विनोद, विनोदी लेख, विडंबन कविता इत्यादी
सुलट उलट
अनुक्रम १. माझी सरकारी नोकरी २. तीन शरद ३. त्याचा राजकीय मॉल ४. शंकासुराचा वध ५.अखंडपुरातील विकासगंगा ६. नि:प्रश्नं सदा सुखी ७. आमचे ज्ञानार्जन २४×७ ८. समकालीन समर्थ ९. मस्कापॉलिशी १०. बुटक्यांच्या देशात ११. कोंडो विठ्ठलाची बखर १२. आपण आणि ते १३. भावनाबाई आणि अस्मिताताई |
अमेरिका ह्या स्वप्नभूमीत स्वप्न भंग करणाऱ्या गोष्टी घडल्या नुकत्याच. अर्थात स्वप्नं भंगली ती कोणाची हा वादाचा मुद्दा होऊ शकतो पण ट्रंपतात्यांनी आपल्याला चार विरंगुळ्याचे क्षण दिले हे निरपवाद. तर मेल्यानिया म्हणजे मिसेस ट्रंप आपले भाषण स्वातंत्र्य टिकवून बोलू लागल्यात.. सत्तेवर असताना कदाचित त्याची किंमत कळत नसेलही पण पायउतार झाल्यावर सामान्य माणूस म्हणून ती कळली असेल. मुद्दा आपला तो नाही.
आपला उद्देश चार घटका विरंगुळा .. तिथे मेल्यानिया तर कामी आलीच. आणि हल्लीच्या पिढीतले यू ट्यूब नि वेगवेगळ्या ठिकाणचे सोशल मिडियातले स्टॅटस ही. शाळकरी मुलीचा माझा आवडता नवरा हा निबंध आहे यात तर आयुष्याच्या शेवटी जीवनाशी शर्यत लावलेली आजी ही. लग्नाळू मुलीची कांदेपोह्यांची गोष्ट आहे नि काळानुरूप बदलणारी राणीची पत्रे आहेत.. जुन्या जमान्यातील जाहिरातीतून उभे राहिलेले मध्यमवयीन गृहिणीचे सुखचित्र.. आणि पत्नीधर्म सांगणारे स्तोत्रही.. हे पुस्तक वाचनीय +श्रवणीय+ अंजनीय आहे. याचे ई पुस्तक आहे आणि त्यातूनच आपण त्याचे व्हिडिओ ऐकू व पाहू शकता. एका नव्या प्रसन्न अनुभवासाठी शुभेच्छा.
|
पु. ल. देशपांडे
मराठी साहित्यातील अढळ ताराच.
अर्ध्या पाऊण शतकानंतरही त्यांच्या पुस्तकांचे गारूड काही मराठी मनावरून उतरत नाही.
पण वाटतं, आज पुलं असते तर त्यांच्या त्या पात्रांनी काय काय केलं असतं? त्यांचा बेंबट्या, धोंडोपंत, नारायण, हरितात्या, रावसाहेब, गटणे सगळ्याच व्यक्ती आणि वल्लींची आज आम्हाला गरज आहे. त्यांच्या जोडीला ‘असा मी असामी’ मधला कविता करणारा नानू सरंजामे, बढाया मारणारा आप्पा भिंगार्डे, शंकर्या, प्रोफेसर ठिगळे आले तर मोठीच मजा येईल.
असे ज्यांना वाटते त्यांच्यासाठी हे खास.
‘पौष्टिक जीवन’ या लेखात पुलंनीच म्हणल्याप्रमाणे या पुस्तकातील मजकुराचे मालक पुलंच आहेत.