इतिहास
आज आम्ही वाचकांसाठी एक वेगळे शिवचरित्र घेऊन आलो आहोत. मराठीमधे अनेक शिवचरित्रे आहेत आणि त्याचबरोबर नवनवीन संशोधनातून नवी माहितीही उपलब्ध होत असते. त्यामुळे महेश गुप्ते यांनी पंचवीस वर्षांच्या अभ्यासातून लिहिलेले हे शिवचरित्र आधीच्या शिवचरित्रांहून वेगळे आहे. यात केवळ महाराजांच्या आयुष्यातील घटनांची क्रमवारी नाही तर अनेक वेगवेगळे विषय घेऊन महाराजांची थोरवी अधोरेखित केली आहे. महाराजांची अर्थव्यवस्था, न्यायव्यवस्था, आरमार, महसूलव्यवस्था, गडकिल्ले, पर्यावरण धोरण, धार्मिक धोरण, शेतीव्यवस्था, युद्धनिती इत्यादी अनेक बाबींवर या पुस्तकात स्वतंत्र उहापोह आहे. त्यामुळे हे पुस्तक आजवरच्या शिवचरित्रांहून वेगळे आहे. यातील काही माहिती ही आजवरच्या समजांहून वेगळी आहे. ती अनेकांच्या पचनी पडण्यास अवघड ठरू शकते. परंतू लेखकाने आजवरच्या सर्व उपलब्ध पुराव्यांनिशी हे लिहिलेले आहे व कोणत्याही प्रकारच्या बाजू घेण्याचे टाळले आहे.
पुस्तक वाचून आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास लेखक श्री महेश गुप्ते उत्सुक आहेत. (Whatsapp no. 7738852531) |
शिवचरित्र हा महाराष्ट्रामध्ये तरी अत्यंत भावनेचा विषय आहे, अभ्यासाचा तसा कमीच आहे. पंढरीचा विठूराया व छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची दोन आराध्य दैवते. शिवाजी महाराजांचे नाव निघालं की मराठी माणसाला (जे महाराष्ट्रात राहतात ते सर्व मराठी, प्रदेशवाचक, जातीवाचक न्हवे) भरून येते. सहाजिकच शिवाजीराजांवर नि:पक्षपातीपणे, निरपेक्षपणे, अलिप्तपणे लिहिणे व बोलणे शंभर टक्के शक्य नाही. कितीही प्रयत्न केला तरी अशा लेखनात भक्ती, आदर, प्रेम हे भाव थोडेफार का होईना येतातच. हे सर्व दोष कमी करण्याचा प्रयत्न करून हे शिवआख्यान मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज ही व्यक्तिरेखा फार मोठी आहे, तिचे शेकडो पैलू आहेत. कुठल्याही अभिनिवेशाशिवाय शिवचरित्र मांडणे व समजावून घेणे हे एक फार मोठे कालातीत आव्हान आहे. त्यामध्येहि युगपुरुष, महापुरुष, शिवाचा अवतार अशा दैवी संज्ञा बाजूला ठेऊन फक्त एक आपल्या सर्वा सारखाच एक मनुष्य म्हणून महाराज समजून घेणे खूप आवश्यक आहे.
जे जे काही जुने परंपरावादी आहे त्यातील चुकीच्या गोष्टीमध्ये बदल करून ,त्या बंद करून, जे चांगले आहे त्यात भर घालूनच सर्वांची उन्नती आहे हे महाराजांनी आपल्याला ३५० वर्षांपूर्वीच सांगितले आहे. राज्याभिषेकाचे राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक पैलू एकत्रिक मांडण्याचा प्रयत्न केला आहे. |
१. हसन गंगू बहामनी. - दिल्लीचा सुलतान महंमद तुघलकाचा दक्षिणेतील दौलताबाद किल्ला जिंकून दक्षिण भारताचा प्रमुख झाला. बहामनी राजवटीचा संस्थापक. याच्या घराण्याचा शेवट झाल्यावर दक्षिण भारतात निजामशाही, बिदर शाही, इमादशाही, कुतुबशाही आणि आदिलशाहीची निर्मिती. याचा मृत्यू १० फेब्रुवारी १३५७ ला झाला.
२. पातशाही बेगम नूरजहाँ - सम्राट अकबरानंतर आलेला त्याचा पुत्र, मुगल बादशहा सलिम उर्फ जहाँगीर याची चतुरस्त्र, बहुगुणी, बेगम. जहाँगीरला ताब्यात ठेवून हिनेच राज्य कारभार केला. जन्म अफगाणिस्तानच्या मरूभूमीत १५७९ मधे. मृत्यू-१७ डिसेंबर १६४५ लाहोरमधे. ३. जगन्माता जिजाऊसाहेब. - शहाजीराजांच्या पत्नी, शिवरायांच्या मातोश्री, सिंदखेडचे राजे लखूजी जाधवांची कन्या. पुण्यात लहान शिवरायासह आल्या आणि शहाजीराजांनी पाठवलेल्या उत्तमोत्तम अधिकार्यांच्या मदतीने शिवरायांना मोठं केलं, त्यांना घडवलं. जन्म - सन १५९९ च्या सुमारास. मृत्यू - शिवप्रभूंच्या राज्याभिषेकानंतर १५ दिवसांनी रायगडच्या खालच्या पांचड निवासी १७ जून १६७४. ४. नानासाहेब पेशवे.- विठूरचे पेशवे दुसरे बाजीराव यांचे दत्तकपुत्र. १८५७ सालच्या स्वातंत्र्य युध्दाचे शिल्पकार. जन्म- १९ मे १८२१, माथेरानजवळ वेणू गावात. मृत्यू- नैमिषारण्यात. मृत्यूची तारीख नक्की नाही. ५. बहादूरशहा जफर – दिल्लीचा शेवटचा नाममात्र बादशहा. पण १८५७ सालच्या स्वातंत्र्ययुध्दात भाग घेतल्यामुळे इंग्रजांनी त्याला मंडालेच्या कैदेत ठेवलं. तिथे त्याचा मृत्यू झाला. जन्म - २५ ऑक्टोबर १७७५. मृत्यू ७ नोव्हेंबर १८६२, ब्रह्मदेशात.. ६. सरदार परशुरामभाऊ पटवर्धन. – मिरजेच्या पराक्रमी सरदार पटवर्धन घराण्यात जन्म. नाना फडणीस कारभारी असतांना सेनापतीपद मिळालं. जन्म- १७४०. मृत्यू- १७ सप्टेंबर १७९९ या दिवशी पट्टणकुडीच्या लढाईत वीर मरण |
भारतावर अलेक्झांडर राजाचे आक्रमण सुमारे अडिचहजार वर्षांपुर्वी झाले. भारतियांना अलेक्झांडर म्हणता येत नसे म्हणून ते त्याला सिकंदर म्हणत. त्याला अडवले राजा पुरुषोत्तमाने. ग्रीकांना पुरुषोत्तम म्हणता येत नसे म्हणून तो राजा पोरस या नावाने प्रसिद्ध झाला. आताच्या पाकिस्तानमधला चिनाब आणि झेलम नद्यांच्या मधला सुपीक पंजाब म्हणजे पोरसराजाचे राज्य. तक्षशीला विद्यापीठ आहे तेही तिथेच. भारतियांना या पराक्रमी राजा पुरुषोत्तमाची माहिती मिळावी म्हणून हा पुस्तक प्रपंच.
|
१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचे महत्त्व अजूनही आपल्याला फ़ारसे जाणवलेले नाही.
त्यापुर्वी जे प्रदेश युरोपियन लोकांनी ताब्यात घेतले तिथल्या लोकांचे जवळपास संपूर्ण शिरकाण करून त्यांनी गोर्यांची केवळ राजकीय सत्ताच नव्हे तर सर्व ्प्रकारचे व्यवहार आपल्या ताब्यात घेतले. उदाहरण म्हणजे अमेरिका ऑस्ट्रेलिया वगैरे. या देशांत एके काळि गोरे नव्हते हे आपल्याला अता खरेही वाटत नाही. तेच त्यांनी भारतात केले असते. पण मधेच १८५७ घडले . ते का घडले. कसे घडले. एक ज्वालाग्राही नाटक वाचाच. |
गुलशने इब्राहिमी
गुलशने इब्राहिमी हे पुस्तक शिवशाहीच्या आधीच्या महाराष्ट्राचे, त्यातल्या राज्यकारभाराचे वर्णन करणारा एक महत्त्वाचा दस्त ऐवज आहे. प्रत्येक मराठी इतिहासाच्या अभ्यासकाने हे पुस्तक वाचावे आणि संग्रही ठेवून पुन्हा पुन्हा वाचावे. या पुस्तकाचा लेखक कास्पियन समुद्राच्या किनारी इ स १५७० मध्ये जन्मला. भारतात आल्यावर त्याने काही काळ आदिलशाही दरबारात काम केले. आदिलशाही, निजामशाही, बहामनी घराणे, वर्हाडची इमादशाही, बीदरची बरीदशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, दिल्लीच्या मोगलांच्या अंमलाखालील प्रदेश, गुजराथची सुलतानशाही, खानदेशचे फ़ारुकी घराणे अशा सर्व शाह्यांच्या राज्यकारभारातील बारकाचे टिपणारा सुमारे आठशॆ पानांचा हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ वाचल्यावर छत्रपतींच्या शिवशाहीचे महत्व अधिकच उजळून निघते. |
.
शालेय अभ्यासक्रमातील इतिहास. चवथी, सहावी, सातवी आणि आठवी
१९२० साली प्रा. वेलिंगकर यांना एका संस्थेने संस्कृत साहित्याची सूची बनवण्याचे काम दिले होते. ते करता करता अचानक त्यांना बुधभूषण नावाच ग्रंथ (हस्तलिखित) हाती लागला. जेव्हा ते अधिक खोलात शिरले तेव्हा तो चक्क शंभूराजे म्हणजे छत्रपती संभाजीमहाराजांची रचलेला आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यांना हे खरे वाटेना. कारण तोवर संंभाजीराजांची प्रतिमा व्यसनी, व अत्यंत वाया गेलेली व्यक्ती अशीच करून देण्यात आली होती. म्हणून प्राध्यापकांनी अधिक शोध घेतला. तेव्हा त्यांना शंभूराजांचे एक वेगळेच व्यक्तीमत्व हाती लागले. बालपणी शिवाजीमहाराजांच्या आग्रा सुटकेच्या वेळी बाल शंभूंना बनारसच्या एका पंडिताघरी ठेवण्यात आले होते. तिथे त्यांनी संस्कृतचे ज्ञान घेतले. त्यांच्या कुशाग्र बुद्धीने ते आकलनही केले. आणि आयुष्यभर जतनही. त्यानंतरच्या आयुष्यात त्यांनी कायम मोठमोठ्या विद्वानांशी संगत ठेवली. आणि त्यांनी हिंदीतूनही नखशिखा आणि नायिकाभेद अशासारखी काव्येसुद्धा केली.
या संशोधनानंतर शंभूराजांच्या चरित्राचे अनेक पदर उलगडत गेले आणि या महान गुणी योद्ध्यावर लागलेल्या कलंकांचे डाग कुठल्याकुठे विरून गेले. आज छत्रपती संभाजी महाराज यांचे कर्तृत्व वादातीतपणे मान्य केले गेले आहे.जगातील सर्वात महान आणि आदर्श राजांपैकी ते एक होते.
बुधभूषण या संस्कृत काव्यग्रंथात शंभूराजांच्या संस्कृत ज्ञानाचा, त्यांच्यावरील संस्कारांचा आणि त्यांच्या विचारांचा परिचय होतो.
प्रत्येक मराठमोळ्याने संग्रही ठेवावा असा हा ग्रंथ ई साहित्य प्रतिष्ठान आपल्या वाचकांसाठी ई पुस्तक रुपात सादर करीत आहे.
या संशोधनानंतर शंभूराजांच्या चरित्राचे अनेक पदर उलगडत गेले आणि या महान गुणी योद्ध्यावर लागलेल्या कलंकांचे डाग कुठल्याकुठे विरून गेले. आज छत्रपती संभाजी महाराज यांचे कर्तृत्व वादातीतपणे मान्य केले गेले आहे.जगातील सर्वात महान आणि आदर्श राजांपैकी ते एक होते.
बुधभूषण या संस्कृत काव्यग्रंथात शंभूराजांच्या संस्कृत ज्ञानाचा, त्यांच्यावरील संस्कारांचा आणि त्यांच्या विचारांचा परिचय होतो.
प्रत्येक मराठमोळ्याने संग्रही ठेवावा असा हा ग्रंथ ई साहित्य प्रतिष्ठान आपल्या वाचकांसाठी ई पुस्तक रुपात सादर करीत आहे.
दामोदर हरि चापेकर
|