Marathi Story books
मराठी लघुकथा
मराठीतील सर्वोच्च कथालेखक असा मान असलेले श्री जी. ए. कुलकर्णी हे मराठी साहित्यातले रत्नच. त्यांची प्रत्येक कथा पैलूदार असे. या प्रत्येक पैलूचे नेमके आकलन होणे हे कोणा एका वाचकाला दुरपास्तच. २०२२-२३ हे जी. ए. यांचे शताब्दी वर्ष होते! या वर्षाचे औचित्य साधून जाणत्या पाचशे जी.ए.प्रेमी वाचकांनी एक उपक्रम हाती घेतला. आंतरजालावर एकत्रित येऊन त्यांनी जी. ए. यांच्या ९४ कथांवर विविधांगाने चर्चा केल्या, अनेक मते, दृष्टीकोन मांडले. संकलित केले. ही संकलने सात खंडांत उपलब्ध आहेत. जी.ए.यांच्या कथावाचनाचा आनंद घेतांना या चर्चा जीएप्रेमी तसेच अभ्यासक-समीक्षकांना निश्चितच उपयुक्त ठरतील. हा मौल्यवान ठेवा आपल्याकडे नक्कीच हवा!
ही सात पुस्तके कथासंग्रह नाहीत तर एका एका कथेवरील विविध वाचकांची मते आहेत. ती संवादाच्या स्वरुपात आहेत. |
विज्ञानकथा : हिरव्या बोक्याची गोष्ट: डॉ नितीन मोरे
लाखो प्रकाश वर्षे पसारा असलेल्या आकाशगंगा ज्यात हरवून जातात अशी कृष्ण विवरे आणि त्या कृष्ण विवराना समीकरणा मध्ये बांधणारे गणिती, जेव्हढे सूक्ष्म तेव्हढेच विराट, तरीही एकजीव.
आणि असे गणिती जेंव्हा म्हणतात "An equation for me has no meaning unless it represents a thought of God." - तेंव्हा एक नवीन क्षितीज सामोरे येते.
त्याला साक्षी ठेऊन वेगळ्या वाटेने जाताना अचानक साता समुद्रापार एक आर्ष हाक कानी येते, तर कधी डोंगर माथ्यावर यक्षगान ऐकतो, कधी जंगलात हरवतो आणि इतिहासाला साक्षात बघतो, कधी जन अरण्यात मिसळून एक रुदाली अनुभवतो, कधी एका तुफानात सापडतो, कधी वाळवंटात मृगजळाच्या मागे धावतो, कधी गणिताच्या जादुई पोतडीतून अनवट चीजा बाहेर येतात आणि घेरून टाकतात. कधी त्या अनंत क्षितीजाच्याच पाठीमागे पळताना दमछाक होते आणि वाळूत अंग टाकून देतो. कधी तळ्यात दगड मारून भाकऱ्या पाडायचा मोह होतो. असे काही बाही बघत रमत गमत जाताना एकदम एखादे रौद्र, हृदयद्रावक दर्शन ही घडते.
सामान्य, सुजाण माणसाला, बुद्धीला पटतील पण कल्पना विश्वात रमवतील, कोड्यात टाकतील तसेच हसवतील अशा ह्या कथा आहेत.
यश अपयशाचे अंतिम अर्थ - अनर्थ, हिंसा - अहिंसा, मरणोत्तर विज्ञान, अध्यात्म, studies in consciousness, quantum physics, what is information in IT, गणिताचे तत्वज्ञान आणि तत्वज्ञानातील गणित, अवतार आणि singularity, राजकारण, व्यवस्थापन, श्रद्धा, मनाचे वास्तविक स्वरूप, - अशा कितीतरी गोष्टी, त्यांचा रुढार्थ आणि नवीन क्षितीज ह्याचा मेळ बसत नाही आणि आपण विचारात पडतो. हे नक्की काय आहे.
ह्या कथांचे कदाचित हेच यश असेल.
- प्रकाश कार्येकर

वेडा बाळू PDF प्रत
|
वेडा बाळू epub प्रत . हे वाचण्यासाठी किंडल वापरा किंवा आपल्या मोबाईलवर epub reader download install करा. हे epub.03 अद्ययावत वर्शन आहे. त्यासाठी LITHIUM नावाचा रीडर चांगले रिझल्ट देतो. Lithium reader is free.
|
भावकथा ! भावुक व्यक्तीं साठी खास
विचार करायला लावणार्या कथा ! इंटेलिजंट वाचकांसाठी.
भुताखेतांची डेंजर कथा!
रात्री अपरात्री वाचू नका.
भ्हातुकलीचा खेळ
|