इतिहास
गुलशने इब्राहिमी
गुलशने इब्राहिमी हे पुस्तक शिवशाहीच्या आधीच्या महाराष्ट्राचे, त्यातल्या राज्यकारभाराचे वर्णन करणारा एक महत्त्वाचा दस्त ऐवज आहे. प्रत्येक मराठी इतिहासाच्या अभ्यासकाने हे पुस्तक वाचावे आणि संग्रही ठेवून पुन्हा पुन्हा वाचावे. या पुस्तकाचा लेखक कास्पियन समुद्राच्या किनारी इ स १५७० मध्ये जन्मला. भारतात आल्यावर त्याने काही काळ आदिलशाही दरबारात काम केले. आदिलशाही, निजामशाही, बहामनी घराणे, वर्हाडची इमादशाही, बीदरची बरीदशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, दिल्लीच्या मोगलांच्या अंमलाखालील प्रदेश, गुजराथची सुलतानशाही, खानदेशचे फ़ारुकी घराणे अशा सर्व शाह्यांच्या राज्यकारभारातील बारकाचे टिपणारा सुमारे आठशॆ पानांचा हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ वाचल्यावर छत्रपतींच्या शिवशाहीचे महत्व अधिकच उजळून निघते. |
.
शालेय अभ्यासक्रमातील इतिहास. चवथी, सहावी, सातवी आणि आठवी
१९२० साली प्रा. वेलिंगकर यांना एका संस्थेने संस्कृत साहित्याची सूची बनवण्याचे काम दिले होते. ते करता करता अचानक त्यांना बुधभूषण नावाच ग्रंथ (हस्तलिखित) हाती लागला. जेव्हा ते अधिक खोलात शिरले तेव्हा तो चक्क शंभूराजे म्हणजे छत्रपती संभाजीमहाराजांची रचलेला आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यांना हे खरे वाटेना. कारण तोवर संंभाजीराजांची प्रतिमा व्यसनी, व अत्यंत वाया गेलेली व्यक्ती अशीच करून देण्यात आली होती. म्हणून प्राध्यापकांनी अधिक शोध घेतला. तेव्हा त्यांना शंभूराजांचे एक वेगळेच व्यक्तीमत्व हाती लागले. बालपणी शिवाजीमहाराजांच्या आग्रा सुटकेच्या वेळी बाल शंभूंना बनारसच्या एका पंडिताघरी ठेवण्यात आले होते. तिथे त्यांनी संस्कृतचे ज्ञान घेतले. त्यांच्या कुशाग्र बुद्धीने ते आकलनही केले. आणि आयुष्यभर जतनही. त्यानंतरच्या आयुष्यात त्यांनी कायम मोठमोठ्या विद्वानांशी संगत ठेवली. आणि त्यांनी हिंदीतूनही नखशिखा आणि नायिकाभेद अशासारखी काव्येसुद्धा केली.
या संशोधनानंतर शंभूराजांच्या चरित्राचे अनेक पदर उलगडत गेले आणि या महान गुणी योद्ध्यावर लागलेल्या कलंकांचे डाग कुठल्याकुठे विरून गेले. आज छत्रपती संभाजी महाराज यांचे कर्तृत्व वादातीतपणे मान्य केले गेले आहे.जगातील सर्वात महान आणि आदर्श राजांपैकी ते एक होते.
बुधभूषण या संस्कृत काव्यग्रंथात शंभूराजांच्या संस्कृत ज्ञानाचा, त्यांच्यावरील संस्कारांचा आणि त्यांच्या विचारांचा परिचय होतो.
प्रत्येक मराठमोळ्याने संग्रही ठेवावा असा हा ग्रंथ ई साहित्य प्रतिष्ठान आपल्या वाचकांसाठी ई पुस्तक रुपात सादर करीत आहे.

दामोदर हरि चापेकर
|