच्या मुलीशी करुन दिला. त्याकाळी जातीतच विवाह करण्याची प्रथा अस्तित्वात होती. तसेच असा आंतरजातीय विवाह केल्यावर आपल्याला फाशी होवू शकते. याचीही कल्पना हरळ्याला होती. तरीही प्राणाची पर्वा न करता त्यांनी आपल्या मुलाचे लग्न ब्राह्मणाच्या मुलीशी लावून दिले. मात्र ते कसे लावून दिले? त्यासाठी त्यांनी त्या ब्राह्मण मंत्र्याला कसे तयार केले? बसवेश्वराचे हरळ्याला कशी मदत केली? का मदत केली? गुलाबी कोण होती? वैगेरे प्रश्नांची उत्तरे या चर्मयोगी कादंबरीतच आपल्याला पाहायला मिळतील. |
ही कादंबरी छान आहे. पण केवळ मनोरंजक नाही. या पुस्तकात समलैंगिकता हा विषय गांभिर्यपूर्वक घेतला आहे. लैंगिकतेचे अनेक पैलू आहेत. त्यातला हा एक. भिन्नलैंगिकता ही एकच बरोबर आहे हा अट्टाहास बाळगणं हे कितपत बरोबर आहे याचा विचार व्हायला हवा. समलैंगिक लोकांचं भावविश्व कसं असतं हे दाखवण्याचा हा एक प्रयत्न आहे. या भावविश्वाला शब्दरूप देण्याचा हा एक प्रयास आहे. या पुस्तकाचा एक सेन्सिटायझेशन प्रायमर म्हणून उपयोग व्हावा हीच इच्छा. |